आरोग्यदायी सेवा

44/172

अध्याय ११—असंयमीसाठी कार्य करणे

प्रत्येक सत्य सुधारणेचे कार्य हे सुवार्ताप्रसार कार्यामध्ये आहे. ज्या आत्म्यालावर उचलून एका न्वया आणि कुलीन जीवनाकडे घेतले जाते. विशेषतः संयम सुधारणेचे कार्य ख्रिस्ती कार्यकत्याच्या सहाय्याची मागणी केली जाते. सुवार्ता प्रसार क्रांती संयमाकडे जास्त लक्ष देऊन लोकांनाही त्याकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. तसेच सुवार्ता प्रसारकाने स्वत:ही संयम पालन करणे अतिआवश्यक आहे. तरच लोकांना संयमाविषयी सांगू शकता. प्रत्येक ठिकाण आपण जाऊ तेथे लोकांवर आपल्या संयमाचा प्रभाव पडेल असेच वागावे. संयमांचे नियम त्यांच्यासमोर उदाहरणादाखल सादर करावेत. ज्या लोकांना वाईट संवयी किंवा व्यसने आहेत. त्यांच्यासाठी तर खडतर कष्ट करणे आवश्यक आहे. मद्यपान, धुम्रपान व इतर मादक पदार्थाविषयी गंभीर इशारे तर वारंवार देण्यात येतातच परंतु तरीही या गोष्टी व्यसनी लोकांच्या डोळ्यावरुन जातात. MHMar 123.1

प्रत्येक ठिकाणी अशा लोकांसाठी कार्य करणे आवश्यक आहे. कारण अनेकजण स्वत:वरील असंयमामुळे स्वत:च्या शरीराचे नुकसान करुन घेत आहेत. मंडळ्यामधून धार्मिक संस्थांमधून आणि केवळ नामधारी ख्रिस्ती लोकांमध्ये अनेक तरुण स्वत:च्या नाशाचा रस्ता निवडतात असंयमी व्यसनांमुळे ते स्वत:वर आजार ओढवून घेत आहेत आणि पापमय मोह पूर्ण करण्यासाठी पैशाच्या लालसेने चुकीच्या संवयींमध्ये अधिकच सतत जातात. आरोग्य आणि स्वभावगुणाचे वाटोळे होत आहे. परमेश्वरापासून दूर आणि समाजापासून ही वेगळे होत आहे ते त्यांना वाटते की त्यांच्या जीवनामध्ये मुळीच आशा उरली नाही आणि येणाऱ्या जीवनातही अंधारच आहे. मातापित्यांची मने तुटली आहेत. चुका करणाऱ्या या लोकांना समाज बेकार ठरवितो. परंतु परमेश्वर त्यांना या दृष्टीने पाहात नाही. परमेश्वर त्यांची ही अवस्था ज्या कारणामुळे झाली आहे ते ओळखतो आणि म्हणून तो त्यांना दयेच्या दृष्टीने पाहतो. ख्रिस्ती लोक या लोकांना सहाय्य करण्याची आवश्यकता ओळखतात. “माझ्या आत्म्याची कोणी काळजी करीत नाही.” असे म्हणण्यास त्यांना संधी देऊ नका. MHMar 123.2

