मोक्षमार्ग
व्यक्तिश: विश्वास ठेवण्याची जरुरी
हजारों लोक चुकतात ते ह्याच ठिकाणीं. प्रभु येशु व्यक्तिश: आमची क्षमा करितो ह्यावर त्यांचा मुळीच विश्वास बसत नाहीं. ईश्वराचें वचन ते मानीतच नाहींत. प्रत्येक पापाबद्दल सरसहा क्षमा केली जाते हें ते त्याच्या अटी मान्य करीतात त्यांस आपापल्यपरी समजण्याचा हक्क आहे. ईश्वराचीं वचनें आपणांसाठीं योजिलेलीं नाहींत हा भ्रम दूर करा. ती प्रत्येक आज्ञा मोडणाराकरिता परंतु पश्चात्ताप करण्याकरिता योजिलेली आहेत. प्रत्येक विश्वास ठेवणार्या प्राण्यास सामर्थ्य व कृपा ह्यांचा पुरवठा सेवा करणार्या देवदूतांकडून ख्रिस्त करीत असतो. जो केवळ पाप्यांसाठीं मरण पावला अशा येशूचे ठायीं ज्यांस सामर्थ्य, पवित्रपणा व नीतिमत्व हीं सांपडत नाहींत इतका पापी कोणीहि नाही. पापरुप कर्दमानें भरलेली व दूषित झालेली वस्त्रे पापी लोकांच्या अंगावरुन काढून त्यावर नीतिमत्तेचा शुभ्र झगा घालावयास तो अगदीं वाट पाहातच बसला आहे. तो त्यांस जिवंत राहाण्यास सांगत आहे, मरावयास सांगत नाहीं. WG 50.1