आरोग्यदायी सेवा

14/172

तुला बरे होण्याची इच्छा आहे काय ? उठ चालू लाग

“यरुशलेमेत मेंढरे दरवाजा जवळ एक तळे आहे त्याला इब्री भाषेत बेथसदा म्हणतात, त्याच्या जवळ पाच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, अंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे.” (ते पाणी हलण्याची वाट पाहत असत)” (योहान ५:२-३) MHMar 44.3

एका ठराविक वेळी तळ्यातले पाणी हलविले जात असे. पाणी हल्ल्याबरोबर जो कोण सर्वप्रथम पाण्यात उतरे तो बरा होत असे. मग त्याला कोणताही आजार असो. शेकडो रुग्ण तेथे येत असत. गर्दी इतकी होत असे की जेव्हा पाणी हलत असे तेव्हा सर्व जग एकाच वेळी पाण्याकडे धाव घेत असत. अशावेळी अगदी अशक्त लोक, स्त्रिया व मुले त्यांना पाण्याकडे जाता येत नसे. अनेकजण तळ्याजवळ ही पोहोचू शकत नसत. जे तळ्याच्या कडेला पोहोचतील ते तळ्याच्या कडेला मरुन पडत असत. तळ्याभोवती अनेकांनी झोपड्या बांधल्या होत्या हेतु हा की उन पाऊस आणि थंडीपासून त्यांचा बचाव व्हावा. अनेक रुग्ण असेही होते की ते तेथे विश्रांती न घेता रांगत तळ्याजवळ दरवेळी जात असत. ते रात्री झोपडीत राहत असत. MHMar 45.1

येशू यरुशलेम मध्येच होता. प्रार्थना आणि मननामध्ये स्वत:ला झोकून तो या तळ्याकडेच येत होता. त्याने त्या तळ्याभोवती दुःख भोगणारे रुग्ण पाहिले. जसे की त्यांची बरे होण्याची अंतिम इच्छेकडे डोळे लावून बसले होते. येशू बरे करण्याची शक्ति घेऊन त्यांना बरे करण्याच्या इच्छेने तो तेथे आला होता, परंतु तो शब्बाथ दिवस होता. लोक गर्दी गर्दीने उपासनेसाठी मंदीराकडे जात होते आणि त्याला ठाऊक होते की शब्बाथ दिवशी असे कार्य केल्याने यहूदी लोकांना आवडले नसते व त्यांनी त्याच्या कार्यात अडथळे आणले असते. MHMar 45.2

परंतु उद्धारकाने एक अशी व्यक्ति पाहिली की तो अधिक काळ दुःख सहन करीत आला होता. तो अति असहाय आणि अगतिक होता. त्याचा आजार हा अयोग्य राहणीमुळे झाला होता आणि लोक त्याच्याकडे अशा नजरेने ते पाहात होते की त्याला देवाने शाप दिला आहे. त्याचेच फळ तो भोगत आहे. मित्र आणि परिवारापासून तो एकटाच दूरवर होता असे वाटत होते की परमेश्वराच्या दयेपासून तो वंचित आहे. असे वाटत होते की बऱ्याच वर्षांपासून तो तिथे पडलेला आहे. पाणी हलण्याची वेळी त्याला तेथून त्याला लोकांनी सहाय्य केले असते, परंतु त्या प्रत्यक्षात पाणी हलण्याच्या वेळी घेऊन जाण्यासाठी कोणीच मदतीला येत नसे. तलावातील पाणी तो हलताना पाहात होता, परंतु तलावाच्या किनाऱ्यापर्यंत ही कधीच पोहोचला नाही. दुसरे जे शक्तिशाली होते त्याच्याआधी ते पाण्यात बुडी मारत असत. दुसरे जे गरीब असहाय्य होते. त्यांच्या अगोदर जे स्वार्थी लोक समुदाय होता ते धावतच असत आणि दीर्घकाळ तेथे खितपत पडलेला तो रोगी निराश, असहाय्य होता. त्याची होती नव्हती तीही सर्व शक्ति संपत आली होती. MHMar 45.3