सर्वस्थरातील आणि व्यवसायातील लोक असंयमचे शिकार झाले आहेत. उच्च वर्गातील लोक त्यांच्या योग्य ते प्रमाणे त्यांना सर्व प्रकारची उपलब्धता असते तोपर्यंत ते स्वत:वर नियंत्रण ठेऊ शकत नाही त्यांची भूक वाढतच जाते आणि मग त्यांना परीक्षांना तोंड देता येत नाही किंवा विरोध करता येत नाही. यामुळे जे कधीतरी धनवान होते ते आता गरीब व निर्धन झालेले असतात. अशांना कोणी मित्र ही नसतात अशा अवस्थेमध्ये ते आजारी व दुःखी होऊन पतनाच्या वाटेकडे जात असतात. त्यांनी आपला आत्मसंयम हरवलेला आहे. जर त्यांना आधार देणारे हात भेटले नाहीत तर ते खालीखाली बुडत जातील. आत्मसंतुष्टी करणारी ही प्रकृति केवळ नैतिक पापच नाही. परंतु शारीरिक रोग सुद्धा आहे. असंयमी लोकांना सहाय्य करतांना प्रथम ख्रिस्ताप्रमाणे प्रथम लोकांची शारीरिक अवस्था पाहणे आवश्यक आहे. त्यांना आरोग्यदायी खाणेपिणे आणि स्वच्छ कपडे आणि शारीरिक स्वच्छतेची आवश्यकता आहे याची प्रथम पुर्तता करणे आवश्यक आहे. यासाठी योग्य वेळ देणे आवश्यक आहे. त्यांच्या चारी बाजूला सहयोग आणि सहाय्य देणारे ख्रिस्ती वातावरण असणे आवश्यक आहे. प्रत्येक शहरामध्ये अशी व्यवस्था असायला हवी की वाईट व्यस्तनांच्या वातावरणामध्ये राहणाऱ्या लोकांना वाईट संवयींच्या बेंड्यातून त्यांची सुटका करण्याची अवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांच्या मदतीला धाऊन जाणे गरजेचे आहे. यासाठी याजक किंवा लेवीबनून दुर्लक्ष करुन बाजूने जाण्याची गरज नाही. परंतु थमरोनी बनून त्यांच्याजवळ जाऊन त्यांना सहाय्य करणे आवश्यक आहे. असंयमीचे शिकार झालेल्या लोकांशी व्यवहार करतांना एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आम्ही कोणा समजूतदार व्यक्तिशी बोलतो असे नाही परंतु अशा लोकांमध्ये कार्य करीत आहोत जे व्यसनाधीन आहेत त्यांचे नुकसान त्यांना समजत नाही आणि दुष्ट आत्म्यांची शक्तिच्या अधीन आहेत. अशाबरोबर धीर आणि सहनशीलतेने आपले कार्य करावे अप्रिय आणि घृणास्पद वाटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांच्या अनमोल जीवनाविषयी विचार करा. कारण यासाठीच येशू ख्रिस्ताने आपले बलिदान दिले होते. जसे की एक मधली आपल्या क्रोधाविषयी व अपमानाविषयी जागृत असतो तसेच तुम्ही त्याला भरवसा देऊन त्याला विश्वास दाखवा की तुम्ही त्याचे मित्र आहात. त्याच्यासमोर निंदात्मक शब्द उच्चारु नका. तुमच्या कोणत्याही कार्यावरून किंवा घृणास्पद वागण्यावरून व त्याला न आवडणाऱ्या व अवमानजनक गोष्टी तुमच्या हातून होऊ नये याची दक्षता घ्या. यामुळे तो स्वत:चाच धिक्कार करील असे होऊ नये म्हणून सांभाळा. म्हणून त्याला वर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करा. त्याला प्रोत्साहन द्या. त्याला बरे वाढणारे व कल्याणकारी शब्दांचा वापर करा. त्याच्या स्वभावगुणाच्या सर्व चांगल्या गुणांची कदर करा ! बोलून दाखवा, त्याचे दुर्गण काढू नका. वाईट व्यसनापासून तो बाहेर कसा पडू शकतो त्याचे परीक्षण द्या. त्याच्या व्यसनामुळे त्याला सोडून गेलेले मित्र त्याचा पुन्हा सन्मान करतील याची खात्री द्या. परमेश्वराने त्याला दिलेले चांगले गुणांची किंमती त्याने ओळखावे म्हणून त्याला सहाय्य करा आणि त्याला सांगा की त्याच्यातील चांगल्या गुणांचा तो विकास करु शकतो. MHMar 124.1

जरी त्याची इच्छा शक्ति दुर्बल होऊन नष्ट झाली व त्याचे नैतिरुप भ्रष्ट झाले तरीही प्रभु येशू ख्रिस्तामध्ये त्याच्यासाठी आशा आहे तो त्याच्या हृदयामध्ये उच्च विचार आणि पवित्र हुरुण आणील. सुवार्तेमुळे मिळणारी आशा धरुन ठेवण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या. मोहांशी संघर्ष करताना त्या व्यक्तिसमोर बायबल उघडून त्याच्यासाठी वचन वारंवार वाचन करा. बायबलमध्ये परमेश्वराने अभिवचने दिली आहेत त्यांचा उल्लेख करा. ही अभिवचने त्याच्यासाठी जीवनी झाडाच्या पानासारखी सिद्ध होतील. त्याच्याबरोबर हे परिश्रम वारंवार करीत राहा तो पर्यंत जोपर्यंत तो आपल्या मुक्तिसाठी प्रभुसमोर कापत कापत येत नाही व त्याच्या सहायासाठी प्रार्थना करीत नाही आणि आशा सोडत नाही. MHMar 125.1

ज्या लोकांचे तुम्ही सहाय्य करीत आहात त्यांना दृढतेने धरुन ठेवा नाही तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही. कारण त्यांच्यासमोर वाईट मार्ग निवडण्याचे आव्हान सतत राहिल. त्यांची सतत परीक्षा होईल. मद्यपान करण्यासाठी ते नेहमी त्यांच्या पाय तिकडे वळतील. वारंवार त्यांचे पतन होईल परंतु तुम्ही धीर न सोडता तुम्ही आपले प्रयत्न सोडू नका. MHMar 125.2

