मोक्षमार्ग
अध्याय ४ था.—पापस्वीकार
“जो आपली पातकें झांकतो तो कल्याण पावणार नाहीं, परंतु जो पाप पदरीं घेऊंन सोडतो तो दया पावेल.”1 WG 32.1
ईश्वराची दया प्राप्त करून घेण्याच्या अटी साध्या, न्यायाच्या व संयुक्तिक आहेत. पापाची क्षमा व्हावी म्हणून एखादी कष्टदायक गोष्ट आपण करावी अशी प्रभूची इच्छा नाहीं. आपल्या जिवाची शिफारस करण्यासाठीं दूरदूरच्या व अति कष्टाच्या यात्रा करण्याची किंवा शरीरदंड सोसण्याची कशाचीहि जरूर नाहीं; परंतु जो मनुष्य आपलें पाप पदरीं घेऊन त्याचा त्याग करितो तोच मात्र दया पावेल. WG 32.2
प्रेषितानें म्हटलें आहे “तुम्ही निरोगी व्हावें म्हणून एकमेकांजवळ आपलीं पातकें कबूल करून एकमेकांसाठीं प्रार्थना करा.”1 ज्या एका ईश्वरालाच पापाची क्षमा करितां येते त्याजवळ तुम्हीं आपलीं पातकें कबूल करा, व एकमेंकांजवळ एकमेकांविरुद्ध केलेले मात्र अपराध कबूल करा. तुम्हीं आपल्या मित्राला अगर शेजार्याला दुखविलें असेल तर आपली चूक पदरांत घ्या म्हणजे त्यानें तुम्हांला मोकळ्या मनानें क्षमा करणें हें त्याचें कर्तव्य आहे; नंतर ईश्वराचीं क्षमा तुम्हांला मागितली पाहीजे, कारण ज्या भावाला तुम्हीं दुखविलें ती ईश्वराची मालमत्ता असल्यामुळें त्यास दुखविण्यांत त्याचा उत्पन्नकर्ता व तारणारा याविरूद्ध तुम्हीं पाप केलें, असें होईल. “जो सर्व प्रकारें आम्हांप्रमाणें पारखलेला होता तरी निष्पाप राहीला, व जो आमच्या दु:खानें कळवळला”2 व जो आमच्या पापाचा प्रत्येक डाग धुऊन काढण्यास समर्थ आहे अशा त्या आपल्या खर्या मध्यस्थ व प्रमुख याजकापुढें ही फिर्याद आणिलीं जाते. WG 33.1
आपलें अपराध कबूल करण्याच्या बाबतींत ज्यांनीं आपणाला ईश्वरापुढें नम्र केलें नाहीं अशा लोकांनीं, त्यानें त्यांचा स्वीकार करण्याच्या अटीपैकीं अगदीं पहिली अट-नम्रतेनें पाप स्वीकार करण्याची-पुरी केली नाहीं. ज्याच्याबद्दल आपणांस अनुताप व्हावयाचा नाहीं अशा दैवी पश्वात्तापाच अनुभव आपण घेतला नसेल व आपल्या खर्या लज्जित स्थितीनें व दुभंग झालेल्या अंत:करणानें आपल्या पापांचा तिरस्कार करून जर तीं कबूल केलीं नाहींत, तर खुल्या अंत:करणानें त्यांच्या क्षमेची अपेक्षा केली नाहीं असें होईल; व जर कधीं अशी अपेक्षाच केली नाहीं तर ईश्वराच्या शांतीचा लाभही कधी झालेला नाहीं असें होईल. पूर्वी झालेल्या पापापासून विनिर्मुक्त न होण्याचें कारण आपलीं अंत:करणें नम्र करण्यास व सत्यवचनांत (शुभ्वर्तमानांत) सांगितलेल्या अटी कबूल करण्यास आपण तयार नाहीं, हें होय. शास्त्रांत सदरहू बाबीसंबंधानें उघड उघड सूचना दिलेला आहे. पापाची कबुली, मग ती सर्व समाजांत केलेली असो, अगर गुप्तपणें केलेली असो, अंत:करनपूर्वक व स्पष्टपणें मात्र केलेली असली पाहिजे. अशी कबूली पापी मनुष्यापासून ओढून ताणून काढावयाची नसते, अगर पापाबद्दल तिरस्कार वाटणार्या शीलाची खरी किंमत समजण्याचें सामर्थ्य ज्यांचें ठायीं नसतें अशा मनुष्यांपासून जबरदस्तीनें काढवयाची नसते. अंतस्थ आत्म्यापासून स्वाभाविकपणें निघालेला पापाच्या कबुलीचा ओघ दयासागर ईश्वराकडे आपला मार्ग काढीत असतो. गीतकारानें म्हटलें आहे कीं, “मनाचें नम्र यांजवळ परमेश्वर असतो, आणि आत्म्यानें दीन असतील त्यांस तारतो.”1 WG 33.2
