आरोग्यदायी सेवा

41/172

आशेने वाचविलेले

“आम्ही आशेमुळे वाचलो आहोत.” (रोम ८:२४). जे पतन पावले आहेत त्यांना या गोष्टींची जाणीव करुन देणे आवश्यक आहे की एका मनुष्याला सन्मानित होण्यासाठी अजूनही उशीर झाला नाही. प्रभुने मानवाला आपला सन्मान देऊन आपला आदर त्यांना दिला आहे. एवढेच नाही परंतु जे लोक सर्वात खाली पडले होते त्याने त्यांच्याशी सन्मानाने व्यवहार केला. शत्रुत्व, वैर व नीचपणा व अशुद्धता या सर्व वाईट गोष्टींच्या संपर्कात आल्यामुळे ख्रिस्ताला सतत त्रास होत असे. परंतु त्याने कधीच असे दाखविले नाही की त्याच्या भावना दुखावल्या. आपला अपमान झाला असे त्याने दाखवून दिले नाही. मनुष्यामध्ये कितीही वाईट सवयी असोत. अभिमानी भावना असोत किंवा शक्तिशाली असोत त्याने सर्वांना दया आणि कोमलतेनेच वागविले जसे काय आम्ही त्याच्या आत्म्याचे भागीदार आहोत. त्याने कोणाशी कसलाच भेदभाव ठेवला नाही. त्याचप्रमाणे आम्हीही सर्व एकसमान आहोत याच भावनेने राहायला हवे. जसे आम्ही त्याच्या आत्म्याचे भागीदार आहोत याच भावनेने राहायला हवे. जसे आम्ही त्याच्या आत्म्याचे भागीदार आहोत यामुळे सर्व मानवप्राणी एकमेकांचे भाऊ-बहिण असे झालो. कारण आमच्या प्रमाणेच ते सुद्धा पडतात, अपयशी होता आणि पुन्हा उठतात, क्षमा मागतात व पाप न करण्याचे ठरवितात परंतु तरीही मोह येतच राहतात. हा संघर्ष चालूच राहतो. मग कोणाच्या सहाय्याची सहनुभूतिची ते अपेक्षा करतात. तेव्हा आपण त्यांना अशाप्रकारे भेटू नये की ते निराश होऊन अधिकच दूर जातील, परंतु त्यांच्या हृदयात आशा निर्माण करावी अशा शब्दामध्ये त्यांना भेटावे की त्यांना एक नवी उमेद मिळावी, त्यांचा विश्वास जागृत व्हावा मग ते म्हणू शकतात, “अगे माझ्या वैरिणी माझ्यामुळे आनंद करु नको. मी पडले तरी पुन्हा उठेन. मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. परमेश्वर माझा तंटा लढून माझा संपादन करील. तोवर मी त्याचा राग सहन करीन कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे. मला तो प्रकाशात नेईल मी त्याचे न्यायीपण पाहीन.” (मीखा ७:८-९). MHMar 117.1

“तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदये घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे.” (स्तोत्र ३३:१४-१५). MHMar 117.2

तो आम्हांला म्हणतो, लोभाचे शिकार झालेले लोक आणि चुका करणारे लोक यांच्याशी व्यवहार करताना आम्ही “बंधूजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वतीने ताळ्यावर आणा तूहि परीक्षेत पडू नये म्हणून स्वत:कडे लक्ष दे.” (गलती ६:१). MHMar 117.3

“तुला निराळेपण कोणी दिले ? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे ? तुला दिलेले असता दिले नाही असा अभिमान तू का बाळगतोस ?” (१ करिंथ ४:७). MHMar 118.1

“कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सगळे भाऊ भाऊ आहात.” (मतय २३:८). MHMar 118.2

“तर मग तू आपल्या भावाला दोष का लावितो ? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस ?’ ह्या करिता ह्यापुढे आपण एकमेकांना दोष लावू नये. असे ठरवून टाकावे की कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडवळण होऊ नये.” (रोम १४:१०-१३). MHMar 118.3