मोक्षमार्ग
अध्याय ११ वा.—प्रार्थनेचा हक्क
सृष्टि, प्रगटिकरण व पवित्र आत्म्याची प्रेरणा ह्यांच्याद्वारें परमेश्वर आपणांशीं बोलत असतो. परंतु हीच इतकीं पुरेशी आहेत असें नाहीं. यांशिवाय आपण आपलें अंत:करणहिं त्याजकडे लाविलें पाहिजे. आत्मिक जीवन व आत्मिक उत्साह प्राप६त होण्यासाठीं आपण आपल्या स्वर्गीय पित्याशी प्रत्यक्ष सहवास ठेविला पाहिजे. आपलेम मन त्याजकडे लावावें, त्याच्या कार्याचें, त्याच्या दयाळूपणाचें व त्याजपासून प्राप्त होणार्या आशीर्वादाचें आपण मनन करावें; परंतु त्याशीं दळण ठेवण्याच्या दृष्टीनें पाहतां ह्याहि गोष्टी पुरेशा नाहींत. तर दळणवळण ठेवण्यासाठीं त्याशीं आपल्या ह्या जिण्यासंबंधानें आपण कांहींतरीं बोललें पाहिजे. WG 88.1
ज्याप्रमाणें आपण आपल्या मित्राजवळ आपलें अंत:करण अगदीं खुलें करतों, त्याचप्रमाणें तें देवाजवळ करणें म्हणजे प्रार्थना. तिची जरूरी आपण कोण आहोंत, काय आहोंत, हें त्यास सांगावें म्हणून आहे असें नव्हें, तर तिच्यायोगें आपला स्वीकार केला जाण्यासा आपण लायक आहों हें ठरावें म्हणून आहे. आपण प्रार्थनेच्याद्वारें ईश्वराला खालीं आणतों असें नव्हें, तर उलट ती आपणांसच त्याच्या सन्निध नेतें. WG 88.2
ख्रिस्त जगांत असतांना त्यानें आपल्या शिश्यांस प्रार्थना कशी करावी हें शिकविलें. आपल्या रोजच्या गरजा आपण त्याच्यापुढें मांडाव्या, व सर्व भार त्याच्यावर टाकावा असें त्यानें आपल्या शिष्यांस सांगितलें होतें. तुमच्या प्रार्थना ऎकल्या जातील अशी त्यानें त्यांस खात्री दिली, तशीच ती आपणांसहि दिली आहे. WG 88.3
प्रभु येशू ह्या पृथ्वीव्र आपणांमध्यें असतां वारंवार प्रार्थना करी. आम्ही आपलें कर्तव्य करावें व परिक्षांत टिकावें म्हणून तो आमच्या गरजा व आमचा अशक्तपणा ह्याशीं तो आम्हांबरोबर सहभागी झाला होता, व अशा स्थितींत नम्र, अर्जदार व आपल्या बापापासून सामर्थ्य मागणारा होता. प्रत्येक बाबतीत तो आपणांला कित्त्यादाखल आहे. आपल्या दु:खांत तो आपला केवळ भाऊच आहे. “आपणांप्रमाणेंच सर्व बाबतींत पारखलेला तो होता,” परंतु अगदी निष्पाप अशा एखाद्याप्रमाणें तो पापापासून परावृत्त झाला. पापमय जगांत झगडा करून त्यानें जीवाला होणारे कष्ट सोसलें. प्रार्थना म्हणजे एक आवश्यक व हक्काची गोष्ट आहे, असें त्यानें मनुष्यरुप धारण करून दाखविलें. आपल्या बापाशीं दळणवळण ठेवण्यांत त्याला सुख व आनंद होई. एकंदरींत मनुष्यांचा तारक व देवाचा पुत्र असा तो असतांहि त्यांस जर प्रार्थनेची जरूरी भासली, तर अशक्त, पापी व मर्त्य अशा आपणांस अंत:करणपूर्वक व सतत अशा प्रार्थनेची किती तरी अधिक जरूरी आहे ? WG 88.4
