कलीसिया के लिए परामर्श
वरील मंडळीशीं संयुक्त होणें
या पृथ्वीवरील देवाची मंडळी ही वरील मंडळीशी एकरुप आहे या पृथ्वीवरील विश्वासणारे व कर्वी न पतन पावणारे स्वर्गीय दूत यांची एक मंडळी बनते. या पृथ्वीवर देवाची भक्ति करण्यासाठी एकत्र जमलेल्या जमावाची आवड स्वर्गीय प्रत्येक व्यक्तीला असते. या पृथ्वीवरील पवित्र स्थानांत खिस्ताकरितां दिलेली साक्ष स्वर्गीय परमपवित्रस्थानात ऐकली जाते आणि या पृथ्वीवरील भक्तांनी केलेली स्तुति व उपकारस्मरण हीं स्वर्गीय स्तुतींत मिसळून जातात कारण खिस्त हा पतन पावलेल्या आदामाच्या पुत्रासाठीं व्यर्थ मरण पावलेला नाहीं दूत मुख्य झयांतून पीत असतां पृथ्वीवरील धार्मिकजन सिंहासनातून वाहणार्य झर्यांतून पितात. तो झरा आमच्या देवाच्या नगरीला आनंदीत करतो. अहाहा ! स्वर्ग पृथ्वीजवळ अधिक आला आहे हें आपण समजून घ्यावे ! पृथ्वीवर जन्मलेल्या मुलांना जेव्हां समजत नाही तेव्हां प्रकाशाचे दूत त्यांचे सोबती असतात. प्रत्येक जिवंत आत्म्याचे हें अदृश्य साक्षीदार संरक्षण करतात व त्या आत्म्याला खिस्ताकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत आशा आहे व मनुष्यें सर्वकाळासाठीं पवित्र आत्म्याला दूर लोटीत नाहींत तोपर्यंत त्याचे सरक्षण स्वर्गीय दतीकडून केले जाते. आपण लक्षात ठेवं या कीं धार्मिकांच्या प्रत्येक सभेत देवाचे दूत असतात व तें त्यांच्या साक्षी, प्रार्थना व गीते ऐकतात. आपण लक्षात ठेवू या कीं, आमच्या स्तुतींत स्वर्गीय दूतांच्या गायनाची साद मिळते. CChMara 104.5
मग तुम्ही प्रत्येक शब्बाथ दिवशीं जमून व ज्याने तुम्हांला अंधारातून आपल्या अभूत प्रकाशात पाचारण केले आहे त्याची स्तुति गाता. “ज्याने आम्हांवर प्रीति केली व आपल्या रक्ताने आम्हांला पापांपासून धुतले त्याला अंत:करणापूर्वक पूजा अर्पू या. प्रत्येक भाषणकाराच्या वक्तृत्वांत ख्रिस्ताच्या प्रीतीचे ओझे असले पाहिजे. प्रत्येक स्तुतीच्या गाण्यांत साधेपणा असावा. देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने केलेली तुमची प्रार्थना असावी. जीवनाचें शब्द बोलले जात असतां तुमची अंत:करणपूर्वक साक्ष अशी असावी कीं हा संदेश स्वर्गातून आपल्यासाठी आहे. CChMara 105.1
देव आम्हांला शिकवितो कीं, त्याच्या पूर्ण प्रीतीचा गुण शिकण्यास आम्ही त्याच्या मदिरात एकत्र व्हावे. त्याजवर प्रीति करणार्यांसाठी जें गृह तयार करावयास तो गेला आहे त्या गृहांत राहण्यासाठी या पृथ्वीचे रहिवाशी पात्र होतील. तेथें प्रत्येक शब्बाथ दिनीं त्याच्या पवित्र स्थानांत तें एकत्र होतील. जो सिहासनावर बसलेला कोंकरा त्याला स्तुति व उपकारस्मरण देण्यास एकत्र होतील. 4 CChMara 105.2