कलीसिया के लिए परामर्श

175/318

वाढदिवस-ईश्वरी उपकारस्तुतीचा प्रसंग

यहूदी लोकांच्या कारभारात मुलांच्या जन्मदिवशीं प्रभूनें नेमून दिल्याप्रमाणे यज्ञार्पण करीत असत. विशेष खटपट करून आपल्या मुलांना आईबापांनी बक्षिसे द्यावेत अशी प्रथा आज आम्ही पाहातो. जणू मानवांचाच सन्मान करण्यांत यावा म्हणून मुलांसाठी हा सन्मानांचाच प्रसंग करण्यांत येतो. या प्रकरणीं सैतानाचाच हात असतो. मनें व दाने मानवाकडेच वळवावीत अशी त्याची योजना असतें. अशा प्रकारे विशेष प्रकारच्या कृपेचा विषय आपण आहों याकडेच मुलांचे विचार जातात. CChMara 224.5

देवासमोर कृतज्ञ होण्याला कारण आहे हें मुलांना वाढदिवसाच्या प्रसंगी शिकविण्यांत यावे व पुढील वर्षी देवाच्याच कृपेने त्यांची जीवन चरित्रे रक्षिण्यात येतील हें दाखवावे. अशा प्रकारे मौल्यवान धडे देता येतील. आयुष्य, आरोग्य, अन्नवस्त्र आणि विशेष म्हणजे सार्वकालिक जीवनाची आशा याकरिता सर्व कृपादानाचा दाता जो देव त्याचेच आम्ही ऋणी आहो, हें स्पष्ट करावे. ही सर्व दाने देवापासून असून कृतज्ञ मनाने त्या अति थोर हितचिंतकाचे आभार मानले पाहिजेत. देवसुद्धा वाढदिवसांची दानें पसंत करितो. CChMara 224.6

त्यांच्या चरित्रांत गतवर्षी घडलेल्या गोष्टींवर फेरनजर टाकण्यास आणि तत्संबंधी स्वर्गीय ग्रंथात केलेली आहे ती नोंद पाहाण्यास त्याना आनंद वाटेल का याविषयी विचार करण्यास त्यांस शिक्षण द्या. देवाला प्रसन्न करतील अशी त्यांची वागणूक, त्याचे शब्द व त्यांची कामे झालीं असतील का याचा गंभीरपणे विचार करण्याचे त्यास उत्तेजन द्या. यामुळे त्यांची जीवनें अधिकाधिक ख्रिस्तासारखीं व देवाच्या दृष्टांत सुंदर व प्रेमळ अशी करण्यांत आलेली आहेत काय? प्रभूचे ज्ञान, त्याचे मार्ग व त्याच्या आज्ञा याविषयी त्यांस शिक्षण द्या. CChMara 224.7

मी माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना असें सांगत असतें कीं, वाढदिवसासाठीं अगर ख्रिस्तजयन्तीसाठी मला द्यावयाची ती देणगी प्रभूच्या भांडारात टाकण्याची व त्याच्या राज्याच्या प्रस्थापनेसाठी देण्याची परवानगी दिल्याशिवाय ती देण्यांत येऊ नयें. 1 CChMara 225.1

*****