आपणांस आशीर्वाद देण्यासाठीं आपला स्वर्गीय पिता अगदीं वाट पहात आहे. अमर्याद प्रेमरूप झर्यांतून जीवनाचें पाणी मनमुराद पिण्याचा आपला हक्क आहे. असें असून आपण फारच थोडी प्रार्थना करतों हें किती आश्चर्य आहे ? अतिशय नम्र अशा आपल्या लेकरांनीं अंत:करणपूर्वक केलेली प्रार्थना ऎकण्यास ईश्वर तयार असूनहि आपन आपल्या गरजा त्याच्यापुढें मांडण्याची नाखुषी दाखवतों. अतिशय प्रेमळ असें ईश्वराचें अंत:करण आपणांकडे ओढ घेत असूनहि व आपण मागतों अगर आपणांस वाटतें त्यापेक्षां पुष्कळच अधिक असें तो देण्यास तयार असतांहि, जर आपण त्याचीं फारच थोडी प्रार्थना करतों, व त्याविषयीं फारच कमी विश्वास बाळगतों, तर मोहपाशांत सापडणार्या आपणां गरीब, निरूपयोगी मनुष्यांबद्दल स्वर्गीय देवदूतांस काय बरें वाटत असेल ? त्या देवदूतांस ईश्वरापुढें नम्र होऊन त्याच्या सानिध्यांत राहणें आवडतें. त्याचा अतिशय मोठा आनंद म्हणजे ईश्वराशीं ऎक्य करणें हा होय. आणि इकडे पृथ्वीवर पाहावें तों मनुष्यांस, एका ईश्वरापासूनच मिळणार्या मदतीची अतिशय जरूरी असतां तें त्याच्या आत्म्याच्या प्रकाशाशिवाय व त्याच्या समक्षतेशिवाय चालण्यात समाधान मानितात. WG 89.1
पापात्म्याचा (सैतानाचा) अंधकार प्रार्थनेची हयगय करणारांस घेरून टाकतो. त्या शत्रूच अंत:करण अस्पष्ट शब्दांनीं उच्चारलेलें मोह त्यास पाप करावयास मोह पाडतात. आणि ह्याचें कारण म्हटलें म्हणजे त्यांस ईश्वरानें दिलेल्या प्रार्थनेच्या हक्काचा उपयोग ते करीत नाहीत हें होय. सर्व सामर्थ्याचें अमर्याद भांडार ज्यांत भरलें आहे असें स्वर्गरुप कोठार खुलें करण्याची किल्ली म्हणजे श्रद्धायुक्त प्रार्थना व सतत पाहरा न केला तर आपण निष्काळजी बनण्याची व सन्मार्गापासून भ्रष्ट होण्याची भीति असते. मन:पूर्वक केलेल्या वंदनानें व श्रद्धेनें मोहाला प्रतिकार करण्यास आपणांला कृपादान व सामर्थ्य ही प्राप्त होऊं नयेत, म्हणून ईश्वराच्या दयासनाच्या मार्गांत अडथळा करण्याचा प्रयत्न शत्रु एकसारखा करीत आहे. WG 90.1
ईश्वर आपल्या प्रार्थना ऎकून त्याचें उत्तर देईल तें कांहीं अटीवर देईल. ह्या अटीपैकीं पहिली अट म्हटली म्हणजे त्याच्या मदतीची अपेक्षा आपणांस वाटणें हीं होय. त्यानें आश्वासन दिलें अहे कीं, “मी तान्हेल्यावर पाणी, सुक्या भूमीवर पूर ओतीन.”1 नीतिमत्वाची तहानभूक ज्यांस लागतें, व जे ईश्वराच्या समागमाची इच्छा करितात, त्यांनीं आपणांस भरपूर मिळेल अशी खात्री बाळगावी. पवित्र आत्म्याचें वजन पदण्यास अंत:करण त्यांनीं खुलें ठेविलें पाहिजे, नाहींतर ईश्वराचें कृपादान त्यास प्राप्त होणार नाहीं. WG 90.2
आपल्या मनांतील ईश्वराच्या मदतीची अपेक्षा ही स्वताच एक ईश्वराचा कृपाप्रसाद प्राप्त करून घेण्याचें साधन असून ती आपल्यातर्फे मोठ्या कळकळीनें ईश्वरास शोधलें पाहिजे. परमेश्वर म्हणतो, “मागा म्हणजे तुम्हांस दिलें जाईल.” “ज्यानें आपला पुत्र राखून ठेवलानाहीं, तर आम्हां सर्वांसाठीं दिला, तो त्यासहित आम्हांला सर्वकांहीं कसा देणार नाहीं ?”2 WG 90.3
