ख्रिस्ताचे बोधमय दाखले

34/70

अध्याय १८ वा—“सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांस आणा”

लूक १४ : १, १२-२४ यावर आधारीत

“तो (येशू) एका शब्बाथ दिवशी परूश्यांतील कोणाएका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला, तेव्हा असे झाले की ते त्याच्या पाळतीवर बसले होते;” COLMar 158.1

“मग ज्याने त्याला आंमत्रण केले होते त्यांनाही तो म्हणाला, जेव्हा दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ करीशील तेव्हा तू आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यास बोलावू नको; बोलाविल्यास कदाचित तेही तुला उलट आमंत्रण करतील व तुझी फेड होईल. तर तू मेजवानी करीशील, तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व अंधळे यांस आमंत्रण कर; म्हणजे तू धन्य होशील. तुझी फेड करावयास त्यांजजवळ काही नाही; तरी धार्मिकांच्या पुनरूत्थानासमयी तुझी फेड होईल. COLMar 158.2