आरोग्यदायी सेवा

21/172

अध्याय ७—ईश्वरी आणि मानवी सहकार्य

रुग्णांना मानवीय आणि ईश्वरी सहकार्याने पुन्हा बरे करणे

रुग्णांच्या सेवेमध्ये परमेश्वर आणि डॉक्टर्स हे सहकारी असतात. उद्धारकर्त्याने शरीर आणि आत्मा या दोन्हीच्या चांगल्यासाठी सेवा केली आहे आणि जो सुसमाचार त्याने शिकविला आहे तो आत्मिक जीवनासाठी उत्तम संदेश व देहासाठी आरोग्यदान प्रदान करणारा आहे. पापांपासून मुक्ति आणि रोगातून मुक्ति दोन्ही एकत्रच मिळत असे. ख्रिस्ती वैद्यांनासुद्धा हे कार्य दिले आहे. त्यांना ख्रिस्ताबरोबर सहकार्य करुन आपल्या साथीदार मानवांना व त्यांच्या देह व आत्म्यांना लागणारे सहकार्य करणे आवश्यक आहे. एका रुग्णासाठी ख्रिस्ती डॉक्टराला असा संदेशवाहक होणे आवश्यक आहे की त्याचा रोग आणि पापमय आत्मा दोन्हीसाठी बरे करणारे व्हावे. MHMar 67.1

चिकित्सासंबंधी व्यवसायाचा खरा अधिकारी येशू ख्रिस्त आहे. तो परमेश्वराचे भय धरणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांबरोबर राहतो. जो मानवाचे दुःख कमी करण्याचे कार्य करतो. चिकित्सक शारीरिक आजारापासून विश्रांती मिळण्यासाठी प्राकृतिक औषधांचा वापर करतो. तोच डॉक्टर रुग्णाचे लक्ष परमेश्वराकडे केंद्रिक करण्यासाठी प्रयत्न करतो. कारण परमेश्वर आत्मा आणि शरीर दोन्हीचे कष्ट नाहीसे करतो. चिकित्सक ज्या कार्यामध्ये केवळ सहाय्य करतो आणि ख्रिस्त ते कार्य पूर्ण करतो. आजारातून बरे होण्यासाठी ते केवळ निसर्गाचेच सहकार्य घेऊ शकतात परंतु रोगमुक्ति केवळ प्रभूकडून मिळते. डॉक्टर जीवन सुव्यवस्थित राखण्यासाठी सहाय्य करतो परंतु ख्रिस्त तर जीवन देणारा आहे. MHMar 67.2