कलीसिया के लिए परामर्श
“डुकर तुम्हांस निषिद्ध आहे”
डुकराचे मज्जातंतु परान्नपुष्ट असतात. परमेश्वराने डुकराविषयी असें म्हटले आहे कीं, तो तुम्हांस निषिद्ध आहे; तुम्ही त्याचे मास खाऊं नये, त्याच्या शवासं शिवू नये.” अनुवाद १४:८ ही आज्ञा देण्याचे कारण असें होतें कीं डुकाराचे मांस अन्नासाठीं नालायक होतें. डुकर अंगी असतात (भग्याचेच काम करीत) व त्याच कार्यासाठी त्यांचा उपयोग होतो. कधींही व कोणत्याही कारणामुळे मानवानी त्याचे मांस भक्षावयाचे नव्हतें जो प्राणी स्वभावतः घाणेरडा आहे व जेव्हां तो प्रत्येक तिरस्कारणीय गोष्टीवर जगतो, तेव्हां असल्याचे मांस भक्षणासाठी अगदीं अशक्य असतें. 7 CChMara 305.1
डुकराचें मांस (पोर्क) हा जरी अत्यंत आवडता खाद्य पदार्थ आहे तरी तो अत्यंत विघातक असा आहे. आपल्या अधिकाराचा बडेजाव दर्शविण्यासाठी देवाने इब्री लोकांना इकराचे मास खाण्याची बदी केली नव्हती. परंतु मानवासाठी तो योग्य असा खाद्य पदार्थ नव्हता. त्याच्या सेवनाने शरीरांत गंडमाळेचा व विशेषत: उष्ण प्रदेशांत रक्तपित्ती व असल्या आजाराचा प्रादुर्भाव होण्यासारखा आहे. थंड प्रदेशापेक्षा उष्ण कटिबंधात त्याचा उपसर्ग अधिक होण्यासारखा असतो. अवांतर कोणत्याही मांस भक्षणापेक्षा डुकराचे मांस रक्तात फार वाईट स्थिति निर्माण करिते. जे पोर्कचा मनसोक्त उपयोग घेतात त्यांची प्रकृति आजारमयच असतें. 8 CChMara 305.2
विशेषत: मेंदूतील नाजूक व सूक्ष्म पेशीतंतु इतके दुर्बळ होऊन गोंधळात पडतात कीं त्यांना पवित्र बाबींचा निर्णय करता येत नाहीं, सलट तसल्या बाबी सर्वसाधारण बाबींप्रमाणे खालच्या पातळीवर आणिल्या जातात. 9 CChMara 305.3
जे उघड्यावर पुष्कळसा व्यायाम घेतात त्याना पोर्क खाद्याचा दुष्परिणाम भासून येत नाही. परंतु ज्यांचे काम बहुतेक खोलीतल्या खोलीत व बैठ्या स्वरुपाचे असतें व ज्यांचे श्रम मानसिक असतात त्यांना पोर्क भक्षणाचा परिणाम अधिक जाणवतो. 10 CChMara 305.4