कलीसिया के लिए परामर्श
कौटुंबिक प्रमुखानें ख्रिस्तानुकरण करणें.
पिता हा कुटुंबातील सर्व सभासदाचे केंद्रस्थान असतो तो शिस्तदाता (नियमदाता) असतो म्हणजे उत्साहशक्ति, सचोटी, प्रामाणिकपणा, धिमेपणा, धैर्य, उद्योगशीलता आणि व्यावहारिक उपयुक्तता हें मर्दानी व भरभक्कम सद्गुण त्यामध्ये स्पष्टीकरणार्थ दिसून येतात. सकाळ संध्याकाळ परमेश्वरासमोर अर्पण करणारा पिता हा एकाअर्थी उपाध्यायच होय. पत्नीला व मुलांना या अर्पणविधीमध्ये आणि स्तुतिसगीतांत सामील होण्यास उत्तेजन द्यावे. गृहातील याजक म्हणून पित्याने सकाळ-संध्याकाळी स्वत:कडून व त्याच्या मुलांकडून दिवसांतून झालेल्या पापांची देवापाशीं क्षमेची याचना करावी. त्याला समजून आलेली व केवळ देवच मात्र पाहूं शकतो अशीं गुप्त पापें पत्करण्यात यावींत. बाप घरी असल्यावर त्यानें अगर तो नसता आईने ही कार्यपद्धती जर चालूं ठेविली तर ती कौटुंबिक आशीर्वादाला कारणीभूत अशी होऊन जाईल. CChMara 209.6
जो पुरुष पति व पिता बनतो त्याला मी असें सांगेन कीं, तुमच्या सभोवार शुद्ध व पवित्र वातावरण खेळते आहे याची खात्री करून घ्या. रोज रोज ख्रिस्तीकडून ज्ञान प्राप्त करून घेत जा. गृहामध्ये जुलूमजबरदस्तीचा प्रकार कदापि दाखवू नका. जो मनुष्य असें करितो तो सैतानाचा हस्तक म्हणून त्यांशी भागीदारी करितो. तुमची इच्छा देवाच्या इच्छेशीं शरणागत अशी ठेवा. शक्य तें सर्व करून आपल्या पत्नीचे जीवन आनदी व सुखी ठेवा. देवाचे शास्त्र आपला सल्लागार असें माना. गृहामध्ये शास्त्रांतील शिक्षणानुसार जीवन जगवून दाखवा. तेव्हां मात्र तें मंडळीमध्ये व तुमच्या व्यवसायामध्ये दाखवून देता येईल. दैवीं तत्त्वे तुमचे सर्व व्यवहार भारदस्त करितील. देवदूत तुम्हांशी सहकार करून जगाला ख्रिस्ताचे प्रगटीकरण करण्यास साह्य देतील. CChMara 209.7
तुमच्या व्यवहारांतील त्रासामुळे आपले गृहजीवन अंधकारमय होऊ देऊ नका. अल्पस्वल्प गोष्टी अगदी तुमच्या मनाजोग्या घडून आल्या नसताना जर तुम्हांला धीमेपणा; दीर्घ सहनशीलता , मायाळूपणा व प्रीति दाखविता आली नाहीं तर ज्याने तुम्हांवर एवढी प्रीति केली कीं त्यानें तुम्हांकरिता स्वप्राण देऊन टाकला अशासाठी कीं तुम्ही त्याच्याशी एक व्हावे त्यानें तुमची सहकामकरी म्हणून निवडच केली नाही असें तुम्ही दाखवितां. CChMara 210.1
आपण कुटुंबाचे अधिपति आहों अशी निरंतर वाचाळतां करणे हें काहीं पुरुषत्त्वाचे चिन्ह नाहीं. आपल्या अधिकाराच्या पुष्ट्यर्थ पवित्रशास्त्राचा आधार दिल्याने त्याविषयींची आदरबुद्धि कांहीं वाढत नाहीं. आपले विचारवत जणू काय अचूक मानून बायकोने वागावे यांत त्याचा पुरुषार्थ अधिक होत नाही. बायकोचा तो संरक्षक म्हणून प्रभूनें त्याला बायकोचा मस्तक संबोधिले आहे. तो कुटुंबाचा गृहबंधक असतो म्हणजे कौटुंबिक सभासदांना बधनांत एकत्र करितो. ज्याप्रमाणे ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक व त्या गूढ शरीराचा उद्धारक आहे, तसे नवर्यचे कौटुंबिक सभासदाशी नाते असतें. आपली देवावर प्रीति आहे असें म्हणणाच्या प्रत्येक नवर्यने आपल्या हुद्याविषयीं ईश्वराची काय अपेक्षा आहे याचा बारकाईने अभ्यास करावा. सूज्ञतेने, सर्व प्रकारच्या दयाळूपणाने आणि सौम्यतेने ख्रिस्ताच्या अधिकाराची अमलबजावणी केली जाते; म्हणूनच मंडळीच्या महान् अधिपतीचे अनुकरण करून नवर्यने आपल्या अधिकाराची अमलबजावणी करावी. 3 CChMara 210.2