ख्रिस्ताचे बोधमय दाखले
हरवलेले मेंढरू
जे श्रोतेजण होते त्याना ख्रिस्ताने पवित्र शास्त्रातील वचनांची आठवण करून दिली नाही. त्यांचा जो अनुभव आहे त्याची त्यांनी साक्ष पुढे ठेवावी. यार्देन नदीच्या पूर्वेस जो गवताळ प्रदेश आहे तेथे मेंढरास भरपूर चारा, तेथील जंगलातील टेकडया व झाडी यात चरावयास गेलेली कित्येक मेंढरे हरवलेली असतात त्यांना शोधून आणणे यासाठी मेंढपाळाना शोधणेसाठी जावे लागते. येशू सभोवार जमलेले लोकांत मेंढपाळ होता व ज्या श्रीमंत लोकांनी मेंढरे व गुरेढोरे खरेदी करण्यात पैसे घातले होते असेही लोक बसले होते, त्या सर्वांना येशूचे हे स्पष्टीकरण आवडले होते. “तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले, तर ती नव्याण्णव रानात सोडून देवून हरवलेले सापडेपर्यंत त्याचा शोध करीत नाही?‘‘ COLMar 130.1
येशू म्हणाला, “ज्या आत्म्यांचा तुम्ही धिक्कार केला तेच लोक परमेश्वराची मालमत्ता आहेत. ते उत्पत्तीमुळे व तारण योजनेमुळे येशूचे आहेत आणि त्याच्या दृष्टीने मौल्यवान आहेत. मेंढपाळ त्याच्या मेंढरावर प्रेम करीतो आणि एक जरी हरवले तरी तो घरी बसून राहत नाही आणि मानव हा बहिष्कृत आत्म्यावर परमेश्वर प्रिती करीतो ती किती तरी अधिक आहे. परमेश्वराच्या प्रितीचा, मानव धिक्कार करतील, ते परमेश्वरापासून दूर बहकून जातील, ते दुसरा धनी पत्करतील, असे झाले तरी ते परमेश्वराचे आहेत आणि परमेश्वर त्याच्या लोकांस मुक्त करावे यासाठी आतुर असतो. परमेश्वर म्हणतो “जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरामध्ये राहून त्यास हुडकितो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरास हुडकीन, आणि अभ्राच्छादीत व अंधकाराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणातून त्यास बचावून आणीन‘‘ यहज्केल ३४: १२. COLMar 130.2
या दाखल्यात मेंढपाळ त्याचे एक हरवलेले मेंढरू शोधावयास जातो आणि ते मेंढरू त्या कळपात एक शुल्लक होते. याप्रमाणे जर एक आत्मा हरवला असता तर ख्रिस्ताने येवून त्या एका आत्म्यासाठी मरणदंड दिला असता. COLMar 130.3
जे मेंढरू कळपातून बहकले गेले ते सर्व प्राण्याहून दुर्बळ होते. त्या मेंढरास परत येणे शक्यच नव्हते म्हणून मेंढपाळानेच जावून त्याला शोधून आणणे जरूरीचे होते. तद्वतच जो आत्मा बहकून जातो तो वरील मेंढराप्रमाणेच दुर्बळ असतो आणि म्हणूनच परमेश्वर प्रितीस्तव त्याला शोधावयास आला, असे जर झाले नसते तर परमेश्वराकडे परत जाणेचा मार्ग त्याला मिळाला नसता. COLMar 130.4
मेंढपाळाने त्याचा कळप पाहिला मोजला व त्यात एक नाही असे समजून आले तेव्हा असे म्हणाला नाही की “ही नव्याण्णव आहेत आणि ते एक शोधावयास जाणे यासाठी त्रास कशाला घ्या. त्या मेंढराला परत येऊ दया, ते परत आले म्हणजे मी कोंडवाडयाचा दरवाजा उघडून त्याला आत घेईन‘‘ नाही, तो असा विचार करीत थांबला नाही ते मेंढरू हरवले हे समजताच त्याला दु:ख झाले व काळजी वाट लागली. तो ती मेंढरे पुनः पुनः मोजू लागला. एक मेंढरू हरवले हे समजताच त्याचे भान उडाले. ती नव्याण्णव मेंढरे कोंडवाडयात तेथेच सोडली आणि ते एक हरवलेले शोधावयास तो बाहेर निघून गेला. जसजशी रात्र अंधारी होवू लागली, वादळ वाढू लागले व मार्ग भितीदायक होवू लागला तसतसे त्या मेंढपाळाची उत्सुकता वाढू लागली व तो बारकाईने शोध करू लागला. त्या एका हरवलेल्या मेंढराच्या शोधासाठी तो अटोकाट प्रयत्न करू लागला. COLMar 131.1