पापाला आपण अंत:करणांत थारा दिला व त्यासच चिकटून राहिलों, तर ईश्वर आपलें म्हणणें ऎकणार नाहीं ; परंतु पश्चात्ताप पावलेल्यांची प्रार्थना व कष्टी झालेला आत्मा ह्यांचा तो स्वीकार करतो. सर्व ज्ञात अपराधांपासून मुक्त होऊं तेव्हां ईश्वर आपल्या प्रार्थनांस उत्तर देईल असा विश्वास धरावा. स्वताच्या गाठी असलेले पुण्य ईश्वरीकृपाप्रसाद प्राप्त करून देण्यास कधींही उपयोगी पडणार नाहीं, तर एका प्रभु येशुचीच लायकी व त्याचेंच रक्त आपणांस वाचविण्यास व शुद्ध करण्यास उपयोगी पडेल; आपण मात्र त्याच्या अटीचा स्वीकार करण्यास तयार असलें पाहिजे. WG 90.4
श्रद्धा हें एक प्रार्थनेंतील मूलभूत तत्व आहे. “देवाजवळ जाणार्यानें असा विश्वास धरला पाहिजे कीं, तो आहे, आणि त्याकडे धाव घेणार्याला तो प्रतिफळ देणारा होतो.”1 प्रभु येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “जें कांहीं तुम्ही प्रार्थना करून मागाल, तें तुम्हांला मिळालेंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे तें तुम्हांस प्राप्त होईल.”2 आपण त्याचें वचन पाळतों काय ? WG 91.1
त्यानें दिलेलें आश्वासन फारच मोठें असून तें तो पाळणारा आहे. आपण मागतों त्य वस्तूंचा स्वीकार आपण करीत नाहीं, तेव्हां - अगदीं त्याचवेळी--प्रभु आपली प्रार्थना ऎकत आहे, व तो त्या प्रार्थनेचें उत्तर देईलच असा विश्वास आपण धरावयाचा आहे. आपण इतकें चुकनारे व असूरदर्शीं आहोंत, कीं ज्या वस्तूंपासून आपणांस सुखप्राप्ती होणार नाहीम अशाच वस्तु आपण मागतों; परंतु आपला स्वर्गीय पिता केवळ म्हणजे अशाच गोष्टी प्रेमामुळें थोर कल्याणप्रद गोष्टी म्हणजे कीं जर आपणांस दैवी दृष्टी असती व सर्व गोष्टी जशा असतात तशाच त्या आपणांस दिसल्या असत्या, अशावेळीं जें थोर कल्याण प्राप्त करून घेण्याची इच्छा केली असती अशाच गोष्टी देतो. आपल्या प्रार्थना ऎकल्या जात नाहीम्त असें दिसूं लागतें त्यावेळीं त्यानें दिलेलें वचन लक्षांत आणावें. कारण आपल्या प्रार्थनेच्या उत्तराची वेळ त्यानें दिलेलें वचन लक्षांत आणावें. कारण आपल्या प्रार्थनेच्या उत्तराची वेळ खात्रीनें येणारच, व ज्या सुखाची आपणांस अतिशय गरज आहे, असें सुख प्राप्त होणारच. परंतु आपल्या मनाप्रमाणेंच अमुकच रीतीनें व अमुकच वस्तूबद्दल केलेल्या प्रार्थनेस सदोदित उत्तर दिलें जावेंच असा हक्क सांगणें म्हणजे शुष्क चुकीचा तर्क होय. ईश्वर मुळींच चुकणारा नसून जे मार्गानें जातात त्यांचे मनोरथ पूर्ण करणारा आहे; म्हणून तुमच्या प्रार्थनेस तत्काळ उत्तर न मिळालें, तरी त्या ईश्वरावर विश्वास ठेवण्यास मागें पुढें पाहूं नका. “मागा म्हणजे तुम्हांस दिलें जाईल”1 ह्या त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. WG 91.2