हा रुग्ण आपल्या चटईवर पडून होता कधी कधी त्या तलावाकडे तो आशेने पाहात होता. अशावेळी एक शांत चेहरा त्याच्या जवळ अवतरला आणि त्याने गंभीर आवाजात त्याला विचारले, “तुला बरे व्हायची इच्छा आहे काय ?” या वाक्याने त्याच्या मनात एक आशा जागृत झाली. त्याने जाणले की कोणत्या तरी प्रकारे त्याला मदत मिळू शकते. परंतु पुन्हा त्याची आशा मावळली. त्याला आठवले की त्याने तलावाजवळ जाण्याचे कितीतरी वेळा प्रयत्न केले होते आणि आता त्याला आशा नव्हती की आपण पाण्यापर्यंत पोहोचू शकू. कारण यावेळी पाणी हलेल तोपर्यंत आपण जिवंत राहू शकणार नाही असे त्याला वाटत होते. तो निराश होऊन म्हणाला की “महाराज पाणी उसळते तेव्हा मला पाण्यामध्ये सोडायला माझा कोणी माणूस नाही मी जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो.” MHMar 46.1

“येशू त्याला म्हणाला, उठ आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” (योहान ५:७-८). एक नव्या आशेने तो मनुष्य येशूकडे पाहतो. त्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि शब्द इतरांसारखेच होते. त्याच्या उपस्थितिमध्ये प्रेम आणि शक्ति होती. त्याला चार व्यक्तिचा विश्वास ख्रिस्ताच्या शब्दांना पकडले होते. काही प्रश्न विचारता त्याने आज्ञापालन करण्याचा निश्चय केला आणि जेव्हा त्याने असे केले तेव्हा त्याच्या शरीराने त्याला साथ दिली. MHMar 46.2

प्रत्येक नाडी, स्नायुपेशी एक नव्या जीवनाबरोबर आनंदीत होतात आणि त्याचा असहाय्य अवयवांमध्ये निरोगी कार्य दिसून येते, आरोग्यदायी शरीराबरोबर तो स्वतंत्रपणे परमेश्वराच्या शब्दावर विश्वास ठेऊन तो उठून उभा राहतो. नुकतीच प्राप्त झालेली नवी शक्ति मिळाल्याच्या आनंदात देवाच्या आशीर्वादाचा आनंद घेत तो उठतो. MHMar 46.3

येशू ख्रिस्ताने या पक्षाघाती मनुष्याला स्वर्गीय सहाय्याचे कोणते आश्वासन दिले नव्हते. तो मनुष्य असेही म्हणू शकला असता, “प्रभू तू जर मला बरे केलेस तरी मी तुझ्या आज्ञांचे पालन करीन.” आणि जर त्याने थांबून मनात शंका घेतली असती तर बरे होण्याच्या सुसंधीला मुकला असता. परंतु नाही त्याने येशूच्या शब्दांवर पूर्णपणे विश्वास ठेवला. त्याने विश्वास ठेवला की तो बरा झाला आहे आणि त्याने ताबडतोब उठण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या प्रयत्नाला येशूच्या शब्दांच्या सहाय्याने यश आले. त्याला शक्ति मिळाली आणि त्याने चालण्याची इच्छा निर्माण केली व तो चालू लागला. ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन करीत तो पूर्णपणे बरा झाला. MHMar 46.4

