कलीसिया के लिए परामर्श

273/318

सर्वांनी संघटीत होण्याचे कार्य

शुभवृत्त-प्रचारक संवकांनी वैद्यकीय मिशनरी सेवेत संघटत व्हावे. सत्य घोषणेच्या कार्यात जो कलुषितपणा दिसून येतो तोनष्ट करण्यासाठी असला संघटीतपणा अवाय आहे असें मला नेहमीच सांगण्यांत येते. CChMara 336.2

शुभवृत्ताच्या सेवकाला औषधोपचाराची माहिती असली तर त्याची सेवा दुपटीत यशस्वी होऊन जाईल. CChMara 336.3

लोकांचा कोणताहि हुद्दा असो, त्यांची कोणतीही परिस्थीती असो त्यांना त्यांच्या अवस्थेत शक्य तेवढी मदत करणे हीच शुभवर्तमान प्रचारक सेवा होय एखाद्या सेवकाला आजार्‍यांच्या घरी जाणे आवश्यक होईल व त्याला म्हणावे लागेल कीं, ” तुमची मदत करावयाला मी तयार आहे व शक्य तें मी करूं शकेन. मी कांही वैद्य नाही. धर्मसेवक आहे, आजार्‍यांची व दुखितांची सेवा करणे मला आवडते.” जे शरीराने आजारी असतात तें बहुतेक नेहमी अंतर्यामानेहि व्यथित असतात म्हणजे अंतर्याम रोगी असले कीं शरीरहि रोगी असते. CChMara 336.4

शुभवर्तमानाची सेवा व वैद्यकीय सेवा यांत कांही एक अंतर असावयास नको. वैद्याने सेवकासह सारखेच परिश्रम करावयास पाहिजेत. तें अत्म्याच्या उद्धारासाठी जितके आस्थेवाईक व कोटेकोर पाहिजेत तसेच तें शारीरिक आरोग्यवर्धनासाठी ही असावयास पाहिजेत उभय मानसिक व शारीरिक ज्ञान घेऊन होण्यासाठी ज्या सुसंधि असतात त्याविषयी कित्येकांचे विरूद्ध मत असतें. त्याचे म्हणणे असें पडते कीं, ज्याअर्थी वैद्यकीय मिशनरी आजार्‍यांसाठीच आपला वेळ खर्चितात त्याअर्थी त्याच्या पोषणार्थ दशाचा विनियोग करण्यांत येऊ नये. असल्या विधानाना उत्तरादाखल मला असें सुचविन्यात आलें आहे कीं, परिस्थितिची काहीएक जाणीव न घेण्याइतके मन संकुचित करण्यांत येऊ नये. शुभवर्तमानाचा सेवक जर वैद्यकीय मिशनरीही असला तर त्याला शारीरिक यातना नष्ट करता येतात व तो अधिक कार्यक्षम कायकर्ता ठरतो. शुभवर्तमान सेवक या नात्याने त्याचे कार्य संपूर्ण होतें. आमच्या शहरांतून अवांतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही असा प्रवेश सुशिक्षित वैद्यांना मिळेल असें प्रभुचे स्पष्ट सांगणे आहे. आरोग्य संरक्षणाचा संदेश जनतेला द्या. यामुळे लोकांत वजन पडेल. CChMara 336.5

बुद्धिवान वैद्याकडून जर पविशास्त्रामधील तत्त्वे सादर करण्यांत आली तर लोकांना फार भारदस्त वाटतील. वैद्य व शुभवृत-प्रचारक आपली उभय सेवा जेव्हां एकत्रित करितो तेव्हा त्याच्या कार्यात सफलता व सामर्थ्य आढळून येते. लोकांच्या दृष्याने त्याचे कार्य स्तुतीस पात्र असते. CChMara 336.6

अशाच प्रकारे आमच्या वैद्यकीय सेवकांनी परिश्रम करावेत. सुवार्तिक म्हणून जेव्हां प्रभुंचे काम करितात तेव्हां येशू हा आत्म्याला कसे आरोग्यदान देऊ शकतो त्यांचे शिक्षण त्यांनी द्यावे. आजाच्यांसाठी विश्वासयुक्त प्रार्थना कशी करावी हें प्रत्येक वैद्यकीय सेवकाला अवगत असले पाहिजे व त्यासह त्यानें योग्य असें औषधोपचार केले पाहिजेत. यांत आपण देवाचे धर्मप्रचारक म्हणून सेवा करीत आहो असें समजून पश्चाताप अंत:करणनाचा पालट यासंबधी तसेच आत्म्याचे शरीराचे तारण याविषयीही शिक्षण द्यावयास पाहिजे. असल्या त्याच्या संघटीत परिश्रमांनी त्याचा अनुभव विस्तीर्ण होईल आणि त्याचे वजनही भारदस्त होईल. CChMara 337.1