जेव्हा त्या मेंढराचा अस्पष्ट आक्रोश त्याच्या कानी प्रथमच पडला तेव्हा त्याला किती बरे वाटले असेल आणि त्या आवाजाच्या दिशेने तो डोंगर चढू लागला व स्वत:चा जीव धोक्यात घालून डोंगराच्या कडयापर्यंत पोहचला. मेंढराची आरोळी कमी कमी होवू लागली यावरून मेंढपाळाला समजले की मेंढरू मरणाच्या पथावर आहे. शेवटी त्याच्या कष्टाचे फळ मिळाले; हरवलेले सापडले. आपल्याला त्या मेंढराने इतका त्रास दिला म्हणून तो रागे भरला नाही. त्याने त्याला चाबकाने झोडपले नाही. त्याने त्याला आपल्या घरी हाकत आणले नाही. त्या आनंदात त्या थरथरणाऱ्या कोकराला त्याने उचलून खांद्यावर घेतले. त्या जखमी झालेल्या खरचटलेल्या मेंढराला उचलून छातीशी लावले अशासाठी की त्याला उब मिळावी. आपला शोध व्यर्थ झाला नाही म्हणून त्याने कृतज्ञेने त्याला आपल्या कळपात उचलून आणले. COLMar 131.2
आपल्या कल्पनाप्रमाणे, दु:खी व खाली हात आलेल्या धनगराचे चित्र परमेश्वराने सादर केले नाही म्हणून आपण त्याचे आभार मानू या. हा दाखला अपयशाबद्दल बोलत नसून मेंढरू मिळालेल्या यशाबद्दल व आनंदाबद्दल सांगत आहे. या ठिकाणी हरवलेले एक सुध्दा मेंढरू बहकुन जात नाही व एकाला सुध्दा मदत होत नाही असे घडत नाही. ज्याच्यासाठी ख्रिस्त खंडणी देण्यास तयार आहे त्या प्रत्येकाला ख्रिस्त नाशवंत खडयातून व जंगली झुडपातून काढेल. COLMar 131.3
तुम्ही वाईट गोष्ट केली असली तरी निराश आत्म्याला धैर्य येईल. देव तुम्हाला कदाचित क्षमा करेल व आपल्या कळपात आणेल असे समजू नका. परमेश्वराने प्रथम पुढाकार घेतला आहे. तुम्ही त्याच्या विरूध्द बंड केले असता तो तुमच्या शोधात गेला. अगदी मेंढपाळाच्या दयाळू अंत:करणाने त्याने त्याच्या नव्याण्णव मेंढरांना सोडून, जे हरवले आहे त्याच्या शोधात तो रानात गेला. जो आत्मा नाश पावत होता त्याला, येशूने त्याचे ते जखमी व व्रण असेलेले हात यांनी प्रितीने व आनदाने कवटाळले व त्याला उचलून कळपात आणले. COLMar 131.4
यहुदी लोकांनी असे शिक्षण दिले की, पापी लोकांना परमेश्वराची प्रिती दाखविणे वा ती त्याच्या पावेतो पोहचणे यापुर्वी त्या पापी मनुष्याने पश्चात्ताप केला पाहिजे. पश्चात्ताप म्हणजे मनुष्य परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेतो असा यहुद्यांचा दृष्टिकोन होता. परूशी लोकांचाही समज वरीलप्रमाणे होता म्हणून ते आश्चर्याने व रागाने म्हणाले की, “हा मनुष्य पापी लोकांचा स्विकार करीतो‘‘ त्यांच्या या कल्पनेप्रमाणे येशूने कोणाही मनुष्याला, पश्चात्ताप केल्याविना त्याच्याकडे येऊ देऊ नये. पण, हरवलेले मेंढरू या दाखल्यात ख्रिस्त हे शिकवितो की, तारण प्राप्त होण्यासाठी आम्ही परमेश्वराकडे जावे असे नव्हे तर परमेश्वर आमच्या शोधार्थ येतो. “जाणता कोणी नाही, देवाचा (परमेश्वर) शोध करणारा कोणी नाही, सर्व बहकले आहेत, ते एकंदर निरूपयोगी झाले आहेत, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही’ रोम ३:११, १२ परमेश्वराने आम्हांवर प्रिती करावी म्हणून आपण पश्चात्ताप करीत नाही. पण परमेश्वर त्याची प्रिती आम्हांवर प्रदर्शित करीतो यासाठी की आम्ही पश्चात्ताप करावा. COLMar 132.1
जेव्हा ते हरवलेले मेंढरू घरी आणले तेव्हा तो मेंढपाळ उपकार स्तुतीचे गीत गाऊ लागला. तो त्याचे शेजारी व मित्रांना बोलावून म्हणाला, “माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.”जेव्हा महान मेंढपाळ येशू यांस त्याचे हरवलेले मेंढरू सापडते तेव्हा स्वर्ग व पृथ्वी ही एकत्र येऊन उपकारस्तुती व हर्ष करीतात. COLMar 132.2