शंका व धास्ती बाळगून त्याप्रमाणें आपण चालत असलों अगर जी गोष्ट आपणांस स्पष्टपणें समजत नाहीं अशा गोष्टींचा उलगडा करण्याचा प्रयत्न आपण करीत गेलों तर आपण विश्वास धरण्यापूर्वीच आपलें अंत:करणांत घोटाळा माजून जाईल परंतु निरूपायी, परतंत्र आणि खरोखरच आपण तसे आहोंत नम्र होत्साते ज्यानें ज्ञान अगाध आहे, व जो सृष्ट वस्तूंतील प्रत्येक गोष्ट पाहतो, व ज्याच्या इच्छेनें व शब्दानें सर्व चराचर जगत् चालतें, अशा ईश्वरास श्रद्धापूर्वक आपल्या गरजा कळविण्यासाठीं त्याजवळ आपण आलों तर आपलें गार्हाणें तो एकेल, व आपल्या अंत:करणांत प्रकाश पाडील. WG 92.1
प्रार्थना ऎकली जाण्याची दुसरी अट म्हटली म्हणजे ती सतत करणें ही होय. श्रद्धा व अनुभव ह्यांत वाढण्याची इच्छा असल्यास सतत प्रार्थनाच केली पाहिजे. “प्रार्थनेंत तत्पर असा व तींत उपकारस्तुति करित जागृत राहा”2 असें साधु पौलानें सांगितल्याप्रमाणें आपणांस राहावयाचें आहे. विश्वास ठेवणारांस पेत्रसाची अशी सांगी आहे, कीं “मर्यादेनें राहा व प्रार्थना करण्यास सावध असा.”3 साधु पौलानें आणखी एकें ठिकाणी असें म्हटलें आहे, कीं “सर्व गोष्टीविषयीं उपकारस्तुतिसहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणीं देवाला कळवा.”4 प्रेषीत यहूदानें म्हटलें आहे, “तुम्ही तर प्रियांनो, पवित्र आत्म्यांत प्रार्थना करुन देवाच्या प्रईतींत आपणांस राखा.”5 सतत प्रार्थना म्हणजे ईश्वराशीं आत्म्याचा न तुटणारा असा संबंध ; ह्या संबंधाच्यायोगानें ईश्वरापासून जीवन निघून तें आपल्याठायीं उतरतें, व पुन्हा आपल्या जिण्यामधून शुद्धता व पवित्रता हीं देवाकडे जातात. WG 92.2
प्रार्थनेला उत्सुकतेचीहि आवश्यकता असते. कोणतीही गोष्ट तींत आड येतां कामा नये. प्रभु येशू व तुमचा आत्मा ह्याचें दळणवळण सारखें राहावें म्हणून जरूर तो प्रयत्न करा. प्रार्थना करितात त्या ठिकाणीं जाण्याची प्रत्येक संधि साधा. ईश्वराशीं ऎक्य करण्याचा खरोखर मनापासून जे लोक प्रयत्न करितात, ते प्रार्थनेच्या सभेंत आपलें कर्तव्य बजावण्यास विश्वासू, व त्याहून होणारा आपला फायदा करून घेण्यास सदा उत्सुक असलेले दृष्टीस पडतील. स्वर्गांतील प्रकाशाचें किरण ज्या ज्या ठिकाणीं म्हणून मिळतील, त्या त्या ठिकाणीं स्वतां जाण्यास ते प्रत्येक संधी साधतील. WG 93.1
आपल्या कुटुंबात आपण प्रार्थना करावी ; परंतु विशेषत: एकान्तात प्रार्थना करण्याची तर मुळीच हयगय करू नये. कारण अशी प्रार्थना हेंच आत्म्याचें जीवन आहे. प्रार्थनेची हयगय केली तर आत्म्याची उन्नति होणें अशक्य आहे. कौटुंबिक अगर सार्वजनिक प्रार्थनाच केवळ केल्यानें पुरेसें होतें असें नाहीं, तर ईश्वराच्या सर्वदृष्ट्या नेत्रापुढें एकान्ती तुमचा आत्मा जाऊं द्या. एकान्तांत केलेली प्रार्थनाच फक्त ईश्वर ऎकतो. ईश्वराच्या कानाव्यतिरिक्त दुसरा कोणताहि कान असल्या विनंत्या ग्रहन करूं शकत नाहीं आपण एकान्ती प्रार्थना करीत असतां सभोंवतालच्या गोष्टींपासून व मनाच्या चलबिचलीपासून आपला आत्मादूर राहतो. अंत:करमपुर्वक केलेल्या प्रार्थना ऎकण्यास ज्याचा कान सदाचाच उघडा असतो अशा गुप्तपणें पाहनार्या ईश्वराचें वजन अशा आत्म्यावर पडतें. सैतानाशीं सामना करण्यास अशा आत्म्याला बळकटी यावी व तो त्या सामन्यांत टिकावा म्हणून तो शांत व शाधेपणाच्या श्रद्धेनें ईश्वराशीं तादात्म्य करुन घेऊन त्याच्या दैवी प्रकाशाचे किरण प्राप्त करुन घेतो. ईश्वर हा आमचा सामर्थ्याचा खंबीर बुरुजच आहे. WG 93.2