त्यांनी ख्रिस्तासाठी आपले जीवन खर्च करण्याचा निश्चय केला आहे. तस प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे. परंतु त्यांची इच्छा शक्ति कमजोअसल्यामुळे कमी पडते म्हणून जे लोक त्यांची काळजी घेतात त्यांना काळजी घेतली पाहिजे की त्यांना व्यसनांपासून परावृत्त करणे ज्यांची हिम्मत संपली आहे ज्यांची हार झाली आहे त्यांनी पुन्हा प्रयत्न करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करणे आवश्यक आहे. अनेक लोक वाईट सवयींपासून वेगळे राहण्याचा प्रयत्न करतात परंतु ते दीर्घकाळ या व्यसनांशी संघर्ष करीत असतात. त्यांचे अनैसर्गिक लोभ, कामुक भावना त्यांच्या जन्मजात गुणामध्ये सामील होतात. यामध्ये त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. आतून बाहेरुन त्यांनी चांगुलपणाने नियंत्रित करणे आवश्यक आहे. तसे ते प्रयत्न करतात जे लोक पूर्वी कधी या अनुभवातून गेले नाहीत. भुकेवर यश मिळवू शकणार नाहीत व जी वाईट व्यसने आहे. त्यावर सुद्धा त्यांना यश मिळणार नाही. मग ही लढाई वारंवार होतच राहील. MHMar 125.3

अनेक लोक ख्रिस्ताकडे आकर्षित होतात त्यांच्यामध्ये लोभ, भूक व तृप्ती वर मात करण्यासाठी शक्ति कमी पडू शकते. परंतु कार्यकर्त्यांना यामुळे निराश होण्याची गरज नाही. तेच लोक मागे सरकतात जे ज्यांची खोल गर्तेतून सुटका करण्यात आली आहे ? MHMar 126.1

लक्षात ठेवा की तुम्ही एकटेच हे कार्य करीत नाही. खऱ्या हृदयाने सेवा करणाऱ्या सेवकांना स्वर्गातील देवदूत त्यांचे सहकार्य करतात. ख्रिस्त त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणतो जे मनापासून स्वत:मध्ये सुधारण्याचा प्रयत्न करतात. तो महान वैद्य स्वत:च कार्यकर्त्यांच्या बाजूला उभा राहून त्यांची मदत करतो, तो म्हणतो.” मुला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे.” (मार्क २:५.) MHMar 126.2

सर्व समस्यांमधून बाहेर काढण्यात आलेले लोक ती आशा धरुन राहतात जी त्यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. ते स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करु शकतात. परंतु जे दुसरे लोक ज्यांना मोठ्या प्रकाशाची संधी देण्यात आली होती परंतु त्यांनी त्या प्रकाशाचा उपयोग करुन घेतला नाही तेव्हा त्यांना बाहेर अंधारात सोडले जाईल. MHMar 126.3

वाईट व्यसनांची शिकार झालेले लोकांना स्वतः प्रयत्न करण्याच्या बाबत त्यांना जागृत करणे आवश्यक आहे. दुसरे लोक तत्परतेने त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. देवाची कृपा तर त्यांच्यावर असतेच ख्रिस्ती लोक त्यांचे वाईट व्यसन सुटण्यासाठी त्यांच्यामध्यस्थीसाठी त्यांच्याबरोबर प्रार्थना करतातच व स्वर्गीय दूत ही सहाय्य करतात परंतु व्यसनी लोकांनी सुद्धा स्वच्छेने या लढाईमध्ये जर भाग घेतला नाही तर मात्र कार्यकारी लोकांचे सर्व श्रम व्यर्थ जाईल. MHMar 126.4

दाविदाचा पुत्र शलमोन तरुण होता लवकरच तो इस्राएल राष्ट्राचा राजा बनणार होता. तेव्हा दाविदाने आपल्या शब्दामध्ये त्याला बोध दिला “मी जगाच्या रहाटीप्रमाणे जाणार तर तू हिंमत धर मर्दमकी दाखीव” (१ राजे २:२). अमरत्वाच्या मुकुटाची आशा धरणाऱ्या मानवाच्या प्रत्येक पुत्रासाठी हे शब्द प्रेरणासाठी आहेत की “हिंमत धर मर्दुमकीदाखीव.” MHMar 127.1

स्वत:च्या आत्मसंतुष्टामध्ये फसलेले लोकांना हे समजावणे आणि दाखवायला हवे की जर त्यांना सन्माननीय बनायचे असेल तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये मोठ्या नैतिकतेमध्ये नूतनीकरण करणे आवश्यक आहे. परमेश्वराचे त्यांना आव्हान आहे की ख्रिस्ताच्या शक्ति व सामर्थ्यामध्ये उठून उभे राहाणे पापमय जीवन आणि वाईट संवयी सोडून परमेश्वराने दिलेले मनुष्यपण पुन्हा धारण करुन त्याच्या सेवेत राहावे. त्याच्या सानिध्यात राहावे. MHMar 127.2

या भयंकर कसोटीमधून जात असतांना अनेक लोक निराश होतात आणि ओरडून म्हणतात की “वाईटाचा सामना मी करु शकत नाही.” परंतु त्यांना सांगा की ते या वाईट व्यसनांचा विरोध करु शकतात आणि केलाच पाहिजे. वारंवार त्याला त्यामध्ये अपयश आले असणार परंतु नेहमीच तसे घडत नाही. त्याची नैतिक शक्ति दर्बल झालेली असते आणि पापमय जीवनाची संवय झालेली असते त्याच्या नियंत्रणात ते असतात त्याचे वचन आणि निर्णय वाळूप्रमाणे हातातून निसटून जातात. MHMar 127.3

