ख्रिस्ताचे बोधमय दाखले

1/70

ख्रिस्ताचे बोधमय दाखले

प्रस्तावना

ख्रिस्त महान् शिक्षक, त्याच्या शिष्यासोबत पॅलेसस्ताईन येथील प्रदेशांत चालत असता तेथील सरोवर व नद्या काठी विसावा घेत असता त्याच्या शिष्यांना निसर्गाद्वारे धडे शिकवीत होता. जीवनातील सामान्य प्रसंग व सामान्य गोष्टी यांचा संबंध ख्रिस्ताने दाखले शिक्षणाने जोडला. मेंढपाळ, बांधकाम करणारे, शेतकरी, प्रवासी व गृहदक्ष लोक यांच्या अनुभवांतील सत्य प्रकट केली. परिचयाच्या गोष्टींचा संबंध खरे विचार, जीवनाचे सौंदर्य परमेश्वराचे आम्हांविषयीचे प्रेमळ विचार, आम्ही परमेश्वराचे उपकार जाणणे ही कर्तव्य जाणीव व आम्ही एकमेकांची मानवी जीवनात कशी मदत करावी, काळजी घ्यावी हे संबंध दाखवून दिले. अशा प्रकारे खरे ज्ञान व व्यावहारिक सत्य ही जोरदारपणे प्रभावी केली. COLMar 3.1

हे सर्व दाखले विषयानुसार गटवार केले आहेत. त्यातील विषय विस्तृत करून स्पष्टीकरण केले आहे. या दाखल्यात सत्याचे हिरे आहेत, वाचकांच्या लक्षात येईल की आपल्या सभोवारच्या दररोजच्या जीवनातील सामान्य घडामोडीतून हे अमोल विचार मांडलेले आहेत. COLMar 3.2

या दाखल्यातील गोष्टींद्वारे शिक्षणात चांगली मदत होईल, शिवाय ख्रिस्ती शिक्षणाची गोडीही निर्माण होईल. COLMar 3.3

या दाखलेरूपी शिक्षणाद्वारे तारणारा येशू याची शिकवण चांगली समजून तारणारा येशू महान् शिक्षक जीवनात आदर्श मानला जाईल ! COLMar 3.4