अंत:करणपूर्वक केलेलीं पापाची कबुली ही कांहीं विशिष्ट प्रकारची असून तो केलेलीच पापें प्रत्यक्ष कबूल करतें. तीं पापें कदाचित् ईश्वरापुढेंच आणण्याच्या स्वरूपाची असतील, अगर आपल्याकडून ज्यांस त्रास पोहोंचला असेल अशा व्यक्तीपुढें कबूल करण्यासारख्या दुष्कृत्यांच्या स्वरूपाची असतील, अगर तों सामाजिक स्वरूपाचीं असलीं तर सर्व समाजापुढें कबूल करावयाची असतील. म्हणून पापाची कबुली, मग ती कोणत्याही पापाची केलेली असो, पद्धतशीर, मुद्देसूद व ज्या पापाबद्दल तुम्ही अपराधी असाल तीच कबूल करनारी असली पाहिजे. WG 34.1
शमुवेलच्या वेळीं इस्त्राएल लोक देवापासून दुरावले होते, व आपल्या पापाचें प्रायश्चित भोगीत होतें; कारण ईश्वरावरील त्यांचा विश्वास उडून गेला होता. त्याचें सामर्थ्य व राष्ट्रांवर राज्य करण्याचें त्याचें शहाणपण हीं ओळखण्याची त्यांची शक्ति नष्ट झाली होती, व आपलें कार्य संभाळून तें तडीस नेण्याविषयींच्या त्याच्या बुद्धिचातुर्यावरिल त्त्यांचा विश्वास उडाला होता. सर्व जगावर सत्ता करणार्या ईश्वरास पाठमोरे होऊन सभोंवतालच्या इतर राष्ट्रांप्रमाणें राजकीय अमलाखाली राहण्याची त्यांनीं इच्छा बाळगली. त्यांस शांतता प्राप्त होण्यापूर्वी त्यांनीं “आम्ही राजा मागण्यानें आपल्या सर्व पापांवर आणखा दुष्कर्म केलें आहे”2 ह्याप्रमाणें पापस्वीकार केला. ज्या पापाबद्दल ते गुन्हेगार ठरेल होते तेंच पाप त्त्यांस कबुल करायाचें होतें. त्यांच्या कृतघ्नपणानें त्यांच्या जीवास टोचणी लावून त्याम्स इश्वरापासून दूर ठेविलें. WG 34.2
अंत:करणपूर्वक केलेल्या पश्चात्तापशिवाय व शीलाची सुधारणा झाल्याशिवाय केलेला पापस्वीकार ईश्वर मान्य करणार नाहीं. जीवनक्रमांत कायमचाच फरक झाला पाहिजे. ईश्वराविरुद्ध असलेला प्रत्येक गोष्टीचा त्याग केला पाहिजे व असें होणें हा पापाबद्दल झालेल्या खर्याखुर्या दु:खाचाच परिणाम होईल. आपणांला करावयाचें काम आपणांपुढें स्पष्टपणें मांडिलें आहे. “तुम्ही धुवा, आपणांस स्वच्छ करा, आपल्या आचारांचें दुष्टपणें माझ्या डोळ्यांपुढून दूर करा; दुष्ट करणें सोडा, उत्तम करायास शिका, नीति करायास शोधा, जाचलेल्यांस सुखी करा, अनाथाम्चा न्याय करा, विधवेची दाद लावा.”1 “जर दुष्ट गहाण परत देईल, व जें हरलेलें तें परत भरून देईल, अन्याय केल्यावांचून जिवाच्या नेमाप्रमाणें वर्तेल, तर तो वांचेलच; मरणार नाही.”2 पश्चातापाविशयीं साम्गतांना पौल म्हणतो “देवाच्या मनाप्रमाणें तुमच्या दु:खाचा प्रकार होता, याच गोष्टीनें तुम्हांस केवढी कळकळ, होय. केवढें दोषनिवारण, होय, केवढा संपाप,होय, केवढें भय, होय, केवढी उत्कंठा,होय, केवढी आस्था, होय, केवढी शिक्षा करण्याची बुद्धि हीं उत्पन्न झालीं. याकामांत तुम्हीं सर्व प्रकारें निर्दोष आहां असें तुम्ही पतविलें”3 WG 35.1
