कलीसिया के लिए परामर्श
प्रकरण ६५ वें - यहोशवा आणि दिव्यदूत
दृश्य व अदृश्य जगाला अलिप्त करणारा पडदा जर बाजूला सारला आणि ख्रिस्त व दिव्यदत यांचा मानवाच्या तारणाविषयी सैतान व त्याचे दष्ट सैनिक ह्यांच्याशी जो महान झगडा चालूं आहे, तो जर देवाच्या लोकांना पाहता आला व पापाच्या दास्यत्वातून आत्म्यांची सुटका करण्याचे आणि दुष्टाच्या द्वेषापासून संरक्षण करण्यासाठी देव आपल्या सामर्थ्याचा निरतर कसा अमल करीत आहे हें देवाचे अद्भुत कार्य जर त्यांना समजून आलो तर सैतानाच्या कुयुक्त्यांना तोंड देण्याकरीता तें अधिक चागली तयारी करतील. तारणाकार्याची योजना किती विस्तीर्ण आणि महत्वाची आहे. आणि ख्रिस्तासह कामकरी होण्याची कार्य किती थोर आहे. याविषयी त्यांची मने गांभीर्याने तयार होतील. जरी त्यांची मानखंडणा झालेली असेल तरी स्वर्गात त्यांच्या तारणाविषयी आस्था आहे हें पाहूनते उत्तेजित होतील. CChMara 380.1
सैतानाचे कार्य आणि ख्रिस्ताचे कार्य, तसेच आपल्या लोकांना दूषित करणार्य सैतानाचे पारिपत्य करण्याबाबत आमच्या सामर्थ्य कसे काय आहे याचे अतिशय जोरदार वे मनात ठसेल असें उदाहरण जखर्यांच्या संदेशात दिलेले आहे. मुख्य याजक यहोशवा “मलीन वस्त्रे धारण करून’ प्रभूच्या दिव्य दृतासमोर उभा असलेला संदेष्टाने दृष्टांतात पाहिलें, अतिशय संकटात सापडलेल्या आपल्या लोकांतर्फे तो देवाच्या दयेची याचना करीत होता. सैतान त्याच्या उजव्या बाजूला उभा राहन त्याला अडवीत होता. आपल्यावर अगर आपल्या लोकांवर सैतानाने केलेले दोषारोप त्या मुख्य याजकाला फिरवता येत नव्हते. इस्राएल लोक निरपराधी आहेत. असें त्याचे म्हणणे नव्हते. त्याची स्वत:ची मलीन वस्त्रे ही त्याच्या लोकांच्या पापाचे दर्शक होती. त्यांचा प्रतिनिधी म्हणून तो देवदूतासमोर उभा राहत आहे, त्याचे दोष मान्य करून त्याचा पश्चाताप आणि त्याची शरणागति दाखवित आहे. पापांची क्षमा करणार्यांच्या दयेवर आणि देवाच्या अभिवचनांवर विश्वास-निष्ट होऊन तो हवाला टाकीत आहे. नंतर मग देवदूत ख्रिस्तच व पायाचा उद्धारक आहे तो आपल्या लोकाना दोष देणान्यांची तोंड बंद करून स्पष्टपणे सागतो कीं ‘सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो, यरूशलेम आपलेसे करणारा परमेश्वर तुला धमकी देव; हा अग्नितून काढिलेले कोलीत नव्हें काय ?’ जखर्य ३:२. CChMara 380.2
यहोशवाची मध्यस्थी मान्य झाल्यावर अशी आज्ञा देण्यांत येते कीं “त्यावरची मलीन वस्त्रे काढा,” यहोशवाला देवदूत म्हणाला, “पाहा, मी तुझा अधर्म तुजपासून दूर केला आहे, मी तुला उची पोषाख घालीत आहे. तेव्हां त्यांनी त्याला स्वच्छ मदील व पोषाख घातला.” त्याच्या स्वत:च्या आणि त्याच्या लोकांच्या पापाची क्षमा करण्यांत आली. इस्त्राएलांना “उंची पोषाख घालण्यात आला - ख्रिस्ताची धार्मिकता त्यांना बहाल करण्यांत आली. CChMara 380.3
