आरोग्यदायी सेवा

53/172

वृद्ध :

वृद्ध लोकांची काळजी घेण्यासाठी प्रभावी कुटुंबाची आवश्यकता आहे. ख्रिस्ती बंधुभगिनीच्या घश्रांमध्ये वृद्धांसाठी घरगुती वातावरण निर्माण करुन त्यांच्यासाठी कौटुंबिक जिव्हाळ्याचे प्रेम देऊन त्यांचे समाधान करावे. आपल्या कुटुंबामध्ये असणारे वृद्धांना कौटुंबिक कार्यामध्ये काहीतरी जबाबदारी देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणजे कुटुंबातील उपयोगाचा अजूनही अंत झाला नाही याची त्यांना जाणीव होऊन ते आनंदी व समाधानी होतील. त्यांच्यामध्ये अजूनही इतरांना सहाय्य करण्याची पात्रता आहे हे ओळखून ते आनंदीत होतील. अशाप्रकारे ते आपल्या वृद्धत्वाचा आनंद भोगतील. MHMar 152.3

ज्यांचे केस पांढरे होत आहेत चालतांना पाय अडखळत आहेत आणि ते कबरेकडे जाण्याची तयारी करीत आहेत अशांना शक्य होईल तोपर्यंत त्यांचे मित्र व ओळखिच्या लोकांच्या संपर्कामध्ये चालणे बोलणे करण्याची तरतूद करावी. त्यांच्याबरोबर त्यांनी धार्मिक सभांना जाऊन वेळ खर्च करावा. कोमल हृदय आणि हातांनी त्यांची काळजी घ्यावी. जेव्हा कधी संभव होईल तेव्हा प्रत्येक कुटुंबामधील सर्वांना आपल्या प्रिय जनांची विशेषतः वृद्धांची खास काळजी घ्यावी. तेच आपले सौभाग्य समजावे. MHMar 153.1

जेव्हा कधी असे शक्य होते तेव्हा कुटुंबातील प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेणे हे त्यांचे भाग्य समजतात आणि जर असे होत नसेल तर मंडळीने आपले कर्तव्य समजून करायला हवे आणि जबाबदारी सुद्धा समजावी. ज्यांच्यामध्ये ख्रिस्ती आत्मा आहे त्यांनी दुर्बलआणि वृद्धांची योग्य काळजी घ्यावी. MHMar 153.2

यामधील काही असहाय्या लोकांची आपल्या घरामध्ये उपस्थिती असणे म्हणजे ती खुद्द ख्रिस्ताचीच सेवा केल्यासारखे होते. यामुळे आपल्या स्वभावगुणाचा विकास होण्याची संधी मिळेल. वृद्ध आणि तरुणांचे एकत्र भेटणे हे आशीर्वादाचे आहे. तरूण लोक लोक हे वृद्धांचे जीवन प्रसन्न करतात. ज्या लोकांची त्यांच्या जीवनावरील पक्कड कमी किंवा कमजोर होते तेव्हा त्यांना तरुणांच्या आशेची गरज असते. उत्साहाची आवश्यकता असते आणि तरुण लोकवृद्ध लोकांच्या अनुभवाने त्यांना बुद्धीचा लाभ होते. त्यांच्याकडून तरुणांना ज्ञान मिळते. यापासून त्यांना निस्वार्थी सेवा करण्याचे शिक्षण मिळते. घरामध्ये असे अनुभवी वृद्ध लोक असल्यास तरुणांना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यास मिळतात. त्यांचे अनुभव ऐकून जीवनामध्ये कसे वागावे याचे शिक्षण मिळते. यासाठी अशा वृद्धांना कुटुंबातील सदस्यांकडून प्रेम सहानुभूति व आत्मत्यागी प्रेमाची गरज असते. यामुळे कुटुंबातील सर्वांना मोठा आशिर्वाद मिळतो. घरगुती ऐक्य व त्यातील माधुर्य यामुळे कुटुंबामध्ये सुधारणा होते. त्याचबरोबर वृद्ध व तरुणांमध्ये ख्रिस्ती गुणांचा विकास होतो यामुळे कुटुंबामध्ये स्वर्गीय सुख व शांती प्राप्त होते. MHMar 153.3