व्यसन सोडून देण्याची त्याची प्रतिज्ञा मोडलेली असते त्याचा आपल्या इमानदारीवरील भरोसा कमकुवत झालेला असतो अशा अवस्थेमध्ये त्याला स्वत:ला वाटते की परमेश्वर माझा कधीच स्वीकार करणार नाही किंवा आपल्या प्रयत्नाला तो सहाय्य करणार नाही. परंतु त्याला निराश होण्याची गरज नाही. MHMar 127.4

जे लोक ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतात त्यांना कोणत्याही वंश परंपरेनुसार व मिळालेली कोणत्याही संवयीच्या प्रवृत्तिचे गुलाम होण्याची गरज नाही. तुच्छ संवयीच्या बंधनात राहण्यापेक्षा त्यांना प्रत्येक भूक, तहान किंवा व्यसनावर विजयी झाले पाहिजे. परमेश्वराने आपल्याला आपल्याच ताकदीवर एकटे सोडले नाही. आम्हाला आमच्या वंशानुसार मिळालेल्या वाईट सवयांकडे आपण आकर्षिले जातो व यासवयी कितीही बळकट असू देत आम्हाला परमेश्वराने दिलेल्या सामर्थ्यानुसार या सवयींवर आपण मात करु शकतो. इच्छेची शक्ति : MHMar 127.5

मोहामध्ये सापडलेल्या लोकांना आपल्या इच्छाशक्तिचे खरे बळ समजणे आवश्यक आहे. मनुष्यामध्ये निसर्गत:च आपल्या शक्तिवर अधिकार किंवा नियंत्रण करण्याचे सामर्थ्य असते. आपले निर्णय तो आपल्या शक्तिच्या बळावर निवडू शकतो. सर्व काही स्वइच्छेवर योग्य निर्णय तो घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात तो स्वबळावर योग्य निर्णय घेऊ शकतो आणि योग्य व चांगले निर्णय घेण्यासाठी परमेश्वर सहाय्य करतो. आपल्या भल्यासाठी किंवा पवित्र इच्छा करणे काही मर्यादेपर्यंत ठीक आहे. परंतु जर आपण तेथेच थांबलो तर काहीच चांगले होऊ शकणार नाही. अनेक लोक वाईटावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या पदरी निराशाच येते. कारण आपली परमेश्वराला समर्पित करीत नाहीत. त्याची सेवा करण्याचा निर्णय ते घेत नाहीत. MHMar 128.1

परमेश्वराने आपल्याला निवड करण्याची शक्ति दिली आहे. आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आपण आपले हृदय बदलू शकत नाही, आम्ही आपले विचार, आवेग, राग अनुराग यावर नियंत्रण करु शकत नाही. आम्ही स्वत:ला पवित्र करुन परमेश्वराची सेवा करु शकत नाही. त्यालायकीचे बनू शकत नाही. परंतु त्याची सेवा करण्याची निवड करु शकतो. आपली इच्छा आपण त्याला देऊ शकतो. तेव्हा तो आपल्या इच्छेनुसार आम्हाला कार्य करण्याची शक्ति प्रदान करु शकतो. आपणास तशी ताकद देतो. इच्छेच्या योग्य अभ्यासाकरवी जीवनामध्ये पूर्णपणे परिवर्तन येऊ शकते. ख्रिस्ताला आपली इच्छा समर्पित करण्याकरवी आम्ही त्याच्या स्वर्गीय सामर्थ्याला जोडले जाऊ शकतो. आम्हाला दृढ राहण्यासाठी स्वर्गाची शक्ति आपणामध्ये कार्य करते. पवित्र जीवन, भूक लोभ या सर्व गोष्टींवर प्रत्येक व्यक्ति विजय मिळवू शकते. शत्रुवरही विजय मिळविता येतो. आपली दुर्बल आणि डळमळीत शक्तिला परमेश्वराची शक्ति येऊन आपण सबळपणे विरोधाला तोंड देऊ शकतो. MHMar 128.2

