कलीसिया के लिए परामर्श
मांसाहाराने रोगांची प्रगति दसपटीनें वाढलेली आहे 4
जनावरें आजारी असतात व त्याचे मास खाऊन आम्ही आमच्या शरीरात व रक्तात रोगांचे बी लावीत राहातो. नंतर मग हिवतापाच्या वातावरणात आल्यावर तें आम्हांला अधिक जाणवू लागते. तसेच वाढत्या बाजाराच्या सार्थीत व सांसर्गिक आजार-प्रतिबंधनांची शक्ति आम्हात नसते. CChMara 304.5
देवाने मला जो कांही प्रकाश दिलेला आहे त्यावरून कॅन्सरचा व ग्रंथींच्या आजारांचा फैलाव मेलेल्या मासाचे अपरिमित भक्षण केल्याने पुष्कळसा झालेला असतो CChMara 304.6
पुष्कळ ठिकाणीं मासे घाणीवर जगत असल्यामुळे तेहि आजाराचे मूळ असतात. मोठमोठ्या शहरातून काढून दिलेल्या घाणरड्या पाण्यातील मासे तर विशेषत: कारणीभूत असतात. गटारांतील पाण्यांत राहिलेले मासे दूरच्या पाण्यात जातात व स्वच्छ व ताज्या पाण्यातील म्हणून हें मासे धरले जातात. अशा प्रकारे कसल्याही संकटाचा धोका मनांत न आणिता जेव्हां तें खाण्यात येतात तेव्हां तें आजाराला व मरणाला कारणीभूत होतात. 5 CChMara 304.7
मांसाहाराचे परिणाम ताबडतोब ध्यानात येण्यासारखे नसतात म्हणून तें अपायकारक नाहींत असें काहीं ठरत नाहीं. मासाच्या भक्षणाने रक्त दृषित झालेले व आपण आजारग्रस्त झालेलो आहो असें फार थोडक्यांना वाटते. मांस भक्षगाने पुष्कळजण आजारी होऊन मरतात, परतु त्यांना अगर इतरांना खर्या कारणाचा संशयसुद्धा येत नाहीं. 6 CChMara 304.8