कलीसिया के लिए परामर्श
स्वर्गीय गुणलक्षणें पृथ्वीवरच साध्य केली पाहिजेत
फसूं नका. देवाचा उपहास व्हावयाचा नाहीं. पावित्र्यच मात्र तुम्हांला स्वर्गप्राप्तीसाठी सिद्ध करील. एकटी निर्भेळ व अनुभवजन्य धार्मिकताच मात्र तुम्हांला शुद्ध व भारदस्त शील देऊ शकते व अगम्य अशा प्रकाशात बसणाच्या देवाच्या सान्निध्यात घेऊन जाते. स्वर्गीय गुणधर्म पृथ्वीवरच हस्तगत केले नाहीत तर तें कदापि लाभणार नाहीत. म्हणून आताच तें साध्य करण्यास सुरवात करा पाहूं. आता नसले तरी पुढे आस्थेवाईक प्रयत्नाने तें अधिक सुलभ होऊ शकतील अशी धर्मड मारू नका. एकेक दिवस तुम्हांला देवापासून दूर दूर घेऊन जात आहे. तुम्ही अद्याप दाखविलेली नाही. अशा आस्थेने सार्वकालासाठीं सिद्ध व्हा. पवित्रशास्त्राविषयींची आवड अधिक होईल, प्रार्थनासंघ अधिक पसंत पडेल, चितनमनन करण्याचा प्रसग अधिक मान्य वाटेल आणि सर्वात अधिक म्हणजे आत्म्याने देवाशीं समागम करण्याच्या घटकेची सधि अधिक आवडेल अशा प्रकारे तुम्ही आपाल्या मनाला सुसज्ज करीत राहा. वरील गृहामध्ये स्वर्गीय गायकमडळासह सामील होता यावे म्हणून स्वर्गीय मनभावनांचे (मनोविकाराचे) होत राहा. 5 CChMara 257.2