ज्याप्रमाणे सैतानाने यहोशवाला व त्याच्या लोकांना दोषी ठरविलें होतें त्याप्रमाणे जे कोणी देवाच्या दयेच्या व कृपेच्या मार्गी लागतात. त्याच्या वर तो निरंतर ठपके ठेवीत राहतो. प्रकटीकरणाच्या ग्रंथात असें स्पष्टच म्हटले आहे कीं, “जो आमच्या बधूना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रदिवस त्यांजवर दोषारोप करणारा, तो खालीं टाकण्यात आला आहे.” प्रकटी १२:१० दुष्टाच्या तावडीतून बंधमुक्त केलेल्या आणि ज्याचे नाव कोंकण्याच्या जीवनी पुस्तकांत नोंदले गेले आहे अशा प्रत्येक आत्म्याविषयी असा झगडा चाललेला असतो. दुष्टांच्या निश्चित प्रतिकाराशिवाय कोणालाही सैतानाच्या कुटुंबातून काढून देवाच्या कुटुंबात कधीही सामील करून घेता येत नाही. जे देवाच्या मागें जातात त्यावर सैतानाचे आरोप नुसत्या नापसंतीच नसतात तर त्यांच्या सदोष स्वभावधर्मावर तो फार खुष असतो. देवाचा आज्ञाभंग केला तर त्याला त्याच्यावर सत्ता करिता येते. ख्रिस्ताशी त्यांचे वैर असल्यामुळे त्याला दोषारोप चढविता येतात आपल्या तारण विषयक धोरणांद्वारे येशू हा सैतानाचा मानवी कुटुंबावरील पगडा मोडून त्याच्या सत्तेतून आत्म्यांची सुटका करीत आहे. ख्रिस्ताच्या श्रेष्टाचे पुरावे पाहून त्या बंडखोरी नायकाच्या द्वेष व मत्सरी भावना उसळून जातात. आणि ज्या मानव संततीने त्यांचे तारण अंगीकारले आहे त्यांना उरल्यासुरल्यासह हिसकून घेण्यासाठी तो सैतानी सामथ्र्याने व चातुर्याने प्रयत्न करतो. CChMara 381.1
मानवांना तो संशयवादांत आढून घेतो व त्यानी देवावरची निष्ठा व प्रीति टाकून द्यावी असें तो करितो; आज्ञा भंग करण्याची त्यांना भुरळ घालतो. आणि नंतर तें आपले बंदिस्त म्हणून त्यांना घेण्याचा ख्रिस्ताला हक्क नाही असा वाद घालतो. जे कोणी देवाच्या क्षमेची व कृपेची आस्तापूर्वक याचना परितात त्यांना त्या मिळतील हें त्याला ठाऊक असतें म्हणून त्यांना त्यांच्या पापांची ओळख देऊन त्यांना नामर्द करितो. देवाच्या आज्ञापालनाचा जे कोणी प्रयत्न करितात. त्यांच्याविरूद्ध करामत करण्याची तो निरंतर धडपड करीत राहतो. त्यांची अत्युत्तम व पसत पडणारी सेवाकार्ये भ्रष्टकारक दिसावीत असें तो डाव टाकीत राहतो अगणित युक्त्याप्रयुक्त्यांनी अत्यंत चलाखीने व भयंकर क्रूरतेने यांना दोषपात्र करण्याची तो धडपड करितो. CChMara 381.2
असल्या ह्या आरोपांना मानवाला स्वत:च्या बळाने तोंड देववत नाही. आपल्या पापमय वस्त्रांनी आपला गुन्हा कबुल करीत तो ईश्वरासमोर उभा राहिलेला असतो. परंतू जे पश्चातापाने व विश्वासाने आपापली मने ज्या ख्रिस्ताच्या हवाली करितात तो येशू आमचा मध्यस्थ आमच्यातर्फे सफळ अशी रदबदली करितो. त्यांचे प्रकरण तो ईश्वरासमोर माडितो आणि वधस्तंभावरील महान विचारसरणींच्या सामर्थ्याने त्या दोषारोप करणार्यला हुसकून देतो. थेट क्रूसावरील मरणदंडापर्यंत त्यानें संपूर्णता देवाचे आज्ञापालन केल्यामुळे त्याला स्वर्गात व पृथ्वीवर सर्व सामर्थ्य देण्यांत आलेले आहे. पतित मानवांसाठी दया व क्षमा देण्यांत यावी अशी त्याची पित्याजवळ मागणी आहे आपल्या लोकांवर दोषारोप करणार्यला तो असें बाजवून सांगतो कीं, “परमेश्वर तुला धमकी देवो.” माझ्या रक्ताने विकत घेतलेले आहेत, अग्नीतून काढलेली कोलीते आहेत. विश्वासाने जे त्याजवर टेकून राहतात. त्यांना अशी समाधानकारक हमी देण्यांत येते कीं, “पाहा मी तुझा अधर्म तुजपासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालीत आहे.” CChMara 381.3
ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा झगा घालणारे सर्वजण त्याच्यासमोर त्याचे निवडलेले निष्ठावंत आणि अव्वल दर्जाचे असें उभे राहतील. ख्रिस्ताच्या हातातून त्यांना हिसकून घेण्याची सैतानाला ताकद नाही. पश्चातापी बुद्धिने आणि निष्ठेने ज्यांनी ख्रिस्ताचा आसरा घेतलेला आहे अशा एकालाहि ख्रिस्त सैतानाच्या अधीन होऊ देणार नाही. त्याच्या वचनात प्रतिज्ञापूर्वक म्हटले आहे कीं, त्यानें माझा आश्रय धरावा. त्यानें मजबरोबर दोस्ती करावी.” यशया २७.५ यहोशवाला दिलले अभिवचनसर्वांनाच दिलेले आहे. “तू माझ्या मार्गाने चाल व तुला सोंपलेले सर्व संभालळे तर --- येथे उभे असणार्यांत तुझे जाणे वेणे होईल, असें मी करीन.” जखर्य ३:७ या जगांतसुध्दा त्यांच्या दोहो बाजूनी देवदूत चालतील आणि परमेश्वराच्या सिंहासनासभोवार असलेल्या दूतगणांत तें अखेर चालूं करतील. देवाने पसंत केलेले लोक हें मलीन वस्त्रासह प्रभुसमोर उभे राहतात. असें दर्शविण्यात आलेले आहे या गोष्टीवरून जे सर्व त्याचे नामधारी आहेत, त्यांचा नम्रतेकडे व अंत:करणाच्या संशोधनाकडे ओढा असावा. सत्याचे आज्ञापालन करून जे खरोखरीच अंत:करणाची शुद्धि करीत असतात, तें स्वत:ला अत्यंत नम्र समजतात. ख्रिस्ताचा गुणस्वभाव जितका अधिक तें न्याहळू पाहतील, तितकी अधिक त्याच्याप्रमाणे होण्याची त्यांची इच्छा बलवत्तर होईल. आणि तितकी अधिक कमी आपली शुद्धा व पवित्रता त्यांच्या नजरेस येईल. तरी आपण आपली पापमय अवस्था ध्यानात आणताना ख्रिस्त आमची धार्मिकता पवित्रकरण आणि आमचे तारण म्हणून त्यावर आम्हांला विसंबून राहावयाचे असतें सैतान आम्हांवर लादतो. तें आरोप आमच्याने निवारण करिता यावयाचे नाहीत. आमच्या वतीने ख्रिस्तच यथायोग्य रदबदली करूं शकतो आमच्या पुण्याईवरून नव्हें पण त्याच्या स्वत:च्या पुण्याईद्वारे तो त्या दोषारोप करणार्यचे तोंड बंद करण्यास समर्थ आहे. CChMara 382.1
जखर्याला झालेला अहाशवा व दिव्यदुत यांच्याविषयीचा दृष्टांत हा प्रायश्चित्ताचा महान काळ समाप्त होणार्य दिवसांतील देवाच्या लोकांच्या अनुभवाला विशेष प्रकारे लागू पडतो. अवशिष्ट ख्रिस्ती मंडळी ह्या कसोटीच्या प्रसंगात व संकटात उतरणार आहे. देवाची आज्ञा पाळणारे व येशूवर विश्वास ठेवणारे यास अजगर व त्यांचे सैन्य यांचा कोप अनुभवायास मिळेल. जग ही आपलीच प्रजा आहे असें सैतान धरून चालतो; धर्मभ्रष्ट ख्रिस्ती मंडळीवर त्यानें आपला ताबा ठेविला अहे, तरी त्याचा अधिकार झुगारून देणारा एक लहानसा समुह आहे. त्यांना जगातून नाहीसे केले म्हणजे त्यानें सर्व कांही जिंकले असेच त्याला वाटेल. इस्राएल लोकांचा नाश करण्यासाठी ज्याप्रमाणे त्यानें विधर्मी राष्ट्राना चिथावले. त्याचप्रमाणे देवाच्या लोकांचा नाश करण्यासाठी तो लवकरच जगांतील दुष्ट राष्ट्रांना चेतविणार आहे. देवाशी निष्ठ राहून जे कर्तव्यावर राहतील अशांना दटावण्यात देण्यांत येतील. त्यांची बदनामी केली जाईल. व त्यांचा निषेध केला जाई. “आईबाप, भाउबद, नातलग व मित्र” हेदेखील त्यांचा घात करतील. CChMara 382.2
