कलीसिया के लिए परामर्श

30/318

तुमची देणगी गरजेला जुळते

देवाच्या योजनेत प्रत्येकाला जागा आहे. ज्या देणग्याची गरज नाहीं. त्या देण्यांत आल्या नाहींत. समजा कीं देणगी अगदी लहान आहे तरी देवाजवळ तिला जागा आहे. ती देणगी विश्वासूपणे वापरली तर देवाने योजिलेले कार्य त्या देणगीकडून होईल. झोपडींतील देणगी घरोघर कार्य करण्यासाठी जरूरी आहे. कारण मोठ्या देणगीपेक्षा या देणगीकडून या कार्यात अधिक साध्य केले जाईल. 4 CChMara 63.1

देवाच्या इच्छेनुसार जे आपली शक्ति उपयोगात आणतील त्यांची देणगी वाढेल. त्यांची शक्ति वाढून त्यांना स्वर्गीय ज्ञान जे हरवलेले आहेत त्यांना शोधून तारण्यास प्राप्त होईल. पण जेव्हां मंडळीचे सभासद त्यांना देवाने दिलेली जबाबदारी घेण्यास निष्काळजी बनले आहेत तेव्हां स्वर्गाचा आशीर्वाद मिळण्याची आशा तें कसे करुं शकतील? जे अंधारात आहेत त्यांना प्रकाशित करण्याचे ओझे नामधारी ख्रिस्ती लोकांना भासत नाही. जेव्हां तें देवाची कृपा व ज्ञान देण्याचे थाबवितात तेव्हां तें त्यांची निर्णय शक्ति कमी करून घेतात तें स्वर्गीय आशीर्वादाच्या विपुलतेबद्दल वाटणारा आदर गमावून बसतात; व त्याची किंमत करण्यास स्वत: चुकून तें इतरांना देण्याची आवश्यकता जाणण्यास चुकतात. CChMara 63.2

वेगवेगळ्या वस्तींत मोठमोठाल्या मंडळ्या एकत्र झालेल्या आम्ही पाहातों. त्यांच्या सभासदांनी सत्याचे ज्ञान मिळविले आहे, आणि पुष्कळजण जीवनी शब्द इतरांना प्रकाश देण्याऐवजी आनंदाने ऐकण्यास तयार आहेत. कार्याच्या वाढीची थोडीच जबाबदारी त्याना वाटते व आत्म्याच्या तारणासाठी फारच थोड़ी आवड त्यांना आहे. जगिक गोष्टींत तें पूर्ण आवेशी आहेत पण तें आपला धर्म जगिक धंद्यांत आणीत नाहींत तें म्हणतात : “धर्म तो धर्म, व धंदा तो धदा” त्यांचा विश्वास असा आहे कीं, प्रत्येक बाबीला त्याचा योग्य भाग आहे, पण तें म्हणतात कीं, “तें वेगवेगळे असू द्या.” CChMara 63.3

आलेल्या संधीचा फायदा न घेतल्यामुळे व त्याचा गैर उपयोग केल्यामुळे त्या मंडळाचे सभासद “आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या ज्ञानात व कृपेंत वाढत नाहींत. २ पेत्र ३:१८. त्यामुळे तें विश्वासांत दुर्बळ आहेत. ज्ञानात उणे व अनुभवाने बालक असें आहेत. तें सत्यांत मुळावलेले व स्थिर झालेले नाहींत तें जर असेच राहिले तर शेवटल्या काळांतील मोह त्याच्यावर येऊन तें फसले जातील, कारण सत्य व असत्य यांतील फरक कळण्याइतकी दूरदृष्टि त्यांच्यामध्ये नाहीं. 5 CChMara 63.4