मोक्षमार्ग

14/28

पापत्यागास विलंब लाविल्यानें होणारे दुष्परिणाम.

उद्यांवर ढकलण्याविषयीं सावध रहा. आपल्या पातकाचा त्याग करण्याचें व ख्रिस्‍तामार्फत आपलीं अंत:करणें शुद्ध करण्याचें भविष्यकालावर टाकूं नका. हजारों लोक चुकतात ते याच ठिकाणीं, व त्यामुळें ते आपलेम कायमचें नुकसान करून घेतात. आयुष्याच्या क्षणभंगुरतेबद्दल व अनिश्चिततेबद्दल मी ह्या ठिकाणीं विचार करीत बसत नाहीं, परंतु इतकें मात्र खचित सांगतों कीं. ईश्‍वराच्या पवित्र आत्म्याच्या सांगीप्रमाणें करण्यास विलंब लावण्यांत व पापामध्येंच कुजत पडणें यांत बरें वाटण्यांत धोका-कधींहि पुरतेपणीं समजून न येणारा धोका- आहे. पाप, मग तें कितीका क्षुल्लक असेना, अमर्याद अशा नुकसानालाच कारणीभूत होईल. जें आपण ताब्यांत ठेवीत नाहीं तेंच आपल्यावर ताबा करून आपला नाश करील. WG 28.1

आदाम व हव्वा, यांनीं नमा केलेलें फळ खाण्याइतक्या क्षुल्लक गोष्‍टींचा परिणाम ईश्वरानें सांगितल्याइतका भयंकर होणार नाहीं अशी आपली समजूत करून घेतली; परंतु ही इतकी क्षुल्लक गोष्‍ट म्हणजे ईश्वराच्या पवित्र नियमाचें उल्लंघन होऊन, व त्यामुळें मनुष्यांची ईश्वरापासून ताटातुट होऊन त्याला मृत्युचें द्वार खुलें झालें. मनुष्यानें ईश्वरी आज्ञेचा भंग केला म्हणून सर्व पृथ्वीवर युगानुयुग शोकाची सत्त आरोळी निघूं लागली व सर्व सृष्टि दु:खानें व शोकानें व्याप्‍त झाली. ईश्वराविरुद्ध केलेल्या दांडगाईचा परिणाम प्रत्यक्ष स्वर्गाला देखील भोगावा लागला. ईश्वरी नियमाच्या भंगाबद्दल भोगाव्या लागणार्‍या प्रायश्चित्ताकरीतां केलेल्या अलौकिक आत्म- यज्ञाची कॅलव्हरी ही संस्मरणीय जागाच होऊन बसली आहे. सबाब पातक ही केवळ क्षुद्र गोष्‍ट आहे असें आपण मानतां कामा नये. WG 28.2

आज्ञाभंगाची प्रत्येक बाब, ख्रिस्ताच्या कृपेची प्रत्येक हयगय व अवहेलना हीं आपणांवर कार्य करितात. तिच्या योगानें अंत:करण कठोर होऊन वासना दुष्‍ट बनतात व बुद्धीला भ्रंश पडतो व केवळ ईश्वराला शरण जाण्याची बुद्धि कमी होते, इतकेंच नव्हें, तर ईश्वरी आत्म्याच्या प्रेमल इच्छेप्रमाणें चालण्यास ती अगदीं असमर्थ होते. WG 29.1

कित्येक लोक वाटेल त्य वेळीं आपण पापाची दिशा बदलूं ह्या विचारानें गोंधळलेल्या विचारशक्तीस स्वस्थता आणण्याचा प्रयत्‍न करितात, आणि घरीं चालून आलेल्या ईश्वरी कृपेस तुच्छ मानून पुन: पुन: घोटाळ्यांत पडतात. त्यांस वाटतें कीं, कृपेच्या आत्म्याचा तिरस्कार करुन सैतानाकडे आपलें संधान बांधून ऎन प्रसंगीं आपणांस आपला मार्ग बदलतां येईल; परंतु हें करणें इतकें कांहीं सोईस्कर नाहीं. आयुष्यांतील अनुभव व शिक्षण यांच्या योगानें असें कांहीं शील बनलेलें असतें कीं, फारच थोडे लोक मूर्तीमंत ख्रिस्‍ताचा स्वीकार करण्याची इच्छा धरतात. WG 29.2

शीलांतील नुसता एक वाईट गूण, नुसती एकच पापाची इच्छा हीं जर हट्टानें बाळगून ठेवलीं तर ती शुभवर्तमानाचें सर्व सामर्थ्य नि:संशय बाजुला गुंडाळून ठेवतील. पापाची प्रत्येक आवड, आत्म्याचें ईश्वराशीं असलेलें वैर दृढ करितें. WG 29.3

जो मनुष्य अढळ अविश्‍वासूपणा अगर ईश्वरी सत्याबद्दल पूर्ण निष्काळजीपणा दाखवितो, तो जसें पेरितो तसेंच त्यास फळ मिळतें. शास्‍त्रांत साधु पुरुषांच्या वचनांस तुच्छ मानण्‍याविरुद्ध कडक शासन सांगितलें आहे, “पापी मनुष्य आपल्या पापाम्च्या बंधनांत सांपडेल.”1 तें शासन पापाची हयगय करण्याबद्दलच्या शासनाइतकेंच आहे. WG 29.4

