कलीसिया के लिए परामर्श

29/318

प्रकरण ६ वे - हे प्रभु, हा मी आहें, मला पाठीव

जगाचा शेवट रात्रींच्या चोरासारखा नकळत गुपचूप आपणावर येत आहे. देव करो कीं आम्ही इतरासारखे झोपू नये पण सावध राहन वाट पाहावी. सत्याचा लवकरच मोठ्या वैभवाने विजय होणार आहे. जे आता देवाबरोबर सहकामकरी होण्यासाठी निवडतात, तेहि त्याबरोबर विजयी होतील. वेळ थोडा राहिला आहे. रात्र लवकर येत आहे आणि कोणी मनुष्य काम करूं शकणार नाही. जे सध्याच्या सत्यांत आनंद मानीत आहेत त्यांनी हें सत्य इतरांना सांगण्यास घाई करावी. प्रभु म्हणत आहे, “मी कोणाला पाठवू?” सत्याकरिता जे स्वार्थत्याग करण्यास तयार आहेत त्यांनी आता म्हणावे कीं, “हें प्रभु, हा मी आहे, मला पाठीव.” आम्ही सुवार्ताप्रसाराच्या कार्यातील आमच्या शेजार्‍यांत व मित्रमंडळींत जें कार्य करायचे म्हणून देवाची इच्छा आहे त्याचा लहान भाग फक्त केला आहे. आपल्या देशांतील प्रत्येक शहरात सत्याची माहिती नसलेले लोक आहेत आणि समुद्राच्या पलिकडे असणार्‍य जगांत विपुल नवें क्षेत्र आहे त्यात आम्ही नांगरून बी पेरले पाहिजेत. 1 CChMara 62.1

आम्ही संकटाच्या काळाच्या अगदी काठांवर आहोत. स्वप्नात कधीं आली नसतील इतकी भयंकर सकटे आपणापुढे आहेत. या पृथ्वींतून स्वर्गाविरुद्ध एक सत्ता लोकांना लढाई करायला मार्गदर्शन करीत आहे. मानवाने सैतानी हस्तकाशीं देवाचे नियमशास्त्र निरर्थक करण्यासाठी संघ केला आहे. या जगाचे रहिवाशी नहाच्या काळांतील जगाच्या रहिवाश्यासारखे त्वरेने होत आहेत. तें जलप्रलयाने वाहन गेले व सदोमच्या रहिवाश्याप्रमाणे म्हणजे जे स्वर्गातील अग्नीनें जळून भस्म झाले होतें. त्याप्रमाणे तें बनत आहेत. सैतानी शक्ति सार्वकालिक गोष्टीपासून लोकांची मने हिरावून घेण्याचे काम करीत आहे. शत्रूने आपला हेतु साध्य होण्यासारखी योजना चालूं केली आहे. जगिक उद्योगधंदे, खेळ, आजची फॅशन या गोष्टींनीं पुरुष व स्त्रिया यांची मने गुंतून गेली आहेत. करमणूक व निरर्थक वाचन याद्वारें मनुष्याचा सद्सद्विवेक बोथट होत आहे. रुंद मार्गाने म्हणजे जो नाशाकडे नेणारा मार्ग आहे, त्या मार्गाने लांबलचक मिरवणूक चालत आहे. गुन्हे, दारुबाजपणा व धांगडधिंगा यांनी भरलेलें जग मंडळीचा बदल घडवून आणीत आहे. देवाचे नियमशास्त्र व धार्मिकतेचा दैवी दर्जा हें निरर्थक आहेत असें घोषित करण्यांत येत आहे. 2 CChMara 62.2

शेवटल्या काळासबधाने असलेली भविष्ये पूर्ण होऊन जाईपर्यंत त्यासंबंधानें कांही बोलण्याचे आम्ही थांबवावे काय? मग आमच्या बोलण्याला काय किमत आहे? देवाची शिक्षा त्याच्या आज्ञाभंजकावर येईपर्यंत आम्हीं थांबावयाचे काय ? देवाच्या वचनावरील आमचा विश्वास कोठे आहे? त्यानें जे सांगितलें आहे त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी भविष्यांत सांगितलेल्या गोष्टी पूर्ण होतांना आम्ही पाहिल्या पाहिजेत काय? आम्हांकडे स्पष्ट प्रकाश आला आहे नव्हें तो “दाराशीं आला आहे. म्हणून वाचून उशीर होण्याअगोदर समजून घेऊ या. 3 CChMara 62.3