जे लोक भुकेच्या शक्तिशी संघर्ष करतात त्यांना आरोग्याच्या सिद्धांताचे पालन करण्याचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे त्यांना दाखवायला हवे की आरोग्य नियमांचा भंग केल्याने शरीरामध्ये आजार निर्माण होतात. त्याचबरोबर मद्यपान धुम्रपान लोभ किंवा अतिखाणे यामुळे आजार निर्माण होतात. अस्वाभाविक व्यसन लागते. ही व्यसने शरीरास हानीकारक असतात. आरोग्याचे पालन केल्यानेच केवळ शरीरामध्ये नैसर्गिक उत्तेजन प्राप्त होते. मद्यपान धुम्रपानामुळे येणाऱ्या उत्साहामुळे शरीराची हानी होते ती आरोग्याचे नुकसान करते. आरोग्य नियंत्राचे पालन करण्याने आरोग्यामध्ये सुधारणा होते व रोग आजारांना प्रतिबंध होतो तसेच स्वर्गीय सामर्थ्यावरही अवलंबून राहण्याने शरीरास हानीकारक व्यसनांपासून मुक्ति मिळते. जे व्यसनी लोक स्वत:मध्ये सुधारणा करण्याची इच्छा बाळगतात व तसे प्रयत्न करतात त्यांच्या जीवन चरितार्थासाठी रोजगार उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. जे श्रम करण्याच्या योग्यतेचे आहेत त्यांनी श्रम करुन आपला चरितार्थ चालवावा. इतरांवर अवलंबून राहू नये. स्वत:च्या आणि इतरांच्या हितासाठी त्यांनी मोलमंजुरी करावी व स्वत:चे व कुटुंबांचा खर्च उचलावा. अशा स्वावलंबी लोकांना उत्तेजन द्यावे. त्यांच्या प्रयत्नाला धैर्य द्यावे यामुळे त्यांच्या आत्मसन्मानाला बळ मिळेल. अशा प्रकारे त्यांच्यावर येणाऱ्या मद्यपान धुम्रपान आणि इतर शरीरास हानीकारक मोहावर मात करण्याचे बळ त्यांना मिळेल. कारण यावेळी त्यांना कार्यकर्त्यांचा आधार मिळालेला असेल. येणाऱ्या परीक्षामध्ये त्यांना तोंड देण्यासाठी शरीरमन बुद्धी या तीन ही गोष्टी तयार असतील. MHMar 129.1

निराशा व धोके MHMar 129.2

पतन पावलेल्या लोकांसाठी जे कार्य करतात हे कार्यकर्ते जे व्यसनी स्वत:ची सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात ते अनेकदा अयशस्वी होतात त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे कार्यकर्ते अभिवचन देतात. अनेक लोक आपले व्यसन आणि वर्तणूकीमध्ये सुधारणा झाल्याचे वर करणी दाखवितात परंतु हा बदल काही काळा करीताच असतो. परंतु त्यांच्या हृदयामध्ये मुळीच परिवर्तन झालेले नसते. ते त्यांचे आत्मप्रेम तसेच जपून ठेवतात. अजूनही त्यांच्या आतमध्ये तोच मुर्खपणाचा संतोष धरुन ठेवलेला असतो. त्यांच्या पूर्वीच्याच आनंदाचा उपभोग घेण्याची लालसा त्यांच्यामध्ये असते म्हणजे संधी मिळाली की ती सोडायची नाही असाच त्यांचा रोख असतो. अर्थातच त्यांनी त्याच्यावर पूर्ण विजय मिळविलेला नसतो. कारण त्यांना चरित्र्य निर्मितीच्या कार्यक्रमाची माहिती नसते आणि तो पूर्ण नियमपालनकर्ता म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही त्यांनी आपली भूक आणि लोभाच्या तृप्तीसाठी मानसिक व आत्मिकतेचे मोल जाणले नाही व यामुळे मोहापुढे ते पुन्हा दुर्बल होऊ शकतात. असे लोक चंचल आणि अस्थिर असतात. त्यांचा लोभ विषय वासनेकडे झुकलेला असतो. अशा प्रकारचे लोक इतरांना धोका होऊ शकतात. सुधारणा झालेल्या स्त्री-पुरुषांच्या रुपामध्ये स्वीकारण्यात आल्यामुळे त्यांची जबाबदारी अशा ठिकाणी ठेवली जाते त्यांचा प्रभाव निरुपद्रवी लोकांवर सुद्धा वाईट होतो. MHMar 129.3

