कलीसिया के लिए परामर्श
मायभाषेकडे दुर्लक्ष करतां कामा नये
शास्त्रीय ज्ञानप्राप्तीमधील उद्देशापेक्षा शैक्षणिक शाखेच्या प्रत्येक शाखेतील उद्देश साध्य करणे अधिक महत्वाचे आहे. उदाहरणार्थ भाषाविषय घ्या. परकीय भाषा ह्या, मग त्या प्रचलित असोत वा मृत असोत, त्या अवगत करून घेण्यापेक्षा आपली मातृभाषाच सरळ व शुद्ध लिहिता बोलता येणें अधिक महत्त्वाचे होय, परंतु व्याकरणाच्या नियमानुसार प्राप्त केलेल्या ज्ञानाला वरिष्ठ उद्देशाने साध्य केलेल्या भाषा-ज्ञानाची बरोबरी करता येणार नाहीं. असल्या प्रकारच्या अभ्यासावर जीवनातील कल्याण अगर नुकसान अवलंबून असतें. 39 CChMara 284.2