पापामुळें मनाच्या नीतिदृष्ट्या शक्ति व धीर होताता तेव्हां दुष्कर्म करणारांस आपल्या आचरणांतील व्यंगें दिसत नाहींत व पापाच्या अपराधाच्या महत्त्वाची योग्य कल्पना त्यास होत नाहीं; व पवित्र आत्म्याचें दोषी ठरविण्याचें जें सामर्थ्य त्याच्या इच्छेस त्यानें मान न दिला तर तो आपल्या पातकांविषयीम बहुतेक अंधदृष्टि बनतो. त्यानें केलेले पापस्वीकार अंत:करणपूर्वक व कळकळिचे नसतात. अमुक अमुक गोष्टी नसत्या तर मीं अमुक अमुक केलें असतें अशा प्रकारच्या सबबी तो ज्या अपराधांबद्दल त्त्याची निर्भत्सना केली जाते त्या अपराधांवर पांघरूण घालण्यासाठीं पुढें आणितो. WG 35.2
आदाम व हव्वा यांनीं मना केलेंले फळ खाल्ल्यानंतर त्यांस लज्जा व भीती वाटूं लागली. पहिल्या प्रथम त्यांचा विचार, आपल्या पापाबद्दल काय सबब सांगावी व भयंकर स्मरणदंड कसा चुकवावा हा होता. प्रभूनें त्यांस त्यांनीं केलेल्या पातकासंबंधानें विचारिलें तेव्हां कांहीं दोष ईश्वरावर व कांहीं आपल्या सहधर्मिणीवर ठेऊन आदाम म्हणाला. “जी स्त्री तूं मला दिली तिनें त्या झाडाचें फळ मला दिलें व म्यां खाल्लें.” बायकोनेहि आपल्यापरी सर्पावर दोष ठेऊन ती म्हणाली “सापानें मला भुलविलें आणि म्यां खाल्ले”1 तूं अगोदर सर्पच कशाला केलास ? त्याला एदेनमध्यें येऊन का दिलेंस ? अशाप्रकारे स्वतांच्या पतनाची जबाबदारी ईश्वरावर ढकलणारे प्रश्न पापाबद्दल सांगितलेल्या त्यांचा सबबींत गर्भींत अर्थानें होते. स्वतांस न्यायी ठरविण्याची बुद्धि असत्याचा मूळ पुरूष लबाडांचा बाप जो सैतान त्याजपासून उत्पन्न होऊन आदामाच्या वंशजात कायम राहिली नसल्यामुळें ईश्वरास मान्य झाली नाहीं. खरा अनुताप म्हटला म्हणजे तो स्वतांच्या अपराधाचें माप, फसवणूक अगर लबाडी न करितां स्वतांच्याव शिरावर घ्यावयास लावील. गरीब जकातदाराप्रमाणें आकाशाकडे विशेष रीतीनें दृष्टी न लावितां “हें ईश्वरा, मज पाप्यावर दया कर.”2 असें तो म्हणेल. जे आपलीं पापें कबूल करतील तेच न्यायी ठरतील, कारण पश्चात्तापी आत्म्याबद्दल प्रभु ख्रिस्त स्वतांच्या रक्तानें मध्यस्थी करील. WG 36.1
ज्यांत पापांबद्दल कोनतीहि सबब सांगितलेली नव्हती व स्वतांस न्यायी ठरविण्याचा प्रयत्न केला नव्हता, अशी खर्या पश्चात्तापाची व लाजेची शास्त्रांत जी उदाहरणें सांगितलीं आहेत त्याम्त पापाम्गीकाराचें लक्षण स्पष्टपणें सांगितलें आहे. प्रेषित पौलानें स्वताम्चा बचाव करण्याचा प्रयत्न केला नव्हता. आपल्या पापाचें स्वरूप कमी करण्याचा प्रयत्न न करितां त्यानें तें शक्य तितक्या वाईट स्थितींत उघड करून दाखविलें. तो म्हणतो, WG 36.2
“मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून बहूत पवित्र लोकांस बंदीशाळेत कोंडून टाकिलें, आणि त्त्यांच्या घातास मीं समत्ति दिलीं; आणि प्रत्येक सभास्थनांत त्यास वारंवार शासन करुन दुर्भाषण करण्यास लावण्याचा प्रयत्न करीत असें, आणि त्यांवर अतिशय पिसाळून बाहेरच्या नगरांपर्यंत देखील मी त्यंच्या पाठीस लागें.”1 “ख्रिस्त येशु पाप्यांस तारायास आला, त्या सर्व पाप्यांत मी मुख्य आहे.”2 “ख्रिस्त येशु पाप्यांस तारायास आला, त्या सर्व पाप्यांत मी मुख्य आहे.” खर्या पश्चात्तापाच्या स्वाधीन होऊन नम्र व कष्टी झालेल्या अंत:करणालाच ईश्वराच्या प्रीतीची व कॅलव्हरी येथें दिलेल्या किमतीची कांहींशी किंमत समजणार: आणि ज्या प्रमाणें मुलगा आपल्या प्रिय बापापुढें कबुलीजबाब देतो त्याप्रमाणें खरा पश्चात्तापी मनुष्य आपलीं पापें ईश्वरापुढें मांडतो. WG 37.1