आपल्या खोलींत एकान्ती प्रार्थना करा; आणि आपल्या रोजच्या कामगिरीवर तुम्ही जात असतां तुमचें अंत:करण ईश्वराकडे लावलेलें असूं द्या. ह्याप्रमाणेंच हनोख हा ईश्वराबरोबर चालला. कृपेच्या सिंहासनासमोर ह्या एकांतांतील प्रार्थना मौल्यवान धूप ज्याप्रमाणें वर जातो त्याप्रमाणें त्या कृपेच्या सिंहासनासमोर वर जातात. ज्याचें अंत:करण ईश्वराकडे लागलेले आहे अशा मनुष्यास सैतान जिंकीत नाहीं. ईश्वराला विनंति करण्यास नालायक अशी कोणतीहि वेळ व कोणतीहि जागा नाही. अंत:करणपूर्वक केलेल्या प्रार्थनेच्या आत्म्याने आपलीं मनें ईश्वराकडेलागण्यास प्रतिबंध करणारे असें कांहिं नाहीं. अर्तहशश्ते राजापुढें नेहम्यानें विनंति केल्याप्रमाणें भर रस्त्यामधिल गर्दीत, कामकाजांत त्यानें मार्ग दाखवावा म्हणुन आपण देवाची विनंति करावी. आपण असूं त्या ठिकाणी ईश्वराशीं ऎक्य करण्यास एकांत जागा सापडेल. आमच्या आत्म्यांत प्रभु ख्रिस्तानें स्वर्गीय पाहुणा म्हणून येऊन राहावें म्हणून त्यास आपण पाचारण करावें. WG 93.3
आपल्या सभोंवती दुषित व बिघडलेलें वातावरण असलें तरी आपण त्यांतील आरोग्यघातक परमाणु ग्रहण करुं नयेत, तर आकाशांतील (स्वर्गांतील) शुद्ध हवेंत राहावें. प्रार्थनेच्या द्वारें ईश्वराच्या समक्षतेंत आत्मा आणून अशुद्ध कल्पना व अपवित्र विचार यांस आपण थाराहि देऊं नये ईश्वराचा आश्रय व त्याचा आशीर्वाद ग्रहण करण्यास जे लोक अंत:करन खुलें ठेवितात, ते पृथ्वीवरील वातावरणांपेक्षां अधिक पवित्र अशा वातावरणांत राहतील व त्याचें स्वर्गाशीं सतत दळणवळण राहील. WG 94.1
प्रभु येशूविषयीं आपलें विचार अधिक स्पष्ट असावेत व सार्वकालिक सत्य वस्तूंशी थोरवी आपण पूर्णपणें समजावी. पवित्रपणाचें सौंदर्य म्हणजे देवाच्या लेंकराची अंत:करणें पवित्रतेनें भरणें, व हें परिपूर्ण व्हावें म्हणून आपण स्वर्गीय गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करावा. WG 94.2
ईश्वरानें आपणांस स्वर्गीय वातावरणात श्वाओच्छवास करूं द्यावा ह्यातून आपला आत्मा आहे त्या स्थितींतून काढून वर जाऊं द्या. आपण ईश्वराच्या इतकें सन्निध्य राहावें, कीं प्रत्येक अकल्पित परिक्षेंत आपलें विचार, फुल ज्याप्रमाणें सूर्याकडे वळतें त्याप्रमाणें ईश्वराकडे वळतील. WG 94.3
