मोक्षमार्ग

18/28

देवाचें अमुल्य वचन

त्याप्रमाणेंच तुम्हीहि पापीच आहांत. तुम्हांस आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करीतां येत नाहीं, आपलें अंत:करन पालटता येत नाहीं, व स्वतांस पवित्र करिता येत नाहीं. परंतु ईश्वरानें हें सर्व ख्रिस्‍ताकडून करण्याचें वचन दिलें आहे. त्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा, आपलीं पापें पदरीं घ्या व स्वतांस देवाला वाहून घ्य. त्याची सेवा करण्याची इच्छा धरा. जितका विश्वास तुम्ही धराल, तितक्याच विश्वासानें ईश्वर तुमच्याशीं आपलें वचन राखील. त्या वचनावर---ईश्वरानें आपणांस क्षमा केली आहे, व आपलें अंत:करण शुद्ध केले आहे----जर तुम्ही विश्वास ठेवाल, तर ईश्वरहि आपलें वचन सत्य करील. आपन बरें झालों आहों असा जेव्हां त्या पक्षवात्यानें विश्वास धरीला तेव्हां त्याला ख्रिस्‍तानें सामर्थ्य दिलें; त्याप्रमाणेंच आपण बरें झालों आहोंत असा जेव्हाम तुम्ही विश्वास धराल त्यावेळीच तुम्ही बरें व्हाल. WG 48.2

आपणांला बरें केलें आहे अशी भावना तुमचें ठायीं होईपर्यंत वाट पाहूं नका; तर म्हणा कीं “मी त्त्यावर विश्वास ठेवितोंच व तें असें आहेच, याचें कारण मला भासतें म्हणून नव्हें तर देवाचेम वचन आहे म्हणून.” WG 48.3

प्रभू येशू म्हणतो, “जें कांहीं तुम्हीं प्रार्थना करून मागाल तें तुम्हांला मिळालेंच आहे, असा विश्वास धरा, म्हणजे तें तुम्हांस प्राप्‍त होईल.”1 ह्या वचनाला एक शर्त आहे, ती ही कीं, आपण मागावयाचें तें ईश्वराच्या इच्छेप्रमाणें मागावयाचें. WG 48.4

पापापासून आपली शुद्धता व्हावी व आपण त्याचीं लेकरें व्हावेम व आपला जीवनक्रम पवित्र व्हावा अशी ईश्वराची इच्छा आहे, म्हणून हे आशीर्वाद आपण त्याजजवळ मागून आपणांस ते मिळालेच आहेत असा विश्वास धरावा व ते मिळाल्याबद्दल त्याचे उपकार मानावेत. प्रभु येशूकडे जाऊन आपली शुद्धता करून घेण्याचा, व लज्जा, भीड वगैरे कांहीं एक न धरीतां न्यायासमोर उभें राहाण्याचा आपला हक्कच आहे. “जे ख्रिस्‍त येशूंत आहेत त्यांस आतां दंडाज्ञा नाहीं. कारण जो जीवनाच्या आत्म्याचा नियम, त्यानें मला ख्रिस्‍त येशूंत पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केलें.”1 WG 48.5