“त्याप्रमाणे ज्यास पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव धार्मिकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल.’ ख्रिस्त म्हणाला, “तुम्ही परूशी स्वत:ला स्वर्गास लायक असे समजता तुम्हाला वाटते तुम्ही तुमची धार्मिकता प्राप्त करू शकता. तेव्हा हे समजून घ्या, तुम्हाला जर वाटत असेल तुम्हांला पश्चात्तापाची गरज नाही तर मग माझे कार्य तुम्हांसाठी नाही. हे जे दरीद्री आत्मे, त्यांना जग पापी व दरिदी समजते. अशांची सुटका करावयास मी आलो आहे. तुम्ही ज्यांचा धिक्कार करीता, जे असे हरवलेले आहेत अशा लोकांतच स्वर्गीय देवदूताना गोडी आहे. ज्यांचा तुम्ही उपहास करीता व त्यांच्याविषयी कागाळी करीता. कारण हे लोक माझा (येशू) स्विकार करीतात पण या माझ्या लोकाविषयी स्वर्गीय देवदूत आनंद करीतात व स्वर्गीय नगर विजयी गाणी गावून दुमदुमून टाकतात. COLMar 132.3
शास्त्री उलट शिक्षण देत जेव्हा कोणी एक परमेश्वराविरूध्द पाप करीतो तेव्हा त्याचा नाश केला जातो. त्या समयी आनंद केला जातो, पण येशुने शिक्षण दिले की शिक्षा देणे हे परमेश्वराच्या दृष्टीने एक विचित्र कार्य आहे. ज्या मानवास परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचे निर्माण केले त्या मानवात परमेश्वराच्या प्रतिशीलाची स्थापना करणे यात सारा स्वर्ग हर्ष मानतो. COLMar 133.1
जो कोणी परमेश्वरापासून पापात दूर बहकत गेलेला, जेव्हा परमेश्वराकडे परत येतो तेव्हा त्याजविषयी टिका केली जाते व अविश्वास दर्शविला जातो. काही जण म्हणतील त्याचा पश्चात्ताप खरा आहे का याविषयी मला संशय वाटतो किंवा कुजबुजतील, “तो स्थिर नाही, तो शेवटपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही‘‘ असे म्हणणारे लोक परमेश्वराचे कार्य करीत नसून सैतानाचे कार्य करीतात, कारण सैतान हा त्याच्या बांधवास दोषारोप करणारा आहे. अशा दोषारोपामुळे दुष्ट लोकांच्या आशेची निराशा होते आणि ते अधिक निराश होवून परमेश्वरापासून अधिक दूर बहकून जातात. पण पापी लोकांनी हे लक्षात ठेवावे की एका पश्चात्तापी पापी मनुष्याबद्दल स्वर्गात आनंद होतो कारण तो परत परमेश्वराकडे येतो. जे परूशी त्या पापी मनुष्याची निंदा व चेष्टा करीतात त्याकडे त्याने लक्ष न देता परमेश्वराची प्रिती याविषयी विचार करावा. COLMar 133.2
ख्रिस्ताचा दाखला याचा भावार्थ जकातदार व पापी यांना लागू आहे हे शास्त्री लोकांना समजेल, पण या दाखल्यात त्याहून अधिक अर्थ होता. ते हरवलेले मेंढरू याचा अर्थ व्यक्तिगत होता शिवाय हे जग परमेश्वरापासून बहकून पापात जावून नाश पावत आहे. परमेश्वराने निर्माण केलेले अखिल विश्व यात हे जग जणू काय एक अणू-कण असे आहे आणि परमेश्वराचे या सर्वावर साम्राज्य आहे आणि हे पतन पावलेले जग त्या बहकलेल्या मेंढराप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने फार मौल्यवान आहे. इतके की ती नव्याण्णव कोंडवाडयात सुरक्षित होती. त्यापेक्षा मौल्यवान वाटते. ख्रिस्त, स्वर्गीय नगरातील सरसेनापती तेथून खाली आला. त्याने त्याचे सर्व वैभव जे पित्यापाशी असताना होते ते तेथेच ठेविले व मानवाच्या तारणासाठी येथे आला. जी नव्याण्णव पापविरहीत त्यांना त्याने तेथे सोडले व या पृथ्वीवर आला व येथे आला तेव्हा आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला.”(यशया ५३:५) परमेश्वराने त्याचा पुत्र याच्याद्वारे स्वत:ला दिले यासाठी की हरवलेले मेंढरू परत आणणे हा आनंद प्राप्त व्हावा. COLMar 133.3
