कलीसिया के लिए परामर्श
श्रेष्ठ प्रतीच्या आत्मिक प्राप्तिसाठीं लगट करा.
वरिष्ठ प्रतीच्या प्राप्तीसाठी आणि दैवी गोष्टींच्या वाढत्या ज्ञानासाठीं प्रीतींतील निर्भेळ सत्व आत्म्याला गति देत राहील अशासाठीं कीं तो आत्मा पूर्णावस्थेप्रत जाईपर्यंत समाधानीच राहाणार नाही. या जगांतील हलकट व नश्वर गोष्टी साध्य करण्यासाठी पुष्कळसे नामधारी ख्रिस्ती जशी धडपड करितात तितक्याच महत्वाकांक्षेने, आस्थेनें व चिकाटीने दैवी गोष्टींच्या लाभासाठीं आत्मिक सामर्थ्याची त्यांना गरजच भासत नाहीं. ख्रिस्ती म्हणविणार्य जनसमुहांना आपण आत्मिक बाबींत खुजे राहिलो तरी चालेल असें वाटते. प्रथम देवाचे राज्य व त्याची धार्मिकता मिळविण्याचे त्यांच्या मनी नसते, यामुळे देवत्व हें त्यांना एक गूढच असतें, याचा त्यांना उलगडाच होत नाहीं. अनुभव-जन्म ज्ञानांत ख्रिस्त त्यांना अज्ञात असतो. CChMara 256.3
दैवी बाबींविषयी, आपल्या खुजेट व पगु अवस्थेविषय जे खूप आहेत अशाना एकदम थोड्या वेळासाठी स्वर्ग-लोकी नेण्यांत यावे व त्या ठिकाणी उच्च दर्जाच, पवित्रतेची आणि पूर्णत्वाची जी स्थिति नांदत आहे ती त्यांना पाहून घेऊ द्यावी. प्रत्येक जण प्रीतिमय असा दिसून येईल; आनंदाने प्रत्येक चेहरा खुललेला दिसेल; देवाच्या व कोंकर्याच्या सन्मानार्थ मंजूळ स्तुति त्याच्या मुखचयेंतून प्रज्वलित होणारी निरंतरची प्रकाश- किरणें संतमंडळींवर कशी झळकत आहेत हें त्यांना दिसून येईल. अजून अधिक थोर आणि अधिक मोठा आनंद अनुभवायाचा आहे, हें त्यांना कळून येऊ द्या. देवापासून प्राप्त होणारे सौख्य जितकें अधिक त्यांना मिळेल तितकें अधिक सार्वकालिक सौख्यप्राप्तीसाठी त्यांची पात्रता अधिक वाढेल. या प्रकारें अनिर्वाच्य आशीर्वादाच्या आणि गौरवाच्या मुळस्थानापासून त्यांना निरंतरच नवीनवीन मोठमोठी सामुग्री मिळविणे चालूं ठेविता येईल, मी असें विचातों कीं असली मंडळी स्वर्गीय-समुहामध्ये मिसळून जाईल का? त्यांच्या संगीतात विभागी होईल का? देवापासून व कोंकर्यपासून उद्भवणारे शुद्ध श्रेष्ठ व अत्यानंदमय गौरव त्याच्यांने पाहवेल का? अगदीच नाहीं ! त्यांना स्वर्गीय भाषा अवगत व्हावी म्हणून त्यांचा सत्वपरीक्षेचा (उमेदवारीचा) काळ वर्षानुवर्षे वाढविण्यात आला होता अशासाठीं कीं “वासनेपासून उत्पन्न होणारी जगांतील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे’ २ पेत्र १:४ तथापि आपली मानसिक सामथ्ये आणि आपल्या माणुसकीची शक्ति त्यांच्या स्वत:च्याच धंद्यात त्यांनी गुंतविलेली होती. मन मोकळेपणाने त्यांना देवाची सेवा करता आली नाही व तोच आपल्या सर्व शक्ति त्यासाठीच दिल्या पाहिजेत, देवाच्या विचाराला तर ओझरतें स्थान द्यावयाचे अखेरचा निर्णय करून असली मंडळी पालटेल का “जो पवित्र आहे, त्यानें अधिक पवित्र व्हावें” “जो अमगळ आहे, त्यानें अधिक अमंगळ व्हावें.” अशीच वेळ येत आहे. CChMara 256.4
आध्यात्मिक आचरणांत रमून जाण्यासाठी ज्यानीं आपल्या मनाला तालीम दिलेली आहे अशांनाच स्वर्गात घेण्यात येईल व तेथील पवित्रता आणि अलौकिक गौरव पाहून तें दबून जाणार नाहीत. विज्ञानशास्त्राचे तुम्हांला चागले ज्ञान असेल, भौतिक शास्त्रांशीं तुमचा मोठा परिचय असेल, संगीत-शास्त्रांत व लेखनकलेंत तुमचा हातखंडा असेल, तुमच्या शिष्टाचारांवर लोक प्रसन्न असतील, परंतु स्वर्गाच्या तयारीसाठी ह्यांचा काय उपयोग? देवाच्या न्यायासनासमोर सिद्ध होण्याच्या तरतुदींत ह्यांचे काय? 4 CChMara 257.1