कलीसिया के लिए परामर्श

157/318

मुलाची शिस्त राखण्यांत आत्मसंयमनाची आवश्यकता

मूल शिक्षणाव्यवस्थेंत असतां असें कांही प्रसंग येतात कीं, मुलाच्या अविचारी व बेशिस्त हेक्याला निश्चयी व अनुभाविक मातोश्रीला तोंड द्यावे लागते. अशावेळी आईच्या अगी मोठी चतुराई असावी लागते. अशा स्थितीत अविचाराच्या जुलमी कारभाराने मुलाचे फार मोठे नुकसान होण्याचा संभव असतो. CChMara 205.2

साधेल तर असले प्रसग टाळण्यांत यावेत, कारण उभय मातेला व मुलाला भयकर धडपड करावी लागते. पण एकदा का ती आणीबाणीची वेळ हातीं धरली तर आईचा सूज्ञ मार्ग मुलाला पत्करावयासच लावावें. CChMara 205.3

मुलानें उद्धटपणांत शिरावे असें काहीं एक घडू नये म्हणून तिने स्वत:ला पूर्ण ताब्यात ठेवावें. आरडून ओरडून हुकूम सोडण्यात येऊ नयेत. हळु व प्रेमळ शब्दांनी तिला पुष्कळ साध्य करिता येईल. तिने मुलाशी असें वागावें कीं, मुलांचा येशूकडे ओढा लागेल. देवच आपला साहाय्यक, प्रेम व सामर्थ्य आहे, हें तिने ओळखून घ्यावे. CChMara 205.4

जर ती चतुर ख्रिस्ती स्त्री असेल तर मुलाने आपलेच ऐकिले पाहिजे असा ती जोर करणार नाहीं. शत्रुने आपणावर वरचढपणा करूं नये म्हणून ती आस्थापूर्वक प्रार्थना करीत असतें आणि ती प्रार्थना करीत असतां आपल्या आत्मिक जीवनाचें नवीकरण होतें याची तिला जाणीव असतें. जी शक्ति आपल्यात कार्य करते ती आपल्या मुलांतहि करिते हें ती ओळखून असतें. तें मूल अधिक सौम्य व आज्ञांकित बनते. अशा प्रकारे ती विजयी होतें. तिची शांत वृत्त तिचा ममताळूपणा आणि तिचे आत्मसंयमी चतुराईचे शब्द हीं कार्य यशस्वी करण्याची साधने असतात. ज्याप्रमाणे पावसानंतर सूर्यकिरणे झळकू लागतात त्याचप्रमाणे वादळानंतर शांति नांदू लागते हें सर्व पाहून देवदूत आनंदाची स्तुतिस्त्रोत्रे गाऊं लागतात. CChMara 205.5

असल्या क्रांतिकारक गोष्टी नवरा-बायकोच्या चरित्र्यांत घडून येतात. जर तें देवाच्या मनोदयाप्रमाणे चालत नसतील तर त्यांचा लहरी व विसगत स्वभाव हा वारवार त्यांच्या मुलातही दिसून येईल. ज्याप्रमाणे दगड दगडावर आदळून टक्कर होतें त्याचप्रमाणे इच्छा इच्छेवर आदळून विरोध होतो. 3 CChMara 206.1

****