पापामुळे आपण सर्व परमेश्वराच्या जीवनापासून विभक्त झालो. आमच्या आत्म्याला पक्षाघात झाला आहे. आपण स्वतः शुद्ध जीवन जगण्यास असमर्थ आहोत जसा हा मनुष्य पक्षाघातामुळे चालण्या फिरण्यास असमर्थ होता. अनेकजण असे आहेत जे स्वत:ची असमर्थता ओळखतात आणि त्यांना आत्मिकतेची अभिलाषा आहे. त्यांना परमेश्वराशी एक होण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्नही करतात. परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळत नाही मग ते निराशेने व दःखी स्वरात ओरडतात व म्हणतात, “किती मी कष्टी माणूस मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडविल ? (रोम ७:२४). मग निराश व द:खी झालेल्या आत्म्यांनी वर पाहावे. मग आपला उद्धारकर्ता ज्याने स्वत:चे रक्त सांडून प्रत्येकाला खरेदी केले आहे तो लोकांकडे वाकून प्रेमाने विचारतो की, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय ?’ (योहान ५:६). मग तो आज्ञा करतो की, “उठ आपली बाज उचल आणि चालू लाग.” (वचन ८). तेव्हा आपण बरे झालो आहोत किवा नाही याची वाट पाहात थांबू नका तर उठण्याची कृति करा. उद्धार कर्त्यावर विश्वास ठेऊन उठा. आपली इच्छा देवाला द्या. त्याची सेवा करण्याची इच्छा करा आणि त्याच्या वचनाचे पालन करतेवेळी आपणास शक्ति मिळेल. तुमची कोणतीही वाईट सवय असो किंवा वासना असो ज्यांनी तुम्हांला दीर्घकाळ तुमचा आत्मा आणि शरीराला आपले गुलाम बनवून ठेवले आहे. ख्रिस्त तुम्हाला त्यातून स्वतंत्र करण्यास सक्षम आहे. आणि त्याचीही इच्छा आहे की तुम्ही स्वतंत्र व्हावे. “पापामध्ये मेलेल्या आत्म्यांना जीवन देईल. (इफिस २:१). त्या अभागी दासांना मुक्त करण्याची त्याची इच्छा आहे. जे दुर्भाग्य आणि दुर्बलतेना पापाच्या साखळीमध्ये जखडले आहेत, कैदेत आहेत. पापी अनुभवाने मानवाचे जीवन विषारी बनविले आहे, परंतु ख्रिस्त म्हणतो, “तुमची पातके मी घेईन. मी तुम्हांला शांती देईन.” मी तुम्हांला माझ्या रक्ताने विकत घेतले आहे. तुम्ही माझे आहात. माझी कृपा तुमच्या दुर्बळ इच्छेला शक्ति देईल. मी तुमच्या पापाची लज्जा दूर करीन” जेव्हा तुमच्यावर कसोटी हल्ला करील तेव्हा जेव्हा चिंता आणि अस्वस्थता तुम्हांला घेरतील जेव्हा निराश व्हाल, हतबल व्हाल, तुमचे धैर्य सुटू लागेल येशूकडे पाहा आणि जो अंधार तुमच्या भोवती आहे, येशूच्या उपस्थितीच्या प्रकाशाने तो अंधार निघून जाईल. जेव्हा पाप तुमच्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करील. आपला आत्मा त्याच्याशी धडपड करील. पाप आपल्या विवेकावर ओझे करील. उद्धारकाकडे पाहा. पापाला दाबून टाकण्यासाठी त्याची कृपा बस आहे. तुमचे हृदय अनिश्चितेतून धडपडील तेव्हा ते त्याच्याकडे फिरेल. आपल्या समोर जी आशा आहे तिला धरुन राहा. येशू प्रतिक्षा करीत आहे की तो तुम्हांला त्याच्या परिवारामध्ये सामावून घेईल. तुमचा स्वीकार करील. त्याचे सामर्थ्य तुमचा अशक्तपणा दूर करील आणि तो तुमच्या प्रत्येक पावलाला मार्गदर्शन करील. आपला हात त्याच्या हाती द्या आणि त्याला आपले मार्गदर्शन करु द्या. MHMar 47.1

स्वत:ला कधीच असे असे वाटू देऊ नका की ख्रिस्त तुमच्या पासून खूप दूर आहे तो सदैव तुमच्या जवळच आहे. त्याची प्रीतियुक्त उपस्थिति तुमच्या चहूबाजूला आहे. त्याचा शोध असा करा की तो तुमची वाटच पाहात आहे. त्याची इच्छा केवळ हीच नाही की तुम्ही केवळ त्याचे वास्तवाचा स्पर्श करावा, परंतु सतत त्याच्याबरोबर चालावे असे त्याला वाटते. MHMar 48.1