मोक्षमार्ग
परमेश्वराचा अमर्याद दयाळूपणा
मर्यादीत अशा मनुष्यप्राण्याचें ज्याप्रमाणें एकमेंकांशीम वर्तन असतें, त्याप्रमाणें ईश्वराचें त्यांशीं असत नाहीं. त्याचे विचार म्हणजे कृपेचे, प्रेमाचे, अत्यंत दयाळूपणाचे असतात. तो म्हणतो, “दुष्ट आपल्या मार्गास व अन्यायी मनुष्य आपल्या संकल्पांस सोडो; आणि परमेश्वराकडे फिरो, म्हणजे तो त्याजवर दया करील आणि आमच्या देवाकडे फिरो, कां की तो फार क्षमा करील.” “म्यां तुझें अपराध दाट ढगाप्रमाणें व तुझीं पातकें आभाळाप्रमाणें पुसून टाकिलीं आहेत. म्यां तुला उद्धरिलें म्हणून मजकडे परत ये.”1 WG 50.2
“जो मरतो त्याच्या मरणाविषयीं मी संतुष्ट नाहीं, म्हणून फिरा व वांचा असें परमेश्वर म्हणतो.”2 सैतान हा तर ईश्वराचीं आशीर्वादाचीं वचनें हिरावून नेण्यासच बसलेला आहे. आत्म्यांतून प्रत्येक आशातंतु व प्रकाशाचा प्रत्येक किरण नाहींसा करण्याची त्याची इच्छा आहे; परंतु तुम्ही त्यास तसें करूं देतां कामा नये. त्या मोहांत पाडणार्याकडे लक्ष न देतां म्हणा “मीं जगावें म्हणून ख्रिस्त मेला. त्याचें माझ्यावर प्रेम आहे, व माझा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाहीं. मला दयाळू स्वर्गीय पिता आहे; व जरी मीं त्याच्या प्रेमाचा दुरुपयोग केलेला आहे, व त्यानें दिलेल्या कृपादानांची उधळपट्टी केलेली आहे, तरी मी उठून आपल्या बापाकडे जाईन व म्हणजे ‘मीं स्वर्गाविरुद्ध व तुझ्यासंबंधानें पाप केलें आहे व तुझा पुत्र म्हणविण्यास योग्य नाहीं. आपल्या एका मोलकर्याप्रमाणें मला ठेव.”3 ह्या दाखल्यावर्य़्न बहकलेल्यांचा स्वीकार कोणत्या रीतीनें केला जाईल हें तुम्हांस कळून येईल. “तो दूर आहे इतक्यांत त्याच्या बाप त्याला पाहून कळवळला आनि धांवत जाऊन त्यनें त्याच्या गळ्यांत मिठी घातली व त्याचे मुके घेतले.” WG 51.1
हा दाखला जरी ममताळूपणा दाखविणारा व अंत:करण उचंबळून आणणारा आहे तरी त्यावरून आपल्या स्वर्गीय पित्याच्या अमर्याद दयाळूपणाची योग्य कल्पना करुन देण्यास तो अगदीं कोता आहे. प्रभूनें आपल्या भविष्यवाद्यांच्या द्वारें असें सांगितलें आहे, कीं “म्यां सार्वकालिक प्रीतीनें तुजवर प्रीति केली, म्हणून म्यां प्रसादेंकरून तुला ओढलें आहे.”4 पापी मनुष्य आपल्या बापाच्या घरापासून दूर असतांहि व आपली चीजवस्तु परदेशांत खर्च करीत असतांही त्या बापाचें अंत:करण त्याजकडे ओढ घेत आहे; पापी मनुष्याच्या अंत:करंणांत ईश्वराकडे परत जाण्याविषयीं उत्पन्न झालेली प्रत्येक इच्छा हें त्या पवित्र आत्म्याच्या विनंतीचें त्या बहकलेल्या मुलास बापाच्या प्रेमळ अंत:करणाकडे परत आणण्याचें कार्य आहे. WG 51.2
शास्त्रांतील मोठमोठीं वचनें तुम्हांपुढें असतां संशयाला तुम्ही जागा देतां काय ? ज्यावेळीं पापी मनुष्य आपल्या बापाकडे परत जाण्याची व आपल्या पापांचा त्याग करण्याची इच्छा करितो, त्या वेळीं प्रभु त्याला पश्चात्तापी अशा स्थितींत तो आलेला असतांहि आपल्या पायाजवळ येण्यास प्रतिबंध करितो असें तुम्हांस वाटते काय ? असे विचार मनांतहि आणूं नका. बापाविषयीं अशी कल्पना मनांत बाळगणें ह्यासारखें तुमच्या आत्म्याला अधिक अपाय करणारें दुसरें कांहीं एक नाहीं. तो पापाचा द्वेष करितो, परंतु पाप्यावर प्रेमच करितो. वैभवयुक्त राज्यांत शाश्वत सुख प्राप्त व्हावें अशी ज्यांची ज्यांचीं म्हणून इच्छा असेल, त्या त्या सर्वास वांचविण्यासाठीं ख्रिस्तरुपानें त्यानें अवतार धारण केला. आमच्याविषयींची प्रीति व्यक्त करण्यासाठीं त्यानें जी भाषा वापरली आहे तिजपेक्षां अधिक जोरदार व ममताळूपणाची भाषा कोठून उपयोगांत आणतां येणार? त्यानें म्हटलें आहे, “स्त्री आपल्या पोटच्या पुत्रावर दया न करुन आपल्या तान्ह्या बालकाला विसरेल ? होय, त्या कदाचित विसरतील, प्रंतु मी तुला विसरणार नाहीं”1 WG 52.1
संशयग्रस्त व कंपित झालेले असे तुम्ही वर पहा ! कारण प्रभु येशू हा तुमच्या मध्यस्थीसाठीं राहिलेला आहे. आपल्या प्रिय पुत्राच्या देणगीबद्दल ईश्वराचें आभार माना, व तुम्हांसाठी त्यांचें मरण व्यर्थ होऊं नये अशी प्रार्थना करा. आज तुम्हांस पवित्र आत्मा बोलावीत आहे. अंत:करणपूर्वक प्रभु येशूजवळ या, आणि त्याचा आशीर्वाद मिळवा. WG 52.2
ईश्वराचीम वचनें तुम्ही वाचित असतां त्यांत अवर्णनीय असें प्रेम व दया हीं दाखविलीं आहेत हें लक्षांत ठेवा. अमर्याद अशा दयेनें पापी मनुष्याकडे अत्यंत प्रेमळ अंत:करण ओढ घेत आहे. “त्याच्या रक्ताच्याद्वारें आम्हांस मुक्ति म्हणजे अपराधाची क्षमा मिळाली आहे.”2 होय, ईश्वर मदत करणारा आहे असा विश्वास मात्र ठेवा. आपली नैतिक छाया मनुष्यास परत देण्याची त्यास गरज आहे. पापस्वीकार व अनुताप ह्याम्नीं युक्त असे तुम्ही त्याजकडे जात असल्यामुलें कृपेनें व क्षमेनें तो तुम्हांस आपल्याकडे ओढील. WG 52.3