आरोग्यदायी सेवा

60/172

रुग्णाची मुलाखत

दया दाखविण्याची चुकीची पद्धत वारंवार रुग्णाला भेटी देणे काहीही विचारणे या गोष्टी टाळाव्यात जे रुग्ण गंभीर आजारी आहेत त्यांच्या भेटीला मनाई करावी. कारण रुग्णाला शांती आणि विश्रांतीची गरज असते. त्याला वारंवार भेटायला येणाऱ्यामुळे तो थकून जातो म्हणून आजारपणात रुग्णास भेटीला येणाऱ्यांना मनाई करावी. जुना आजार असणाऱ्या रुग्णासाठी त्यांच्याशी प्रेमाने व्यवहार करावा त्यांना दु:ख होईल अस काही बोलू नये. उलट त्यांना भावनामय होऊ देऊ नये व त्यांच्याशी सफान्यपणे बातचित करावी. त्यांना उत्तेजनार्थ संदेश पाठवून त्यांचे समाधान करावे. MHMar 169.2