“आपल्याला देवाची (परमेश्वर) मुले हे नाव मिळाले यात पित्याने आपल्याला केवढे प्रितीदान दिले आहे ते पाहा‘‘१ योहान ३: १ आणि ख्रिस्त म्हणतो “जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यांस जगात पाठविले‘‘ (योहान १७ : १८) - “तुम्हासाठी जी माझी दु:खे त्यामध्ये... ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढितो‘‘ (कलस्सै १:२४) ख्रिस्ताने ज्या प्रत्येक आत्म्यास तारीले आहे त्या प्रत्येकाने ख्रिस्ताच्या नामाने हरवलेले लोकांचे तारणासाठी कार्य करावे. या कार्याची इस्त्राएलांत हेळसांड होत आहे. जे कोणी ख्रिस्ती म्हणवीतात त्यांच्याद्वारे या कार्याकडे दुर्लक्ष केले जात नाही काय? COLMar 134.1
वाचकहो, परमेश्वरापासून बहकलेले असे कितीजणांचा तुम्ही शोध करून त्यांना परत प्रभूच्या कळपात आणले आहे ? जे लोक तुम्हास निरर्थक वाटतात, त्या तेव्हा ज्या आत्म्यासाठी प्रभुने त्याचा प्राण दिला त्याच्याविषयी तुम्ही निष्काळजीपणा दाखविता हे तुम्हास समजते काय ? जेव्हा तुम्ही त्यांच्यापासून माघार घेवून निघून जाता त्याचवेळी कदाचित त्यांना तुमची जास्त गरज असावी असे असू शकेल. प्रत्येक उपासनेच्या सभेत असे आत्मे आहेत की त्यांना शांति व विश्रांतीची गरज आहे. जे कदाचित निष्काळजीपणे जगत असतील पण ते पवित्र आत्म्याच्या वाणीला धिक्कारत नाहीत. त्यांच्यापैकी पुष्कळजण ख्रिस्तासाठी जिंकले जातील. COLMar 134.2
जर ते बहकलेले मेंढरू परत कळपात आणले नाही तर ते तसेच भटकत राहून शेवटी नाश पावेल. पुष्कळ आत्मे नाशाप्रत जातील कारण त्यांना कोणी सहाय्यक हात पुढे केला नाही. हे पापी लोक निष्काळजी व कठीण अंत:करणाचे दिसतील, पण इतरांना जे फायदे मिळाले ते जर त्यांना मिळाले असते तर त्यांचे जीवन अधिक सभ्य असे दिसून आले असते व सेवेसाठी त्यांनी अधिक कला-दान दाखविले असते. असे बहकलेले लोकांबाबत देवदूतांना किव येते. देवदूत अशा लोकांबाबत रडत असताना, मानवी डोळे कोरडे व अंत:करणात प्रितीचा लवलेशही दिसून येत नाही. COLMar 134.3
जे मोहात पडून चुकलेले आहेत अशांना सखोल हदयस्पर्शी सहानुभूती दाखविणे। आम्ही आमचा स्वाभिमान बाजुला ठेवून अधिक अधिक ख्रिस्ताची आत्मियता दाखवावी ! COLMar 134.4
ख्रिस्ताचा दाखला हा आम्हा परूशी लोकांना धमकावणे आहे हे त्यांना समजले. ख्रिस्ताने त्याच्या कार्यावरील टिका स्विकारणे ऐवजी त्यानी जकातदार व पापी यांच्याविषयी जो निष्काळजीपणा केला त्याचा येशूने धिक्कार केला. हे कार्य येशूने उघडपणे केले नाही. कारण अशाप्रकारे ते कठोर अंत:करणाचे झाले असते, पण येशूने जे उदाहरण दिले त्याद्वारे परमेश्वराने त्यांना कोणते कार्य करावयाचे ते स्पष्ट केले, कारण हे कार्य करणे यात ते पराभूत झाले होते. हे जे इस्त्राएलातील पुढारी जर ते खरे मेंढपाळ असते तर त्यांनी जरूर मेंढपाळाचे काम केले असते. ख्रिस्ताची कृपा व प्रिती ही त्यांनी प्रगट केली असती अणि येशूबरोबर त्याच्या कार्यात त्यांनी हातभार लाविला असता. त्यांनी हे कार्य करावयास नकार दिला याचा अर्थ त्यांची धार्मिकता ही खोटी होती. पुष्कळांनी ख्रिस्ताच्या या दोषारोपाचा धिक्कार केला तर काहींनी त्याचा स्विकार केला व त्यांचा पालट झाला. ज्यांनी स्विकार केला अशा लोकांवर, ख्रिस्ताचे स्वर्गारोहण झाले त्यानंतर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला आणि येशुने हरवलेले मेंढरू या दाखल्याचे कार्य करावयास शिष्यांबरोबर सहकारी झाले. COLMar 134.5