कलीसिया के लिए परामर्श
भुकेवर व मनोविकारावर ताबा
मोहजालांपैकी ज्या अत्यंत भारी मोहाला मानवाला तोंड द्यावे लागते. तो मोह भुकेंतून उद्भवलेला असतो. मनाचे व शरीराचे गूढ व अद्भुत नाते आहे. त्याचा एकमेकांवर आघात होतो. आपली शरीरघटना निरोगी ठेवावी. तिचे बळ वाढवीत राहावे अशासाठीं कीं या सजीव यंत्रघटनेचा एक एक विभाग सुसंगतींत नांदाव याचा अभ्यास आमच्या जीवन चरित्रांतील प्रथम पाठ व्हावा. शरीराची हेळसांड म्हणजेच मनाची हेळसांड होय. देवाच्या लोकांनी आपली शरीरें रोगीट व आपली मने खुजट राहूं देणे हें काहीं देवाच्या गौरवासाठीं चालूं शकत नाहीं. आरोग्यचा बळी देऊन लहरींच्या गुंगींत राहाणे हा ज्ञानेंद्रियाचा दुष्ट दुरुपयोग होय. आत्मसंयमनाच्या कोणत्याही लहरींत मग तो खाण्यापिण्याची का असत नाहीं, जे मग्न झालेले असतात तें आपल्या शरीर सामर्थ्याचा दुरुपयोग करितात व आपली नैतिक शक्ति दुबळी करितात. शरीरशास्त्राच्या नियमांच्या उलंघनाने त्यांना जे प्रायश्चित मिळावयाचे तें त्याच्या पदरात पडेल. 27 CChMara 301.5
वाजवीपेक्षा अधिक अन्नसेवनाने आणि विषयासक्त मनोविकारांच्या नादाने पुष्कळते लोक मानसिक व शारीरिक दृष्ट्या श्रम करण्यास नालायक झालेले असतात. विषयवासना बलवत्तर होतात पण नैतिक व आत्मिक स्वभाव बलहीन झालेला असतो. त्या महान् शुभ्र सिंहासनाभोंवती आम्ही उभे राहूं. तेव्हां आमच्या चरित्रांची कसली नोंद दृष्टोत्पत्तीस येईल, त्यांना लाभलेल्या देवदत्त शक्तींना हिनकस केले नसते तर आपण काय होऊन गेलों असतों में त्याना दिसून येईल. देवाने त्यांच्या हवाली केलेले सर्व शारीरिक व मानसिक सामर्थ्य देवासाठीच खर्च केले असतें तर बौद्धिक थोरवी किती उच्चतेला जाऊन पोचली असती हें त्यांना कळून येईल. पश्चात्तापाच्या मानसिक तीव्र वेदना होत असतो. आपण परत जाऊन पुन: एकदा जगावें अशी त्यांना बलवत्तर इच्छा होईल. 28 CChMara 301.6
प्रत्येक खरा ख्रिस्ती मनुष्य आपल्या भूकवासनेवर व मनोविकारावर ताबा ठेवील. भुकेच्या दास्यत्वापासून त्याची सुटका होईपर्यंत त्याला ख्रिस्ताचा अस्सल व आज्ञांकित सेवक होता येणार नाहीं. भुकेच्या व मनोविकाराच्या फंदामुळे सत्याचा त्याच्या अंतर्यामावर कांहीं परिणाम घडणार नाही. जेव्हां एखादा मनुष्य भुकच्या व सक्त मनोविकाराच्या ताब्यात गेलेला असतो तेव्हां सत्याच्या जिव्हाळ्याला व सामर्थ्याला त्याला शुद्ध करणे अशक्य होय. 29 CChMara 302.1
अरण्यामध्ये ख्रिस्ताने दीर्घ उपोषण करून जो मोठा अर्थ प्रगट केला तो अशासाठीं कीं आवश्य तो रचनाकार व मितव्ययीपणा आम्हीं शिकून घ्यावा. या कार्याची सुरुवात जेवताना करावी आणि आमच्या चरित्रात सर्व बाबींमध्ये कडक रीतीने अमलांत आणावी. जगाचा उद्धारक स्वर्ग सोडून जगांत आला अशासाठीं कीं त्यानें मानवाला त्याच्या अशक्तेतून वर काढावे व येशूच्या शक्तीने त्यानें असें सबळ बनावे कीं भुकेच्या व मनोविकाराच्या मोहांवर त्यानें विजयी व्हावे व प्रत्येक गोष्टींमध्ये तो यशस्वी व्हावा. 30 CChMara 302.2
*****