कलीसिया के लिए परामर्श
प्रकरण ६४ वें - ख्रिस्त आमचा महान् मुख्य योजक
स्वर्गीय पवित्रस्थानातील सेवेची यथायोग्य समजूत हाच आमच्या विश्वासाचा पाया होय. CChMara 377.1
मोशाला डोंगरावर सांगितलेल्या नमुन्याप्रमाणे पृथ्वीवरील निवासमंडप बांधण्यात आला होता. तो मंडप वर्तमानकाळी दृष्टांतरूप आहे. ह्यात दाने व यज्ञपशु अर्पण करण्यांत येतात. ख्रिस्त हा आमचा महान मुख्य याजक, “तो पवित्रस्थानाचा व मनुष्याने नव्हें तर प्रभुने घातलेल्या खर्य मंडपाचा सेवक आहे. प्रेषित योहानाने पाहिलेल्या दृष्टांतात त्याला स्वर्गात देवाचा मंडप दिसला आणि त्यानें पाहिलें कीं, “अग्निचे सात दिवे सिंहासनासमोर जळत होतें.” CChMara 377.2
स्वर्गातील पवित्रस्थानांतील पहिला भाग सदेष्ट्याला पाहण्याची मुभा होती व त्याला तेथें अग्नीचे सात दिवे दिसलें,” आणि पृथ्वीवरील पवित्रस्थानातील सोन्याची वेदी व तिच्यावर जाळण्याच्या सात सोनेरी समया ह्या त्या सात दिव्यांच्या दर्शक होत्या. पुन: “देवाचे स्वर्गीय मंदिर उघडण्यात आलें, आणि त्यानें आंतील पडद्याच्या आड परम पवित्रस्थान पाहिलें. त्याला ‘त्याच्या कराराचा कोश दिसला;” देवाच्या आज्ञा ठेविण्यासाठी मोशाने जो पवित्र कोश बनविलेला होता, तो त्या स्वर्गीय परमपवित्र स्थानातील दर्शक होता. CChMara 377.3
योहान असें म्हणतो कीं मी स्वर्गात पवित्रस्थान पाहिलें. त्या पवित्रस्थानात आमच्याकरिता येशू राजकीय सेवा करितो. मूळचे पवित्रस्थान हेच होय व मोशाने उभारलेले पवित्रस्तान तर त्याची नक्कल होती. CChMara 377.4
स्वर्गीय मंदिर हें राजाच्या राजाचे चिरस्थायी वस्तीस्थान आहे. तेथें हजारोंचे हजारों सेवक त्याची आदबिने सेवा करीत आहेत आणि लक्षावधी भक्तगण त्याच्यासमोर आदरपूर्वक उभे ठाकलेले आहेत. त्या राजाच्या अविनाशी सिंहासनाच्या गौरवाने तें मंदिर व्यापून गेलेले आहे. तेथील झळकणारे संरक्षक सराफीम दूत आपापले चेहरे पूज्यभावनेने आच्छादन त्याला वंदन करतात. त्या मंदिराची विस्तीर्णता व त्याची गौरवसंपन्नता यांची बरोबरी जगांतील कसलेही स्थान करूं शकत नाही. तरीपण त्या स्वर्गीय पवित्रस्थानाविषयींची महत्वपूर्ण सत्ये पृथ्वीवरील पवित्रस्थानात शिकविली पाहिजेत आणि मानवाच्या उद्धारासाठी तेथें चालेले महान सेवाकार्य येथील पवित्रस्थानात शिकविले पाहिजे. CChMara 377.5
ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर तो आमचा उद्धारक व मूख्य याजकाचे सेवा-कार्य सुरू करणार होता. पौल म्हणतो.“खर्या गोष्टीच्या नमुन्यासारखे हातांनी केलेले पवित्रस्थान यांत ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासन्मुख उभा राहण्यास स्वर्गात गेला. “ख्रिस्ताच्या सेवाक्षेत्रात दोन प्रमुखविभाग होतें ; प्रत्येकाला कालमर्यादा होती आणि स्वर्गीय पवित्रस्थानातील विशिष्ठ कार्य होतें. पृथ्वीवरील पवित्रस्थानांतही अगदी त्याच प्रतिरूपाचे दोन भाग होतें. रोजची सेवा व वार्षिक सेवा आणि त्या प्रत्येकासाठी मंडपाचा एक भाग नेमका होता. CChMara 377.6
