कलीसिया के लिए परामर्श
वैद्यकीय सेवेमुळे सत्यासाठी खुली होणारी द्वारे
मिशनरी परिचारिकेला अनेक बाजूंनी सेवा कार्य चालविता येईल. कुटुंबा कुटुंबात जाऊन त्यांच्यामध्ये सत्याविषयीची जागृती करण्याचे प्रसंग चांगल्या सुशिक्षित दाईला लाभतात. बहचतेक प्रत्येक समाजामध्ये अशी पुष्कळ मंडळी असतें कीं ती धार्मिक उपासनेला जात नाही. अशांना जर शुभवर्तमान द्यावयाचे असेल तर तें त्याच्या घरीच जाऊन द्यावयास पाहिजे त्याच्या भेटीचा एकच असा योग असतो कीं त्यांच्याकडे शारीरिक आपत्ती निवारण्याचा प्रसंग आला पाहीजे. मिशनरी परिचारिका आजाण्यांची सेवा करितांना व गरिबाना संकटमुक्त करताना त्यांना अशा अनेक संधी मिळतील कीं त्यांच्या सह त्यांना प्रार्थना करिता येतील, देवाच्या वचनातून काही वाचून दाखविता येईल व तारणाच्याविषयी त्यांशी बोलता येईल. क्षुद्र मनोविकारानी जडलेले छंद ज्याना आटोक्यात ठेवता येत नाहीत अशा लाचार लोकासह व त्याच्यासाठीं त्याना प्रार्थना करिता येईल. जे आशाहीन आणि हताश झालेले आहेत अशाच्या पुढे त्यांना आशेचा प्रकाश पाडता येईल. त्यांच्या नि:स्पृह व्यवहारात दिसून येणारी त्यांची नि:स्वार्थी प्रति पाहन या संकटग्रस्तांना ख्रिस्ताच्या प्रीतीवर विश्वास ठेवणे सुलभ होईल. CChMara 337.2
जीं माणसे एका काळीं सुसंस्कृत मनाची, उत्कृष्ट लायकीची होती पण आता ती अवनीतीत पडलेली आहेत अशा पतित जनासाठी जर योग्य प्रकारचे परिश्रम केले तर त्याची सुटका वैद्यकीय मिशनरी कार्याकडून होऊ शकेल असें मला दर्शविण्यात आलेले आहे. सहानुभूतीपर काळजी घेउन मानवांच्या शारीरिक आपत्ति निवारण केल्यावर येशूत जे सत्य आहे तें त्यांच्यापुढे सादर करावयाचे असतें जी मानवी साधने असल्या आत्म्यासाठी परिश्रम करीत आहेत त्यांच्यासह पवित्र आत्मा कार्य व सहकार करीत आहे आणि आपल्या धार्मिक विश्वासाचा पाया हा भरभक्कम खडकावर आहे म्हणून कित्येकांना समाधान वाटेल. CChMara 337.3
शरीराला प्रवेश मिळावी म्हणून द्वारे उघडण्यासाठी उजव्या हाताचा उपयोग करण्यांत येतो, वैद्यकीय मिशनरी कार्याला हाच भाग उचलावयाचा आहे. सत्याचा स्वीकार मार्ग प्रमुखत: त्याना सिद्ध करावयाचा आहे. हाताविना शरीर निरूपयोगी असतें शरीराचा आदर करताना साहाय्य कारक हस्तानाही आदर दिला पाहीजे. कारण ती ही महत्वाची साधने आहेत कीं त्याच्याशिवाय शरीर कांही एक करूं शकत नाही. जे शरीर उजव्या हस्ताची बेपर्वाई करून त्याचे साहाय्य घेत नाही, त्याच्याकडून कांही एक साध्य होत नाही. CChMara 337.4
शुभवर्तमान जीवितावरून दाखविणे व त्यांतील तत्वे शाबूत राखणे म्हणजे जीवनाचा स्वाद जीवनासाठी कामी आणणे होय. जो कोणी शुभवर्तमानाविषयी नुसता उपदेशच करतो त्याच्यासाठीं जी द्वारे बंद आहेत ती बुद्धिवान् वैद्यकीय मिशनरीसाठी खुली राहतील, शारीरिक यातनांना लाभणाच्या मुक्तीच्याद्वारे देव अंतर्यामाना भेट देतो. सत्याचे बी मनांत पडते व देवच त्याला पाणी घालतो. त्या बियेत जीव आहे कीं नाही हें समजून येण्यास धीर लागतो, पण अखेरीस तें वाढू लागते व अविनाशी जीवनासाठी तें फलद्रूप होते. CChMara 338.1