तुम्ही आपल्या गरजा, आपले आनंद, आपलीं दु:खें, आपल्या काळज्या व आपली भीति ही सर्व ईश्वरापुढें मांडा. तुमचा भार त्यास होत नाहीं, व त्यास तुमच्यामुळें शीणहि येत नाहीं. जो तुमच्या डोक्याचा प्रत्येक केंस मोजितो, तो आपल्या लेंकराच्या गरजांविषयीं बेफिकीर राहात नाहीं. “तो फार कनवाळू व दयाळू आहे.”1 आपल्या दु:खाच्या नामोच्चारानेंहि तें कळवलतें. तुमच्या मनाचा घोटाळा करणारी प्रत्येक बाब त्याजकडे न्या. त्याला वाहतां येणार नाहीं इतकें मोठें जगांत कांहीं नाहीं. कारण तो अनंत जग धारण करून त्यातील प्रत्येक वस्तूवर सत्ता करतो. आपल्या शांततेशी कोनत्याहि रीतीनें संबंध आहे अशी कोनतीहि क्षुल्लक बाब त्याच्या नजरेंतून निसटून जात नाहीं. आपल्या अनुभवांतील असा कोणताहि भाग अदृश्य नाहीं, कीं तो जिचा त्यास उलगडा करता येत नाही, असें कोनतेही संकट नाहीं, अशी कोनतीहि छळणारी काळजी नाहीं, अगर आत्म्याला होणारा आनंद नाहीं अगर आपल्या तोंडावाटें निघणारी अंत:करणपूर्वक केलेली प्रार्थना नाहीं, कीं जिच्याकडे त्या स्वर्गीय पित्याचें लक्ष नाहीं, अगर ज्याची तो मुळींच काळजी घेत नाहीं. “तो मग्न मनाच्यांस बरें करतो. आणि त्यांच्या क्षतांस पट्टी लावून बांधतो.”2 ईश्वर आणिप्रत्येक आत्मा ह्याजमधील संबंध इतका स्पष्ट व पूर्ण आहे, कीं जणू काय ज्याच्यासाठीं त्यानें आपल्या प्रिय पुत्राला दिलें असे दुसरे आत्मेच नाहींत. WG 94.4
प्रभू येशूनें सांगितलें आहे, “तुम्ही माझ्या नावानें मागाल, आणि मी तुम्हांसाठीं बापाजवळ विनंति करिन, असें मी तुम्हांस म्हणत नाहीं ; कारण बाप स्वतां तुम्हांवर प्रीति करतो.” “म्यां तुम्हांस निवडलें व तुम्हांस नेमिलें आहे, यासाठीं कीं, तुम्ही जाऊन फळ द्यावें व तुमचें फळ राहावें यासाठीं कीं, जें कांहीं तुम्हीं माझ्या नावानें बापापाशीम मागाल तें त्यानें तुम्हांस द्यावें.”3 प्रार्थनेच्या आरंभी व शेवटीं त्या प्रभुचा नुसता नामोच्चार करणें ह्यापेक्षां प्रार्थना करण्यांत कांहीं अधिक आहे. प्रार्थना करावयाची म्हणजे ती प्रभु येशुच्या मनानें व आत्म्यानें त्याच्या वचनांवर, कृपेवर व कार्यावर विश्वास ठेवून करावयाची आहे. WG 95.1
आपली पूजा करण्यासाठीं जगाचा त्याग करून आपणापैकीं कोणी संन्यासी अगर जोगी बनावें असा ईश्वराचा हेतु नाहीं. जंगलातील डोंगरात व मनुष्यवस्तीत प्रभुनें ज्याप्रमाणें आपलें आयुष्य घालविलें त्याप्रमाणें आपनहि केलें पाहिजे. जो कोणी प्रार्थनेशिवाय दुसरें कांहीएक करीत नाहीं. तो लौकरच प्रार्थना करण्याचें सोडून देईल, अगर त्याच्या प्रार्थना म्हणजे एक ठराविक व नांवाचाच कर्ममार्ग होऊन बसेल. ख्रिस्ती कर्तव्याचा त्याग करून आपला खांब न वाहता मनुष्ये जेव्हां समाज सोडून जातात , व ज्यांच्यासाठीं त्यानें उत्साहानें काम केलें अशा आपल्या धन्यासाठीं काम करण्याचें जेव्हाम तें बंद करितात, तेव्हा ते प्रार्थनेचा मुख्य मुद्दाच सोडुन देतात व त्याच्या भक्तीसाठी उत्तेजन त्यांजवळ नसतें, अशा लोकांच्या प्रार्थना स्वतांविषयी व आपमतलबाच्या असतात. मनुष्यजातीच्या गरजांबद्दल अगर ख्रिस्ताच्या राज्याबद्दल सामर्थ्य मिळावे म्हणून त्यांस प्रार्थना करतां येत नाहीं. WG 96.1