ज्याप्रमाणे स्वर्गारोहणानंतर ख्रिस्त परमेश्वरासमोर आपल्या रक्ताच्या आधाराने पश्चातापी विश्वासू जनांसाठी रदबदली करण्यासाठी सिद्ध झाला, तद्वतच याजकही आपल्या दैनंदिन अर्पणाच्या रक्तसिंचनाने पाप्यांसाठी रदबदली करीत असे. CChMara 378.1
जरी ख्रिस्ताच्या रक्तामुळे पश्चाताप पाप्याला नियमशास्त्राच्या दंडापासून मुक्ति मिळत असें, तरी त्याचे पाप मात्र लोपून जात नव्हते, अखेरचे प्रायश्चित्त मिळेपर्यंत तें पवित्रस्तानांत नोंदलेले राहील. तसेच पाप-अर्पणाच्या रक्तामुळे पाप जरी नाहीसे केले जाई तरी प्रायश्चित्ताच्या दिवसापर्यंततें पवित्रस्थानांत नोंदलेले राही. CChMara 378.2
अखेरचे प्रतिफळ देण्याचा तो महान दिन येईल तेव्हां, ‘त्या पुस्कात जे लिहीले होतें त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ठरविण्यात येईल. ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताच्या रक्तामुळे खर्यखुर्य पश्चातप्त झालेल्यांची पापे स्वर्गीय पुस्तकांतून पुसून टाकली जातील. अशा प्रकारे पवित्रस्थानांत केलेली पापाची नोंद काढून टाकिल्यावर तें शुद्ध होऊन जाईल. प्रायश्चित्ताचे हें महान् कार्य अगर पापाचे क्षालन अशा प्रतिरूपाने दर्शविण्यात येत असें कीं प्रायश्चित्ताच्या दिवशी पृथ्वीवरील पवित्रस्थान पापार्पणांच्या रक्ताने भ्रष्ट झालेल्यांची पापे पुसून टाकीत असें व त्याची अशी शुद्धि होत असें. ज्या कार्याशी आम्ही अत्यंत परिचित असावयास पाहिजे आहे तिकडे आमचे मन लागू नये म्हणून मने गुतवून टाकण्यासाठी सैतान अगणित युक्त्या शोधीत राहतो. ज्या महान सत्याद्वारे प्रायश्चित्त देणारे अर्पण आणि सर्वसमर्थ मध्यस्थ आमच्या नजरेसमोर येईल त्या त्यांचा ह्या फसवेगिरीच्या नायकाला तिरस्कार वाटतो. येशूसमोर आणि त्याच्या सत्यापासून मने झुकविण्याच्या कामी सर्व कांही मजवरच अवलंबून आहे हें तो जाणून असतो. CChMara 378.3
आपल्या जखमी हस्तांनी व ठेवलेल्या शरीराने तो त्याच्याप्रीत्यर्थ मध्यस्थी करितो जे त्याला अनुरूप इच्छितात त्या सर्वांना तो असें स्पष्ट सांगतो कीं, “माझी कृपा तुला पुरे आहे.” मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व मजपासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विश्रांती मिळेल; कारण माझे जू सोईचे व माझे ओझे हलके आहे. म्हणून आपल्या उणिवा असाध्य आहेत असें कोणालाही वाटू नये त्या भरून काढण्यासाठी देव विश्वास व कृपा पुरवील. CChMara 378.4