पापापासून आपणांला मुक्‍त करायाला ख्रिस्‍त सदाचाच तत्पर आहे, परंतु तो मनुष्याच्या वासनांवर जुलूम करीत नाहीं; आणि जर त्या वासना ईश्वरी आज्ञेच्या उल्लंघनानें नेहमीं पापच करण्यास प्रवृत्त झाल्या, व आपण त्याच्या कृपेचा स्वीकार करण्यास राजी नसलों, तर त्यानें अधिक काय करावें ? त्याची प्रीति नाकारण्याच्या आपल्या निश्चयामुळें आपण आपला नाश करून घेतला आहे. “पहा, आतांच अभिष्‍ट वेळ; पहा, आतांच तारणाचा दिवस आहे.” “आज जर तुम्हीं त्याची वाणी ऎकाल, तर आपली मनें कठोर करूं नका.”1 WG 29.5

पुष्कळ लोक अंत:करण अशुद्ध अराखून दैवी स्वरूपाचा जो एक प्रकार बौद्धिक धर्म त्याचा अंगिकार करतात. परंतु तुमची प्रार्थना अशी असूं द्या कीं, “हे देवा मजमध्यें स्वच्छ हृदय उत्पन्न कर, आणि माझ्या अंगी शुद्ध आत्मा नवा कर.”2 तुम्ही आत्म्याशीम सत्यानें वागा. तुमचें मृत्युलोकचें जिणें जणूं काय पणास लाविलें आहे असें समजून उल्हासव्रुत्तीनें व चिकाटीनें वागा. ह्या विशयींचा ठराव देवामध्यें व तुमच्या आत्म्यामध्यें शाश्वत सुखाबद्दल व्हावयाचा आहे. कल्पनेंत मात्र आशा, परंतु कृतींत कांहीं नाहीं अशानें तुमचा नाश मात्र होईल. प्रार्थनापूर्वक देवाच्या वचनाचा अभ्यास करा. त्या वचनांत ईश्वरी नियमांतील व ख्रिस्ताच्या जिण्यांतील पवित्रपणाचीं उदात्त तत्त्वें-ज्यांच्या अभावीं “कोणीहि प्रभुला पाहणार नाहीं”3-सांदितलीं आहेत. तें वचन पापाबद्दल खात्री करितें व मुक्तिचा घोपटमार्ग स्पष्‍टपणें दाखवितें. तुमच्याआत्म्याबरोबर बोलणार्‍या ईश्वरी वाणीकडे (त्या वचनाकडे) लक्ष द्या. WG 30.1

पापाच्या गुन्ह्याचा मोठेपणा जर तुम्हांस दिसत असेल व तुम्हीं खरोखर ज्याप्रमाणें आहांत त्याप्रमाणेंच जर स्वतांस पहात असाल तर निराश होऊं नका. पाप्यांसच तारण्यासाठीं ख्रिस्‍त आला होता. आपणांला ईश्वराशीं तडजोड करावयाची नाहीं, तर-आश्चर्यकारक तें प्रेम !-देव ख्रिस्‍तांत “आपणांशीं जगाचा समेट करीत होता.”4 आपल्या बहकलेल्या लेकरांची अंत:करणें तो आपल्या दयाळूपणाच्या प्रीतिनें आपलीशीं करून घेत आहे. त्याचीं सर्व वचनें, व त्याच्या सूचना हीं अवर्णनीय अशा त्याच्या प्रेमाचा केवळ श्वासोच्छवासच आहेत. WG 30.2

तुम्ही पापी आहांत असें जेव्हां सैतान सांगायाला येईल तेव्हां तुम्ही आपल्या तारणार्‍याकडे पाहणें हेंच काय तें तुम्हांला उपयोगी पडेल. आपलें पाप कबूल करा, परंतु शत्रुला सांगा कीं “पाप्याच्या तारणासाठीं येशू ख्रिस्‍त जगांत आला,”तिम. १:१५. म्हणजे त्याच्या अतुल प्रितीनें तुझें तारण होईल. येशूनें शिमोनला दोन कर्जदारासंबंधानें प्रश्न विचारीला. त्यांपैकीं एकाला लहानशी रक्कम आपल्या धन्याला द्यावयाची होती व दुसर्‍याला बरीच द्यावयाची होती. धन्यानें दोघांसहि ज्याच्या त्याच्या रकमा सोडून दिल्या; ख्रिस्‍तानें शिमोनला विचारलें ह्या दोघांपैकीं कोणता देणेदार धन्यावर अधिक प्रीति करिल ? शिमोननें उत्तर केलें “ज्याला अधिक सोडलें तो.” आपण फार पापी आहों, परंतु आपणांला क्षमा व्हावी एतदर्थ ख्रिस्‍त मरण पावला. त्याच्या आत्मयज्ञाचें पुण्य आपणांकरीतां बापापुढें करणें पुरेसें झालें. ज्यांला त्यानें अधिक क्षमा केली ते त्याजवर ज्यास्त प्रीति करणार , व त्याच्या प्रीतीबद्दल व अलौकिक स्वार्थत्यागाबद्दल त्याचें स्तुतिस्तोत्र गाण्यास ते त्याच्या सिंहासनाजवळ उभे राहतील. इश्वराच्या प्रेमाची पूर्णपणें कल्पना जेव्हां आपणांस होते तेव्हां पापाचीहि योग्य किंमत आपणांस कळून येते. आपणांसाठीं खालीं सोडून दिलेल्या साखळीची लांबीं जेव्हां आपन पाहतों व जेव्हां आपणांप्रीत्यर्थ ख्रिस्‍तानें केलेल्या आत्मयज्ञाची कांहींशी ओळख आपणांस होते, तेव्हा आपलें अंत:करण प्रेमानें व पश्चात्तापानें भरून येतें. WG 31.1