ईश्वराच्या सेवेविषयीं एकमेकाला बळकटी आणणें व उत्तेजन देणें हीं करण्याची उपेक्षा केल्यास आपला तोटा होतो. त्याच्या वचनांचा ठळकपणा व त्याचें महत्त्व आपल्या मनांतून नाहींशी होतात. त्याच्या वचनांचा ठळकपणा व त्यांचें महत्त्व आपल्या मनांतून नाहींशी होतात. त्या सत्यवचनांत असलेल्या शुद्धकरणाच्या गुणांनीं आपलें अंत:करण प्रकाशीत व जागृत न होता आपला आत्मिकपणा नाहीसा होतो. ख्रिस्ती बंधु या नात्यानें असलेली एकमेकांमधील सहानुभूति नाहीशीं होते. एकान्तांत बसणारा मनुष्य ईश्वरानें नेमून दिलेलें कार्य पूर्ण करीत नाहीं आपल्या शीलांतील समाजशीलत्वाच्या तत्वाची योग्य जोपासना हें एक ईश्वराच्या सेवेंमध्यें आपली वाढ होण्याचें व आपणांस सामर्थ्य प्राप्त करुन घेण्याचें एक साधन आहे. WG 96.2
ख्रिस्ती लोक एकमेकांशीं संबंध ठेवतील, व ईश्वराच्या प्रेमाबद्दल व तारणाच्या अमूल्य सत्यवचनांबद्दल एकमेकांशीं बोलतील, तर त्यांची स्वतांची अंत:करणें ताजीतवानी होऊन ते एकमेकांस ताजेतवाने करतील. आपल्या स्वर्गीय पित्याच्या कृपेचा अनुभव घेत त्याविषयीं आपणा अधिक शिकावें, म्हणजे त्याच्या प्रेमाबद्दल बोलण्याची आपणांस इच्छा होईल ; व आपण हें करित असतां आपलें अंत:करण थोर होऊन त्यास उत्तेजन प्राप्त होईल. स्वतांविषयीं न बोलता व विचार न करिता प्रभु येशूविषयींच बोललों व विचार केला, तर त्याची समक्षता आपणास अधिक प्राप्त होईल. WG 96.3
ईश्वर आपणांबद्दल काळजी घेतो ह्याचें जितकें पुरावें आपणाजवळ आहेत, जितक्या वेळां आपण त्याच्याविषयीं विचार करण्याचें मनांत आणलें तर आपणांस सदोदित त्याचाच विचार करावा लागेल व त्याजविषयी बोलण्यांत आनंद मानून त्याचीच स्तुति करावी लागेल; ऎहिक वस्तूंविषयीं आपण बोलतों, ह्याचें कारण आपण त्यांतच आपलें त्यांजवर प्रेम असतें म्हणुन आपलें आनंद व आपलीं दु:खें त्यांशी गुरफटलेलीं असतात तथापि आपल्या ह्या जगांतील मित्रांवर प्रेम करण्यापेक्षां ईश्वरावर अधिक प्रेम करण्यास आपणाजवळ अधिक मोठें कारण आहे. आपला पहिला विचार त्याच्याविषयींच असावा, याच्याच चांगुलपणांविषयी आपण बोलावें, व त्याच्याच सामर्थ्याविषयी सांगावें, व हाच आपला स्वभाव असावा. WG 97.1
त्यानें ज्या मोठमोठ्या देणग्या आपणांस दिल्या आहेत, त्या आपण आपलें विचार व आपलें प्रेम इतर गोष्टींवर ठेवून अखेरीस त्यास देण्यास आपणांजवळ कांहीं नसावें म्हणून दिल्या नाहींत ; तर आपणांस त्याची वारंवार आठवण व्हावी, व प्रेमाच्या व कृतज्ञतेच्या बंधनानें आपल्या त्या उपकारकर्त्या परमेश्वराशी आपण स्वतांला बांधून घ्यावें म्हणून त्या दिल्या आहेत. पृथ्वीच्या अगदीं सखल प्रदेशावर आपण राहतों तरी स्वर्गाच्या दरवाज्याकडे आपण दृष्टि लावूं या. ज्या ठिकाणीं ईश्वराचा वैभवरुप प्रकाश ख्रिस्ताच्या चेहेर्यावर पडला आहे. अशा त्या स्वर्गाच्या दरवाज्या- कडे आपण दृष्टि लावूं. त्या ख्रिस्तामार्फत “देवाजवळ जाणार्यांस तो पूर्णपणें तारायास समर्थ आहे.”1 WG 97.2
