कलीसिया के लिए परामर्श

176/318

प्रकरण ३८ वें - श्रमपरिहारक करमणूक

टीप : ही टीप जरी अनुवादकासाठी उद्देशिलेली आहे तरी ती सर्वसाधारण वाचकांसही सूचक होईल असें अनुवादकास वाटत आहे. रेक्रियेशन आणि अम्युझमेंट यांचा अर्थ करमणूक हें जरी समानार्थी शब्द दिसतात, तरी ग्रंथकर्ती श्रीमती व्हाईट यांनी या प्रकरणांत या दोन शब्दांतील सूक्ष्म अर्थभेद दर्शविलेला आहे. तो असा : CChMara 226.1

“रेक्रियेशन यांतील मुळ अर्धात सबळता व पुर्नघटना असा बोध आहे (रे = परत किंवा नव्यानें आणि क्रियेशन = उत्पादन) आमच्या साधारण चिंता व परिश्रम याजपासून आम्ही वेगळे झाल्यावर ही करमणूक आमच्या शारीरिक व मानसिक प्रकृतींना नवीन उत्साहाने व आस्थेने कार्यारंभ करण्यास उत्तेजित करितो म्हणून आम्ही या करमणुकीला श्रमपरिहारक करमणूक म्हणतो. उलट अम्युझमेंट या करमणूकीत गमतीखातर चित्तरंजन असतें आणि वारंवार या रंजनाच्या नादांत व फाजिलपणांत गुंग होऊन आमच्या उपयुक्त कामाकडे आमचे दुर्लक्ष होऊन जाते व आमच्या जीवनांतील विजयी मार्गात ती करमणूक अडखळण आणते.” (इडी २०७). म्हणून आम्ही तिला मौजी करमणूक म्हणतों. CChMara 226.2

भाषांतर करितांना या प्रकरणांत त्या अर्थभेदाकडे लक्ष पुरविले जावे. CChMara 226.3