एवढेच नाहीतर जे प्रामाणिकपणे स्वत:स सुधारण्याचा प्रयत्न करतात त्यांचे सुद्धा पतन होण्याचे धोक वाढतात. त्यांच्याशी फार खबरदारीने आणि चातुर्याने आणि कोमलतेने व्यवहार करणे आवश्यक आहे. ज्यांना वाईट व्यसनांमधून सुटका मिळाली आहे त्याची खोटी वाहवा व मोठे पण त्यांच्यासाठी धोकादायक आहे. पापमय जीवन जगलेल्या स्त्रीपुरुषांना सार्वजनिक ठिकाणी निमंत्रण देऊन त्यांचा अनुभव सांगणे हे वक्ता आणि श्रोत्यांना सुद्धा धोकादायक आहे. वाईट दृष्यांवर लक्ष केंद्रित केल्याने बुद्धी आणि आत्मा दोन्हीही भ्रष्ट होतात आणि वाचविलेल्यांना अति महत्त्व देणे घातक ठरते. त्यांचे नुकसान होते. यामुळे अनेकजण विचार करतात की त्यांच्या पापमय जीवनामुळेच त्यांना एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे त्यांना स्वतः वरील विश्वासाचेच जास्त महत्व वाटते. त्यांच्या स्वत:च्या भाषणांचे महत्व वाटू लागते हे त्यांच्या आत्म्यासाठी घातक ठरते. जे स्वत:वर भरवसा न ठेवता केवळ ख्रिस्ताच्या कृपेवरच अवलंबून राहतात तेच जीवनामध्ये स्थिर राहू शकतात. जे लोक खऱ्या मनाने परिवर्तन झाल्याचे प्रमाण देतात त्यांना इतरांची सेवा करण्यासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. जे लोक सैतानाची सेवा सोडून ख्रिस्ताची सेवा करु इच्छितात त्यांच्यापैकी कोणालाही निराश करु नये अशांची नियुक्ती करावी त्यांना प्रोत्साहन द्यावे. “जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा.” (यहूदारद) ज्या लोकांना परमेश्वराने बुद्धी दिली आहे ते व्याआत्म्यांना पाहतील ज्यांनी खरेच पश्चात्ताप केला आहे आणि ज्यांना खेरच सहाय्याची गरज आहे त्यांना ते सहाय्य करतील. परंतु त्यांना प्रोत्साहन दिल्याशिवाय असे घडू शकणार नाही. ख्रिस्त आपल्या सेवकांच्या हृदयामध्ये अशी गोष्ट निर्माण करील की जे आत्मेखऱ्यापणाने पश्चात्ताप करतील व आपली पापे पदरी घेतील त्यांना आपल्या सहभागीतेमध्ये त्यांचे स्वागत करतील. मग ते कितीही पापी असोत व कितीही खोलत्यांचे पतन झालेले असो परंतु जेव्हा त्यांना मनापासून पश्चात्ताप होऊन कापत कापत परमेश्वराजवळ आपली पातके घेऊन येतात व क्षमा याचना करतात तेव्हा प्रभु त्यांचा स्वीकार करतो. जेव्हा ते त्यांच्यासारखेत कोणीतरी पापाच्या गर्तेमध्ये पडलेले असतील त्यांनाही ते वर काढण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांना ते करण्यास सहाय्य करा. त्यांना ती संधी द्या कारण तेच आपला अनुभव त्यांना सांगतील त्यांचे परिवर्तन करु शकतील. अशा पातक्यांना अनुभवी लोकांकडे आणा जे त्याच अनुभावामधून पार झाले असतील. ज्यांना कधी नाशाच्या खड्डयातून वर काढले असेल अशांना संधी द्याकी ते ही इतरांना नाशातून वाचविण्यास सहाय्य करतील. कारण त्यांचा ही तोच अनुभव असतो जे कधी त्या मार्गाला होते त्यांनाच ते दुःख त्या वेदनांचा अनुभव असेल जे इतरांना नाशातूनवर काढण्यासाठी स्वत:चा अनुभव त्यांना सांगतील म्हणजे त्यांना आत्मिक बळ मिळेल. परमेश्वराच्या कार्यामध्ये त्यांना सहाय्या मिळेल. MHMar 130.1

जेव्हा आत्म्यामध्ये प्रकाश येतो तेव्हा काही लोक पूर्णपणे पापामध्ये बुडलेले दिसून येतात आणि जे वाईटरित्या पापामध्येच असतात त्यांच्यासाठी हे लोक यशस्वी कार्यकर्ते बनतील कारण ते स्वत: कधीतरी याच अवस्थेमध्ये होते. ख्रिस्तातील विश्वासाकरवी काही लोक त्याच्या सेवेमध्ये अधिक उंच ठिकाणी पोहोचतील आणि आत्मे जिंकण्याचे महान कार्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाईल ते आपली स्वत:चा दुर्बलपणा पाहतात. आपल्या नैतिकतेचे झालेले पतन पाहतात. ते पापाचे बळ वाईट संवयीचा प्रभाव जाणून असतात. ख्रिस्ताच्या सहाय्या विना मोहावर व व्यसनांवर यश मिळण्याची असमर्थताची त्यांना जाणीव असते व त्यांची सततची याचना हीच असते की “मी माझा अससय आत्मा तुझ्यापुढे ठेवतो.” MHMar 131.1

आता ते इतरांचे सहाय्य करण्यास तयार आहेत. ज्याने लोभ केला त्याला पारखले ज्याची आशा जाते. परंतु प्रेमाचा संदेश ऐकावून त्याला वाचविले जाते. आता तो आत्मे जिंकण्याची कला शिकला आहे ज्याचे हृदय ख्रिस्ताच्या प्रीतिने भरले आहे. कारण त्याला सुद्ध भक्तिदात्या करवी शोधून त्याच्या लोकांमध्ये आणले होते. म्हणूनच हरवलेल्यांना कसे शोधायचे हे त्यांना समजले होते तो पापाला परमेश्वराच्या करेकऱ्याकडे पाहण्यास सांगतो त्याने स्वत:ला पूर्णपणे परमेश्वराला समर्पित केले आहे. प्रिय परमेश्वराकरवी त्याचा स्वीकार करण्यात आला आहे. जो हात मदतीसाठी पुढे केला आहे तो धरून ठेवला अशा प्रकारे सर्व उधळ्या पुत्रांना परमेश्वराकडे आणले जाते. MHMar 132.1

प्रत्येक पाणी जो पापाच्या जीवनातून सुटका करुन पवित्रीकरण्यामध्ये येण्यासाठी संघर्ष करतो. त्याच्यासाठी मदतीचे मूळ त्या महान नावामध्ये दिसून येते. “आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही कारण जेणेकडून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिले नाही.” (प्रेषित ४:१२).... कोणी तहानलेला असला... विश्रांतीच्या आशेसाठी पाक करण्याच्या प्रवृत्तीपासून सुटका मिळण्यासाठी ख्रिस्त म्हणतो.... “माझ्याकडे या आणि घ्या” (योहान ७:३७). MHMar 132.2

