कलीसिया के लिए परामर्श

149/318

आत्मसंयमन दबळें करण्याचा सैतानाचा प्रयत्न

जे कोणी विवाहसंबंधांत पाऊल घालतात. त्याच्यातील शुद्धतेचा दर्जा उणा करावा आणि त्याचे आत्मसयमन दुबळे करावे असा सैतान प्रयत्न करीत असतो. कारण त्याला ठाऊक असतें कीं, क्षुद्र मनोविकार जसजसे वाढत राहातील तसतशी नैतिक शक्ति हळूहळू कमजोर होऊन जाते आणि म्हणून त्यांच्यात आत्मिक प्रगति होईल अशी काळजी करण्याचे त्याला प्रयोजन पडत नाही. त्याला असेहि कळून चुकते कीं, अशा रितीनें तो आपल्या तिरस्कारणीय स्वरूपाची छाप त्यांच्या संततीवर अधिक निर्धास्तीने उमठवू शकतो आणि आईबापांच्या शीलापेक्षा त्याच्या मुलाचे शील अधिक सहजासहजी त्याला बनविता येतें. CChMara 198.2

स्त्रीपुरुषांनो, कामवासना आणि तिच्या तृप्तीचा परिणाम काय होणार हें तुम्हांला कधींना कधीं तरी समजून येणार आहे. विवाहाबाहेरील व्यवहारांत मनोविकाराचे नीचत्व जसे आढळून येईल, तसेच तें विवाहसंबंधांतील व्यवहारांतहि सांपडून येईल. CChMara 198.3

क्षुद्र मनोविकारांच्या ताब्यांत जाऊन पडल्याचा परिणाम काय होतो ? ज्या शयनगृहात दिव्यदृताचा कारभार असावयास पाहिजे तें शयनगृह मळीन व्यवहाराने मळीन केले जाते. निर्लज्यपणाचे शरीर व्यापार चालत असल्यामुळे शरीरं भ्रष्ट होऊन जातात; किळसवाण्या व्यवहारामुळे किळसवाणे रोग उद्भवतात. आशीर्वाद म्हणून देवाने जे दिलेले आहे तेच शापमय असें होते. CChMara 198.4

ज्या प्रीतीचा भाविक व्यवहाराकडे ओढा असतो त्या प्रीतीचा लैंगिक व्यवहाराच्या अतिरेकानें क्षय होऊन जातो, विवाह-घटनेचे परिपोषण करण्यासाठी जी विचारसणी हवी असतें ती तो अतिरेक बुद्धींतून काढून घेतो आणि जीवन शक्तीचा खात्रीने फडशा उडवून टाकतो. असल्या आत्मघाताच्या कार्यात कोणाहि पत्नीने आपल्या पतीला साहाय्यभूत होऊ नये. जर ती सुशिक्षित असेल व आपल्या पतीवरची तिची भक्ति अस्सल असेल तर ती तसे करणार नाहीं. CChMara 198.5

कामवासनेत जितकें अधिक रमून जावे तितक्या त्या वासना दृढतर होत जातात व त्यांच्या संभोगांत त्यांच्यांत आढळून यावी. ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे तें जर चालतील तर त्यांची प्रीति क्षुद्र, ऐहिक व विषयलपट अशी राहूं शकणार नाही कारण तसली प्रीति त्यांच्या स्वत:च्या शरीराचा नाश करते आणि त्यांच्या पत्नीला दुबळी आणि रोगी बनविते. हरएक बाबींत नवर्‍यांच्या अधीन असलेंच पाहिजे असली वाणी बायकांच्या कानांवर जोरदारपणें घालतांना आपल्या क्षुद्र कामवासनांच्या तृप्तीसाठी तें लपटपणे वागणार नाहींत. प्रत्येक ख्रिस्ती गहस्थाच्या अंगी अवश्य असलेले गुण म्हणजे शीलाची उदारता, अंत:करणाची शुद्धता व मनाची भारदस्ती जर नवर्‍यमध्ये वसत असली तर त्यांचे प्रत्यतर वैवाहिक संबधात दिसून येतील. जर त्याचयामध्ये ख्रिस्ताचे चित्त असेल तर तो आपल्या शरीरप्रकृतीचा शत्रू होणार नाही. तर त्याच्याठार्थी भरपूर कनवाळू प्रीति राहून ख्रिस्तामध्ये अत्युच्च दर्जापर्यंत पोचण्याचा तो प्रयत्न करील. CChMara 198.6

बायकोनें निमुटपणे दासी बनून तिला आपल्या नवर्‍यांच्या दुष्ट वासनास जर वश व्हावे लागत असेल तर असला पुरुष आपल्या बायकोवर खरेपणाने प्रीति करूं शकत नाहीं. एके काळी तिला वाटणारे महत्त्व असल्या बळजबरीच्या शरणागतीने नष्ट होऊन जाते. बढती करणाच्या प्रत्येक गोष्टीपासून तिला निचावस्थेत ओढून आणावें हेच त्याला दिसते. माझ्या प्रमाणेच दुसरीकडही निमुटपणे ती नीचतेने शरण जात असेल असा त्याला लवकरच सशय येऊ लागेल. तिच्या इमानीपणाची आणि पातिव्रत्याची तो शंका येऊ लागतो; त्याला तिचा कंटाळा येतो आणि त्याच्या सैतानी वासनांची परिपूर्ति करण्यासाठी तो नवीन स्त्रियांकडे पाहूं लागतो. ईश्वरी नियमाकडे ज्यांचे दुर्लक्ष होतें. असले लोक पशुहुनहि नीच असतात. मानवी अवतारांतील तें राक्षसच होत. निर्भेळ व पवित्र प्रीतिच्या भारदस्त व उदार तत्त्वांचा त्यांना परिचय नसतो. CChMara 199.1

बायकोलासुद्धा नवर्‍यविषयी मत्सर व संशय येतो आणि संधि मिळाली कीं, आपल्याप्रमाणेच दुसरीलाही सहज हस्तगत करण्यासाठी विषयसंभोगासाठी तो त्यावर उद्युक्त होईल. (तयार होईल) सद्सद्विवेकांचे अगर ईश्वरी भीतीचे त्यावर दडपण नसते, हें तिला दिसून आलेले असतें. विषयसुखाच्या मनोविकारामुळे ही शुद्ध बंधने त्यानें तोडून टाकिलेली असतात. नवर्‍यांत असलेल्या देवपणाला नीच व पशुतुल्य वासनांच्या अधीन केलेले असतें. CChMara 199.2