त्यांची आशा जर कोठे असेल तर ती देवाच्या कृपेवरच असतें, त्यांचा बचाव प्रार्थनेवर मात्र असतो. ज्याप्रमाणे यहोशवा दिव्यदृतासमोर मध्यस्थी करीत होता त्याचप्रमाणे भग्न अंत:करणाने आणि आस्थेवाईक विश्वासाने येशू जो त्यांचा मध्यस्थ त्याच्याकडून क्षमा व सुटका यासाठी अवशिष्ठ मंडळी मागणी करील. आपल्या पापीष्ट जीवनाविषयी त्यांना पूर्ण जाणीव असते आणि आपली दुर्बलता व अपत्रता पाहून हताश होऊन जाण्याची त्यांची तयारी असतें यहोशवाला विरोध करण्यासाठी जसा सैतान त्याच्या बाजूला हजरच होता तसा तो मोहक त्यांना दोष द्यावयास जवळच असतो. त्याची मळीन वस्त्रे आणि त्यांचे उणे स्वभावधर्म तो त्यास दाखवून देतो. त्यांच्या दुबळेपणाने आणि मूर्खतने त्यांच्या कृतघ्नतेच्या पापांनी आणि त्यांच्या ख्रिस्र्तावरोधी जीवनांनी त्यांनी उद्धरकांची कशी मानखंडणा केली आहे हें, तो त्यांच्या नजरेस आणून देतो. तुमची बाब तर अगदीच निराशेची आणि तुमचा अमळतेचा डाग कदाचित् स्वच्छ होणार नाही. अशा विचाराने तो त्यांनी धाकदडपशाही घालण्याचा यत्न करतो. त्यांचा विश्वास तो इतका कांही नष्ट करून टाकतो. कीं त्याद्वारे तें त्याच्या मोहपाशांनाच वश होऊन जातील, त्याच्या देवावरच्या निष्टापासून परावृत्त होतात. श्वापदाची खूण तें धारण करतात. CChMara 382.3
सैतान आपले त्यांच्यावरचे दोषारोष ईश्वरासमोर आग्रहपूर्वक निवेदन करून असें स्पष्टच सांगतो कीं आपल्या पापांमुळे दैवी संरक्षणाचा त्यांचा हक्क तें बुडवून बसले आहेत व आज्ञाभंजक म्हणून तें नाशालाच मात्र पात्र आहेत. जसे त्याला स्वत:च्या देवाच्या कृपाक्षेत्रांतून हुसकून दिले तसेच तेही हुसकून देण्यास पात्र आहेत असें तो जाहीरपणे सांगतो तो म्हणतो: “स्वर्गात आणि देवदृतामध्ये स्थान मिळविणारे हेच का तें लोक आहेत ? आपण देवाची आज्ञा मानणारे असें जे म्हणवितात, तें आज्ञापालन करितात का ? देवापेक्षा स्वत:वरच तें अधिक प्रीति करणारे नाहीत का? देवाच्या सेवेपेक्षा त्यांनी आपल्या स्वत:च्याच आवडीवर अधिक भर दिलेली नाही काय ? जगांतील गोष्टींवर त्यांचे मन बसलेले नव्हते काय ? पापांनी त्यांची चरित्रे कशी झालेली आहेत तें पाहा. त्यांचा स्वार्थ, त्यांची मत्सरबुद्धि व त्यांचा परस्परविषयी द्वेष हें पाहून घ्या.” CChMara 383.1
देवाचे लोक पुष्कळ बाबीमध्ये फार दोषी आहेत. जी जी पापे करावयास सैतानाने त्यांस गळ घातली, त्याचे त्याला अचूक ज्ञान आहे व त्यांचा तो कूप तिखटमीट लावून बोभाटा करून म्हणतो. “मला व माझ्या दुतांना देवाने आपल्या सीमतेतून हसकून द्यावे आणि त्याच पापांचा दोष असणार्यांना प्रतिदिन द्यावे कीं काय? हें प्रभु न्यायदृष्टीने पाहिल्यास हें तु करूं शकत नाहीस सात्विकतेत व न्यायपणांत तुज सिहासन टिकाव धरणार नाही. त्यांना दंडच व्हावा अशी न्यायशास्त्राची मागणी आहे.” CChMara 383.2
परंतु जरी ख्रिस्ताचे अनुयायी पापांत पडलेले असले तरी त्यांनी स्वत:ला दुष्टांच्या अधीन केलेले नाही. त्यांनी आपल्या पापांचा त्याग केलेला आहे. आणि लिनतेने व पश्चाताप बुद्धिने प्रभूचा धावा केला आहे. आणि त्यामुळे दिव्य मध्यस्थ त्यांच्यासाठी रदबदली करीत असतो. त्यांच्या कृतघ्नतेने त्यांनी ज्याची बदनामी केली, तो त्यांची पापे आणि त्यांचा पश्चातापहि ओळखून आहे. तो स्पष्ट म्हणतो कीं, “अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो, ह्या आत्म्यासाठी मी जीवार्पण केलेले आहे; माझ्या तळहातावर त्यांना कोरून काढिलेले अहे.” CChMara 383.3