कलीसिया के लिए परामर्श

241/318

प्रकरण ५० वें - मांसाहार

परमेश्वरानें आमच्या प्रथम मातापितरांना आपल्या मनोदयाप्रमाणे अन्न दिले व तेच मानवजातीने खावे अशी त्याची इच्छा होती. कोणत्याही प्राण्याचा जीव घेणें हें त्याच्या योजनेविरहित होतें. एदेनांत मरण म्हणून कांही नव्हते. बागेतील फळांच्याच अन्नाची मानवाला गरज होती. मासाहाराची परवानगी देवाने मानवाला जलप्रलयापूर्वी दिलेली नव्हती. मानवाचे पोषण होईल अशा सर्व गोष्टींचा जलप्रलयांत नाश झाल्यामुळे त्याची गरज पाहून नोहाने तारवांत घेतलेले शुद्ध प्राणी खाण्याची नोहाला परवानगी देण्यांत आली. परंतु मानवासाठीं अन्न म्हणून मांस हें कांहीं आरोग्यकारक खाद्य नव्हतें. CChMara 303.1

जलप्रलयानंतर मांसाहारावरच मुख्यत: लोक जगत होतें. मानवाचे मार्ग भ्रष्ट होऊन गेले. आपल्या उत्पन्नकर्त्यांच्या विरुद्ध व आपल्याच धोरणाने जगावे असा अहंकार मानवी मनांत आलेला होता. दीर्घायुष्याच्या या मानवजातीने मासाहार घेऊन अल्पायुषी व्हावे म्हणून देवाने त्यांना तो आहार घेऊ दिला. जलप्रलयानंतर लवकरच मानवजात संख्येने व आयुष्याने झपाट्यानें कमीतकमी होऊ लागलीं. 1 CChMara 303.2

एदेनांत मानवाच्या अन्नाची निवड करून प्रभूने त्यांच्यासाठी उत्कृष्ट अन्न कोणते हें दाखवून दिले. इस्राएलांच्या निवडींत परमेश्वराने त्यांना तोच धडा शिकविला. त्यांच्याद्वारे जगताला आशीर्वाद व ज्ञान द्यावे अशी त्याची इच्छा होती. त्याच उद्देशाने त्यानें त्याच्यासाठीं अन्नाची तरतूद केली त्यांना मासाहार दिला नाहीं तर मात्रा म्हणजे “स्वर्गीय अन्न’ दिले. परंतु पुढे त्यांच्यांत असंतोष वाढून मिसराप्रमाणे आम्हांला मासपात्रे मिळत नाहीत म्हणून तें कुरकुर करूं लागले. यामुळे त्यास मासाहार देण्यांत आला पण तोहि तात्पुरताच होता. त्या अन्नाने आजाराची साथ उद्भवली व हजारों लोक मरणोन्मुखी पडले. तरीही पण मांसविरहित अन्न कदापि संतोषाने मान्य करण्यांत आलें नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असंतोष व कुरकुर याचे तें अद्याप कारण म्हणून चालूच आहे व तें अन्न आता पक्क होऊन गेले आहे. CChMara 303.3

कनान प्रदेशी त्यांची वस्ती झाल्यावर इस्त्राएलाना मांसाहाराची परवानगी देण्यांत आली होती. त्यावरुन घडणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी त्या परवानगींत दक्षतापूर्वक मनाई केलेली होती. डुकराचे मास मना केलेले होतें. त्याचप्रमाणे अशुद्ध अशा पशुपक्षाचे व माशाचे मांस खाण्याचा मज्जाव केलेला होता. परवानगी दिलेल्या मासांतील चर्बी व रक्त याविषयी कडक बंदी घातलेली होती. CChMara 303.4

निरोगी असतील अशाच जनावरांचा मांसाहार मान्य करण्यांत आलेला होता. ज्या जनावराला फाडण्यात आलें होतें. जे मरून गेले होतें. अगर ज्यांचे रक्त काळजीपूर्वक काढून टाकलेले नव्हते, अशाचा आहारासाठी उपयोग करावयाचा नव्हता. CChMara 304.1

अन्नाविषयींची दैवी योजना झुगारून दिल्यामुळे इस्राएलांना फार मोठे नुकसान सहन करावे लागले. मांसाहार त्यांना हवा होता व त्याचे परिणामहि त्यांना भोगावे लागले. शीलासंबंधी देवाचा जो उद्देश होता तो त्यांना गाठता आला नाहीं अगर त्याचा हेतूहि त्यांना पार पाडता आला नाहीं प्रभूनें “त्यांच्या मागण्याप्रमाणे त्यास दिले, पण त्याचा जीव झुरणीस लाविला.” (स्तोत्र १०:६:१५) आध्यात्मिकतेपेक्षा जगिकपणाचे मोल त्यास अधिक वाटले आणि परमेश्वराच्या उद्देशांत पवित्रतेची जी भारदस्ती होती ती त्यांना साध्य करिता आली नाहीं. CChMara 304.2

मांस हेच ज्याचे खाद्य आहे तें जसे काय वापरलेले अन्नधान्य व भाजीपाला हीं खात आहेत. कारण जनावर पहिल्यानें त्यांवरच आपली उपजीविका करिते. धान्यांतील व भाजीपाल्यांतील जीवन जनावराच्या पोटात जाते व त्या प्राण्याचे मास खाऊन तें आम्हांकडे येऊन पोहोंचते देवाने आमच्या उपयोगासाठी दिलेले अन्न जर सरळ आमच्याच पोटात गेले तर तें किती अधिक हितावह होईल! 2 CChMara 304.3