“ईश्वराच्या दयेकरीतां व मनुष्याकडील त्याच्या आश्चर्यकर्मांकरीतां.”2 आपण त्याची स्तुति करणें अवश्य आहे. केवळ मागणें व घेणेम यांनींच भरलेली आपली उपासना व प्रार्थना नसावी. आपणांस आपल्या गरजांचाच व फायद्यांचाच हरहमेश विचार करतां कामा नये. आपण कांहीं कमी प्रार्थना करतों असें नाहीं, तर तींत आपण उपकारस्तुति करावी तितकी करीत नाहीं. ईश्वराच्या दयेचा स्वीकार आपणा नेहमीं करतों, परंतु कृतज्ञताबुद्धि किती तरी थोडी दाखवितों ; व त्यानें जें कांहीं आपणांसाठीं केलें आहे त्याबद्दल किती तरी थोडी स्तुति आपण करतो. WG 98.1
प्राचीनकाळी इस्त्राएल लोक प्रभु ईश्वराच्या उपासनेसाठीं एकत्र जमले होते, तेव्हां त्यानें त्यांस सांगितलें, “मग तेथें आपला देव परमेश्वर यासमोर जेवा, आणि ज्या कार्यारु तूं हात लावतोस. ज्याविषयीं तुझा देव परमेश्वर यानें तुला आशीर्वाद दिला त्यांत तुम्ही आपल्या घरच्यांसुद्धा आनंद करा.”3 WG 98.2
आपला प्रभु ईश्वर म्हणजे ममताळू व दयाळू बाप आहे. त्याची सेवा म्हणजे अंत:करण कष्टी कराणारी व तापदायक दु:खमय अशी मानता कामा नयें. ईश्वराची उपासना करणें व त्याच्या कार्यांत भाग घेंणें हें एक सुख होऊन बसलें पाहीजे. ज्यांच्यासाठीं त्यानें इतकें तारण दिलें, त्या त्याच्या लेकरांनीं तो निष्ठूर व मानेवर खडा ठेवून काम करून घेणारा असा धनी आहे, असें समजून त्यांनीं वागावें अशी त्याची इच्छा नाही. तो त्यांना सर्वोत्कृष्ट मित्र आहे. जेव्हां ते त्याची उपासना करितात, तेव्हां त्याजबरोबर असावें व त्यांस आशीर्वाद देऊन सुख द्यावें , त्यांची अंत:करणें आनंदानें व प्रेमानें भरावी अशी त्याची इच्छा आहे. आपल्या लेकरांनीं उपासनेंत दु:ख न मानतां सुख मानावे अशी त्याची इच्छा आहे. जे त्याची भक्ती करावयास येतात त्यांनीं आपल्या आयुष्यक्रमांत आनंदीत असावें व सर्व बाबतींत प्रामाणिकपणानें व विश्वासानें वागावें म्हणून त्याच्या आस्थेचे व प्रेमाचे मौल्यवान् विचार बरोबर न्यावेत अशी त्याची इच्छा आहे. WG 98.3
वधस्तंभाभोंवती आपण एकत्र जमलें पाहिजे. खांबी दिलेला तो ख्रिस्तच केवळ आपल्या ध्यानाचा, संभाषणाचा, व आनंदवृत्तीचा विषय होऊन बसावा. ईश्वरापासून प्राप्त होणार्या प्रत्येक आशीर्वादाचा आपण विचार करावा व जेव्हां आपणांस त्याचें अगाध प्रेम कळून येईल, तेव्हां आपणांकरीता खांबावर ज्या हातास खिळे ठोकले त्या हातावर विश्वास ठेवण्यास आपण तेव्हांच तयार होऊं. WG 99.1
प्रार्थनारुप पंखांवरुन आपला आत्मा स्वर्गाच्या जवळ जवळ जाबा. तेथील दरबारांत गानवादनानें त्याची उपासना करतात व आपण कृतड्यताबुद्धि दाखवीत असतांना स्वर्गीय पाहुण्यांच्या उपासनेस त्यांच्याजवळ जाऊं. “जो स्तुति अर्पितो तो देवाला मान देतो.”1 WG 99.2
चला आपण आपल्या उत्पन्नकर्त्या ईश्वरासमोर उपकार मानून गायनाचा शब्द करीत2 जाऊं. WG 99.3