कलीसिया के लिए परामर्श

150/318

गैरशिस्त अशा हक्क मागण्या केल्यावर

आतां पुढील गोष्ट जी एकदांची निकालांत काढावयाची आहे ती अशी आपला नवरा हा नीच मनोविकाराच्या तंत्राने वागत आहे असें तिला कळून आलेले असतां, त्याला मान्यता दिल्याने आपल्या शरीरावर खात्रीने आघात होणार अशी तिला खात्री पटत असतां आणि देवाने ही माझी शरीरयष्टि शुद्ध व आदरणीय ठेवण्यासाठी दिलेली आहे व तें तिचे शरीर देवाला जिवंत असा यज्ञ करावयाचा असें तिला ठाऊक असतां तिने आपल्या नवर्‍यांच्या मागण्या कांही एक काकू न करिता मान्य करावयास बायको बांधलेली असतें का ? CChMara 199.3

आपल्या प्रकृतीची व जीण्याची धूळधानी करून नवर्‍यचे वैषयिक नाद पुरविण्यासाठी तिच्यातील अस्सल व पवित्र प्रीति सहाय्य करुं शकणार नाही. जर तिच्या अंगीं निर्भेळ प्रीति व चातुर्य असेल तर विषयवासनी मनोविकाराच्या फंदापासून त्याचे मन तिला अधिक चित्तवेधक व आत्मिक गोष्टींकडे वळवून घेता येईल तो नाखुष होण्याचा जरी धोका असला तरी विषयवासनेच्या अतिरेकाने मी आपले शरीर हीनकस होऊ देणार नाही असा नम्रतेचा व प्रेमळपणाचा आग्रह करणे तिला अवश्य पडेल. तिच्या सर्वस्वावर परमेश्वराचा प्रथम व परमश्रेष्ठ हक्क आहे व तो तिला धिक्कारता यावयाचा नाहीं कारण न्यायाच्या महान् दिन तिला देवासमोर हिशेब द्यावा लागणार आहे ह्याची मायाळपणे व सौम्यतेने त्याला आठवण करुन देतां येईल. CChMara 199.4

जर ती आपल्या प्रेमाची पातळी उंच करील आणि शुद्धतेत व सन्मानतेत आपले सुधारलेले व भारदस्त स्त्रीत्व सांभाळून राहील तर ती आपल्या धोरणी जीवनाने आपल्या नवर्‍यची सुधारणा करूं शकेल व अशा प्रकारे तिजवर सोपवलेल्या जबाबदारीची तिला भरपाई करिता येईल. असें करून तिला आपल्या नवर्‍यचे व स्वत:चे तारण साध्य करून दुहेरी सेवा करता येईल. या प्रकरणी असल्या नाजूक कठीण कारभारासाठीं बरीच चतुराई, धिमेपणा त्याचप्रमाणे धैर्य व धडाडी याची आवश्यकता लागेल. प्रार्थनेकडून शक्ति व कृपासामर्थ्य लाभू शकेल, आस्थेवाईक प्रीति हेच अंतर्यामांतील कारभार करणारे तत्त्व होय. देवावरील व पतीवरील प्रीति हेच मात्र यथायोग्य कार्य करण्याचे साधन होय. CChMara 200.1

सर्व गोष्टींमध्ये सहनशीलता धारण करून जेव्हां बायको आपले शरीर व मन नवर्‍यांच्या हवाली करिते व जेव्हां ती आपली सद्सद्विवेक बुद्धि व आपले व्यक्तिमत्वसुद्धा त्याला देऊन टाकते तेव्हां आपल्या नवर्‍यला थोर करण्याची संधि व आपले सबळ वजन कायमचे गमावून बसते. त्याचा उर्मठ स्वभाव तिला सौम्य करता येईल. तिच्या शुद्ध वजनाने त्याला सुसंस्कृत व निष्कलंक करता येईल; आपले मनोविकार ताब्यात ठेवण्यासाठी तिला आस्थेवाईक प्रयत्न करता येतील, असें कीं त्या उभयतांना दैवी स्वभावांत भागीदारी करून विषयवासनांद्वारे जगांत जो घात चाललेला आहे तो टाळता येईल. मनाला उच्च व उदार विचारसरणींत आणण्यासाठी वजनाची थोरवी कारणीभूत होईल, विषयवासनेच्या नादानें अंत:करणाला जी नीचावस्था प्राप्त झालेली आहे ती देवाच्या कृपेने अंत:करणाची शुद्धता करून वर उचलून घेता येईल. आपल्या नवर्‍यला खूष ठेवण्यासाठी त्याच्या क्षुद्र अवस्थेत म्हणजे विषय संभोगाच्या आवडींत तिला खालीं आलें पाहिजे असें जर बायकोला वाटत असेल तर ती देवाला नाखूष करिते कारण आपल्या नवर्‍यवर आपल्या शुद्ध वजनाचा छाप पाडण्यात ती चुकते. त्याची काहीं एक कानउघणी न करितां नवर्‍यांच्या विषयवासनेला वश व्हावे असें जर तिला वाटत असेल तर त्याच्याशी व देवाशी आपले कर्तव्यच तिला उमगलें नाहीं असं म्हणावे लागेल. CChMara 200.2