आपल्या शक्तिमध्ये करण्यात येणारे चांगले विचार करण्याने काहीच मिळणार नाही. जगाती सर्व आणाभाका वाईट सवयी सोडण्यास सक्षम नसतात. स्वर्गीय कृपेकरवी मनुष्याचे हृदय जोपर्यंत नवीन केले जात नाही तो पर्यंत मनुष्य सर्व गोष्टींमध्ये संयम ठेऊ शकत नाही. आपण एक क्षणभर सुद्धा पापापासून स्वत:ला वाचवू शकत नाही म्हणजे प्रत्येक क्षण आपल्याला परमेश्वरावर अवलंबून राहावे लागते. MHMar 132.3

खरी सुधारणाही हृदयाची स्वच्छता करण्याने सुरु होते. पापी लोकांसाठी आमचे कार्य तेव्हाच यशस्वी होईल तेव्हा परमेश्वराच्या कृपेने त्याच्या चारित्र्याची रचना केली जाईल आणि आत्म्याला परमेश्वराबरोबर जिवंतपणी संपर्कात आणले जाईल. MHMar 132.4

ख्रिस्ताने आपलेसर्व जीवन पित्याच्या आज्ञेने त्याच्या योजनेप्रमाणे खर्च केले आणि त्यामध्ये त्याने प्रत्येक मनुष्यासाठी एक उदाहरण घालून दिले आहे. या जगामध्ये तो जे जीवन जगला आम्हाला सुद्धा तसे करण्यासाठी त्याच्या सामर्थ्याची गरज आहे. त्याच्या मार्गदर्शनाने जगायचे आहे. पतन पावलेल्यांसाठी आम्ही कार्य करायचे आहे. परमेश्वराची योजना आणि त्याच्यावरील आपली भक्ति, श्रद्धा आपल्याबुद्धी व मनावर पूर्णपणे बिंबविली पाहिजे. जे परमेश्वराची सेवा करतात आणि जे करु इच्छीत नाहीत अशा दोघांमधील भेद स्पष्ट करण्यासाठी कधीच चुकू नका. देव प्रीति आहे. परंतु तो पाप्पांना क्षमा करु शकत नाही. कारण ते ते परमेश्वराच्या आज्ञांच्या जाणून बुजून अवमान करतात. त्याच्या शासनाचा नियत तोच आहे जो त्याच्या आज्ञांचा अनादर करतात त्यांना शिक्षा चुकणार नाही. परंतु केवळ त्याच्या आज्ञांचे पालन करतात त्यांचाच सन्मान केला जातो. या जगामध्ये मनुष्याची चाल चलूक त्याला सार्वकालिक जीवन किंवा मरण ठरविले जाते जे तो पेरतो त्याचीच कापणी करील. परिणाम कार्यानुसार होणार. MHMar 132.5

आज्ञापालनाशिवाय परमेश्वराची इच्छा कोणीच पूर्ण करु शकत नाही. त्याने आपल्या इच्छा अनिश्चित सोडल्या नाहीत. त्याने मनुष्याला परमेश्वराबरोबर ताळमेळ करण्यासाठी जे काय निश्चित केले आहे त्यामध्ये अनावश्यक असे काहीच नाही. आम्हाला पाप्पांसमोर परमेश्वराच्या स्वभावगुणाचे योग्य चित्र व आदर्श ठेवणे आवश्यक आहे. हा आदर्श घेऊनच आपण ख्रिस्ताकडे जाऊ शकतो. कारण त्याच्या दयेतेच या आदर्शापर्यंत आपण पोहोचू शकतो. MHMar 133.1

मुक्तिदात्याने मानवतेचे दुर्बळपण घेऊन स्वतः निष्पाप जीवन जगला म्हणजे मानवाला हे निमित्त देता येणार नाही की आपल्या दुर्बलतेमुळे आपण विजयी होऊ शकत नाही. ख्रिस्त अशासाठी आला की. “आम्ही स्वर्गाचे भागीदार व्हावे आणि त्याचे जीवन असे दाखविते की जेव्हा मानवता परमेश्वराबरोबर समेट करते तेव्हा ते पाप करीत नाही. MHMar 133.2

मुक्तिदाराने मरणावर विजय मिळवून असे दाखविले आहे की कशाप्रकारे मानव विजयी होऊ शकतो. ख्रिस्ताने सैतानाच्या सर्व हल्ल्यांना परमेश्वराच्या प्रत्येक वचनाने उत्तरे दिली होती. परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास ठेऊन त्याने परमेश्वराच्या आज्ञापालनाचे सामर्थ्य दाखविले आहे. त्यामुळे त्याची कसोटी करणारा त्याच्यावर जय मिळवू शकला नाही. प्रत्येक परीक्षेला त्याचे उत्तर होते “असे लिहिले आहे’ परमेश्वराने आपले वचन अशासाठी दिले आहे की त्याकरवी आम्ही वाईटाला प्रति उत्तर देऊ शकतो हे महान व अनमोल अभिवचन आमच्यासाठी दिले आहे त्याकरवी आम्ही “ईश्वराच्या स्वभावामध्ये सहभागी होऊ शकतो.” (२ पेज १:४). MHMar 133.3

