कलीसिया के लिए परामर्श
आईबापांनो, आपल्या मुलांच्या तारणासाठीं एकत्रित होऊन परिश्रम करा.
रोज रोजचें आपलें कामकाज होत असेल तें देव कसे पाहातो आणि उभयतांच्या कामांची देवाच्या अगम्य दृष्टीने कशी तुलना केली जाते, हें आडपडदा उचलून जर आईबापास पाहावयास मिळेल तर ती उभयतां देवाचा निवाडा ऐकून आश्चर्याने थक्कच होऊन जातील. पिता आपल्या परिश्रमाकडे निरभिमानी दृष्टीने पाहील, परंतु माता तो निवाडा पाहून नवीन धैर्य व उत्तेजन घेऊन चतुराईने, चिकाटीने आणि शांत वृत्तीने आपले परिश्रम करूं लागेल. तिला तर याची योग्यता कळून येते. नष्ट व नाहींशा होणार्य गोष्टीकडे पित्याचे मन असतें, आई तर मनें व शील प्रगल्भ करीत राहाते. तिचे परिश्रम तात्पुरते नसून सार्वकालिक स्वरुपाचे असतात. 4 CChMara 210.3
आपल्या मुलांविषयींचे कर्तव्य वडिलाला आईकडे सोपविता येणार नाहीं. तिच्याकडे आहे तेच जर ती करूं लागली तर तिचे ओझे तिला भरपूर असतें. वडिलाकडे व मातेकडे देवाने जें कार्य सोपविलेले आहे तें उभयतांनी ऐक्याने केले तरच त्यांना तें साध्य करता येईल. CChMara 210.4
आपल्या मुलाच्या जीवनकलेसाठी आणि त्यांच्या अमरत्वासाठी वडिलाने द्यावयाच्या शिक्षणाची त्याला टाळाटाळ करिता येणार नाहीं. या जबाबदारींतला त्याचा वाटा त्यानें उचलला पाहिजे. उभय माता व पिता यांना हें बंधनकारक आहे. आपल्या मुलामध्ये हें सद्गुण प्रगल्भ व्हावेत असें जर त्यांना पाहावयाचे असेल तर आईबापांच्या मनीं परस्परांविषयी प्रीति व आदर दिसून आला पाहिजे. CChMara 210.5
मुलांच्या वडिलाने त्यांच्याशी निकट संबंध ठेवावा; आपल्या मुबलक अनुभवाचा त्यांना फायदा घेऊं द्यावी; आणि अशा साध्या व प्रेमळ भाषेंत त्यांशी बोलत असावें कीं तें त्यांच्या अंतर्यामाशी बद्ध होऊन जातील. त्यांचे उत्कृष्ट हित व सौख्य त्यांच्यापुढे निरतर असतात हें त्यांना दाखवून द्यावें. CChMara 211.1
ज्यांचें कुटुंबांत पुत्रवात्सल्य आहे, त्याचा धदा कसलाही असो, त्याच्या हवाली केलेल्या आत्म्यांची त्यानें कदापि निष्काळजी करिता कामा नये, हें त्यानें समजून घेतले पाहिजे. ज्यांना त्यानें या जगांत आणिलें त्या आपल्या मुलांनी अमंगळ सहवासांत व कुसंगतीत पडू नये म्हणून परमेश्वरासमोर हर प्रयत्न करण्यास तो जबाबदार आहे. आपल्या चंचल मुलांना सर्वदा आईच्या काळजीवर सोंपवून देता कामा नये. तिला तर हें ओझे अति अवजड होऊन जाईल. आईच्या व मुलांच्या उत्कृष्ट हिताच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याची त्यानें तरतूद केली पाहिजे. आत्मसंयमन राखून चतुराईने आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे कार्य तिजसाठी फार जड होण्यासारखे आहे. असें जर होत असेल तर वडिलानेच अधिक ओझे स्वत:वर घ्यावयास हवे. आपल्या मुलांच्या संरक्षणार्थ करावयाचे प्रयत्न अधिक नेटाने करण्याचा निर्धार केला पाहिजे. 5 CChMara 211.2