प्रायश्चित्ताच्या महान् दिवशी आज आम्ही जगत आहों, त्या लाक्षणिक उपासनेत असें दिसून येत होतें कीं, इस्राएल लोकांसाठी प्रमुख याजक प्रायश्चित्त करीत असतांना सर्वांनी आपापल्या पापाबद्दल पश्चाताप करून दु:खी व्हावे व प्रभूसमोर लीन व्हावे याची आवश्यकता होती, तसे जर झाले नाही तर लोकांपासून तें बहीष्कृत होत असत तद्वतच जीवनी पुस्तकात आपले नाव राहूं देण्यासाठी आजच ह्या थोडक्या राहीलेल्या कृपेच्या काळांत लोकांनी दु:खी अंत:करणानी आपापली पापें पदरी घेऊन परमेश्वराला खुच्या पश्चात्तापाने शरणागत जावे. खोल विचाराचे, निष्ठावंत आणि संशोधन करणारे मन पाहीजे आहे. नामधारी ख्रिस्ती लोकांनी आपली उथळ व निरर्थक मनोवृत्ति सोडून दिली पाहीजे. बडेजावपणाच्या दुष्ट मनोभावना सोडून देण्याकरीता सर्वांना आस्थेने झगडावे लागेल. सिद्धतेचे कार्य व्यक्तिवाचक आहे. समुह करून आमचे तारण व्हावयाचे नाही. एकाच्या अंगी असलेली शुद्धता, भक्तिशीलता हें गुण जर दुसर्याच्या अंगी नसतील तर त्या एकाचे गुण दुसर्यची भरपाई करूं शकत नाहीत. जरी सर्व राष्ट्रांचा ईश्वरासमोर न्याय केला जाईल तरी तो प्रत्येक व्यक्तीची इतकी बारकाईने चौकशी करील कीं जणू काय त्या व्यक्तिशिवाय दुसरे कोणी जिवंतच नाही प्रत्येकाची कसोटी झालीच पाहीजे व प्रत्येकजण डागविरहीत अगर सुरकुतीविरहीत आढळून आला पाहीजे. CChMara 378.5
प्रायश्चित्ताचे कार्य संपवीत असताना जी दृश्ये दिसून आली ती गभीर होती. या प्रकरणी असलेले हितसंबंध महत्वाचे असतात. सध्या वरील पवित्रस्थानात न्याय चालूं आहे. पुष्कळ वर्षांपासून हें कार्य चालूच आहे. लवकरच किती लवकर हें कोणास ठाऊक नाही. हा न्याय जिवंताचाही आहे. ईश्वराच्या भयप्रद समक्षतेत आमची जीवनचरित्र चौकशीसाठी आहेत. दुसर्यांचे काहीही असो या वेळी प्रत्येकाने आमच्या तारणाच्याच्या इषाच्याकडे लक्ष देणे अवश्य आहे. जागृत रहा, प्रार्थना करा. कारण तो समय केव्हा आहे हें तुम्हांस ठाऊक नाही.” CChMara 379.1
चौकशीच्या न्यायाचे कार्य संपल्यावर सर्वांच्या भवितव्यात जीवन आहे. कीं मरण आहे हें ठरून चुकेल. स्वर्गीच्या ढगांत प्रभु दिसण्याच्यापूर्वी थोड्याच अगोदर कृपेचा काळ संपून जाईल. ख्रिस्त हा प्रकटीकरणांत त्या भावी काळाकडे पाहून सांगतो कीं, “दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो, मलीनतेने वागणारा मनुष्य स्वत:ला मलीन करीत राहो; धर्माप्रमाणे वागणार मनुष्य धर्म आचरीत राहो, पवित्रचरणी मनुष्य स्वत:ला पवित्र करीत राहो, पाहा मी लवकर येतो; आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे.” CChMara 379.2
नीतिमान् आणि नीतिभ्रष्ट आपापल्या मर्त्य अवस्थेत अजूनही जगांत जगत राहतील, मानवप्राणी शेतवाड्या करितील, घरेदारे उभारतील, खातील व पितील. वरील पवित्रस्थानांत ज्याच्यासबधीचा न बदलणारा निर्णय घेतलेलाही आहे याविषयी तें सर्वच अज्ञान असें राहतील, CChMara 379.3
मध्यरात्री येणार्य चोराप्रमाणे ती निर्णायक घटीका येईल व तिच्यात प्रत्येक माणसाचे भवितव्य ठरलेले असेल, दोषी (पापी) मानवासाठी देऊ केलेले देयेचे दान तेव्हां कायमचे काढून घेतलेले असेल. CChMara 379.4