युगानुयुगांची आशा

1/88

युगानुयुगांची आशा

प्रस्तावना

मानवजातीच्या अंतःकरणात, मग ते जीवनात कोणत्याही वणाचे अगर स्थानाचे असो, त्यांच्या संग्रही नसलेल्या अशा अव्यक्त उत्कट इच्छा आहेत. मनुष्य स्वतःची सांप्रत परिस्थिती किंवा बरे वाईट संपादन केलेले कौशल्य व ज्ञान यांच्यामध्ये तो तृप्त राहाणार नाही म्हणून ही उत्कट इच्छा त्या प्रेमळ देवाने मनुष्याच्या देहस्वभावामध्ये खोलवर बिंबविलेली आहे. मानवाच्या अंतःकरणातील ही तीव्र इच्छा त्याला ती तृप्त करण्याकडे मार्गदर्शन करील. ही इच्छा त्याच्यापासूनच उद्भवलेली आहे आणि तो त्याच्याकडेच घेऊन जाईल. तो त्या इच्छेची परिपूर्णता व परिपूर्ती आहे. ही परिपूर्णता (विपुलता) सनातन देवपुत्र येशूख्रिस्तामध्ये आढळते. DAMar 3.1

हाग्गय संदेष्टा त्याला “अखिल राष्ट्रांची आशा’ म्हणून संबोधतो, आणि आम्ही त्याला “युगानुयुगांची आशा’ असे संबोधू शकतो. तो “युगानुयुगांची राजाधिपती सुद्धा” आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक उत्कट इच्छा समाधान पावेल, तृप्त होईल त्या येशू ख्रिस्ताला सादर करणे हा ह्या ग्रंथाचा उद्देश आहे. टीकाकार व जिज्ञासू मनाचे समाधान करण्यासाठी येथे प्रयत्न करण्यात आला नाही तर सर्वांना सहभागी होता येईल असे ख्रिस्त जीवनाच्या दिव्य सौंदर्याची ओळख करून देणे आणि देवाची प्रीती त्याच्य पुत्रामध्ये प्रगट करणे हा हेतू आहे. स्वतःच्या सात्त्विक शीलस्वभावाने त्याने शिष्यांना आपल्याकडे आकर्षण करून घेतले आणि वैयक्तिक उपस्थितीने त्यांच्या दुःखाच्या व गरजेच्या प्रसंगी दर्शविलेल्या सहानुभूतीपूर्वक व्यवहार्य साक्षात स्पर्शाने आणि सतत सहभागाने त्याने त्यांच्या दैहिक स्वभावाचे दिव्य स्वरूपात रूपांतर केले. त्याचप्रमाणे वाचक वर्गाने समोरासमोर येऊन त्याच्याशी हितगुज करण्यासाठी उद्धारकाला सादर करण्याचा उद्देश ह्या ग्रंथाद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे तो महान येशू पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे आणि त्याच्याद्वारे देवाकडे येणाऱ्या सर्वांचे तो परिवर्तन करितो हे त्यांना समजून येईल. DAMar 3.2

येशूच्या जीवनातील नवी सौंदर्य लेखिकीने ह्या ग्रंथात मांडली आहेत. सत्याच्या खाणीतील नवीन रत्नांचे हुबेहूब वर्णन करून त्यांचे चित्र रेखाटले आहे. अथांग खजिन्यातून स्वप्नात पाहिली नाही अशी दौलत वाचकासमोर उघड मांडली आहे. परिचित परिच्छेदातून नवनवा व वैभवी प्रकाश चमकतो आहे. प्रत्येक पाप्याचा कनवाळू व मायाळू जीवलग स्नेही म्हणून येशू ख्रिस्ताला प्रगट करण्यात आला आहे. ह्या ग्रंथातील वचनाद्वारे तुम्हाला जीवनी वचनाचा लाभ होवो आणि पर्यायाने अनंत, शाश्वत जीवन लाभो. DAMar 3.3