कलीसिया के लिए परामर्श
प्रकरण ३३ वें - ख्रिस्ती मातापिता
तुम्ही आपलीं गृह-कर्तव्यें विश्वासूपणे पार पाहतां तेव्हां पिता हो गृह-उपाध्याय व माता ही धर्म-शिक्षका होऊन जाते. याप्रकारे आपल्या गृहाबाहेर हितचिंतनाच्या शाखाच शाखा तुम्ही बनवीत असतो. तुम्ही आपली सामर्थ्य दाने जसजशी सुधारीत राहाल तसतशी ख्रिस्ती मंडळीमध्ये व शेजाच्यापाजाच्यात सेवा करायाला तुमची पात्रता अधिक सबळ होईल. मुलांनाही तुम्हांसह व देवासह बंधनकृत करून पिता, माता व मुलें हीं देवा सह एकत्रित कामकरी बनतात. 1 CChMara 207.1