परीक्षेमध्ये पडलेल्या लोकांना सांगाकी परीक्षा आणि दुर्बलतेचे सामर्थ्य पहायच्या ऐवजी परमेश्वराचे सामर्थ्य पाहा. त्याची सर्व शक्ति आमच्यासाठी आहे. स्तोत्र संहिताचा लेखक म्हणतो. “मी तुझ्याविरुद्ध पाप करु नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे.” (स्तोत्र ११९:११). “मानवी कार्यामध्ये मी आपणाला जबरदस्त माणसाच्या मार्गापासून दूर ठेविले आहे.” (स्तोत्र १७:४) MHMar 134.1

लोकांशी साहसाच्या गोष्टी करा, प्रार्थनांमध्ये त्यांना परमेश्वरासमोर वर उठवा. अनेक लोक जे परीक्षामध्ये अपयशी झाल्यामुळे अपमान वाटतो व त्यांना वाटते की परमेश्वराजवळ येणे व्यर्थ आहे. परंतु असा विचार शत्रुचा आहे. तो शत्रु सैतान हे विचार सुचवितो. जेव्हा त्यांनी पाप केले व त्यांना जाणीव होते की ते प्रार्थना करु शकत नाहीत तेव्हा त्यांना सांगा की प्रार्थना करण्याची हीच वेळ आहे ते अधिक अपमानीत व लज्जित होऊ शकतात. परंतु जसे ते आपली पापेस्वीकारतात. येथे ते न्यायी व धार्मिक होतात. त्यांच्या सर्व पापांची क्षमा करुन सर्व धार्मिकता त्यांना शुद्ध करते. MHMar 134.2

जो कोणी स्वत:ची अयोग्यता ओळखून पूर्ण पणे स्वत:ला परमेश्वराला समर्पित करतो. त्याच्यासारखा असहाय्य कोणीच नाही असे त्याला वाटते. परंतु सत्य असे आहे की त्याच्यासारखा शक्तिशाली कोणीच नसतो. प्रार्थनें करवी व त्याच्या वचनाचे अध्ययन करुन व विश्वास ठेऊन सर्वात कमकुवत मानव सुद्धा तीवंत ख्रिस्ताबरोबर व त्याच्या संपर्कात आपले जीवन व्यतीत करतो आणि त्याचा धरलेला हात कधीच सोडत नाही. MHMar 134.3

ख्रिस्तामध्ये राहण्यासाठी प्रत्येक मनुष्याने या अनमोल प्रतिज्ञांचा स्वीकार करु शकतात तो म्हणून शकतो. “मी तर परमेश्वराची मार्ग प्रतीक्षा करीत मी आपल्यातारण करणाऱ्या देवाची वाट पाहात राहीन माझा देव माझे ऐकेल. (मीखा ७:७).” तो वळून पुन्हा आम्हावर द्या करील आमचे अपराध पायाखाली तुडविल तू त्याची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकिशील.” (मीरवा ७:१९) MHMar 134.4

परमेश्वराने वचन दिले आहे: “पुरुष उत्कृष्ट सोन्याहून दुर्मीळ करीन मानव ओफीराच्या शुद्ध सोन्याहून दुर्मिळ करीन.” (यशया १३:१२). “तुम्ही मेंढ वाड्यात पडून राहता काय? ज्याचे पंख रुपाने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडित आहेत अशा कबुतरासारखे तुम्ही आहात ना?” (स्तोत्र ६८:१३) MHMar 135.1

ज्यांची बहूत पापे परमेश्वराने क्षमा केली ते त्याच्यावर जास्त प्रेम करतील हे तेच आहेत जे शेवटी त्याच्या अगदी जवळ असतील. ते त्याचे मुख पाहतील आणि त्याचे नाव त्यांच्या कपाळावर लिहिले असेल.” (प्रकटी २२:४). MHMar 135.2

“जे पहाटे उठून मद्याच्या पाठीस लागतात जे अपरात्रीपर्यंत द्राक्षारसपिऊन धुंद होतात त्यांस धिक्कार असो. विणा, सारंगी, डफ, बासरी द्राक्षारस हीच त्यांची मेजवाणी, पण ते परमेश्वराच्या कृतीकडे लक्ष देत नाहीत ते त्याच्या हातचे कार्य पाहत नाहीत.” (यशया ५:११-१२.) MHMar 135.3

“शिवाय त्याचा द्राक्षारस दगा देणारा आहे तो अहंकारी मनुष्य आहे तो धरी टिकत नाही त्याने अधोलोकांप्रमाणे आपली लालसा वाढविली आहे. तो मृत्युसारखा अतृप्त आहे.” (हबकूक २:५). MHMar 135.4

*****