आरोग्यदायी सेवा
वेतन
ख्रिस्ताने जेव्हा शिष्यांना आपल्या मागे येण्यास सांगितले तेव्हा लागलीच ते त्याच्यामागे चालू लागले. त्याने त्यांना जगीक सुखाचे किंवा इतर कोणतेच आकर्षणाची लालूच दाखविली नव्हती, त्यांना कोणत्याच सन्मानाचे वचन दिले नव्हते किंवा शिष्यांनीही त्याच्यापासून कोणतीच अपेक्षा केली नव्हती की त्याच्याकडून आपल्याला काही प्राप्ती होईल. उद्धारकर्त्याने मतयाला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा सर्व काही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला (लूक ५:२७-२८). मतयाने सेवा करण्याआधी जे वेतन त्याला मिळत होते त्याच्या बरोबरीचे वेतन मिळण्याची त्याने अपेक्षा केली नव्हती. येशूला काही प्रश्न विचारता आणि संकोच न करता तो ताबडतोब त्याच्या मागे चालू लागला. त्याच्यासाठी तोच उपाय होता. म्हणजे त्याला मुक्तिदाव्याबरोबर राहता येणार होते. त्याला येशूची वचने ऐकता येणार होती व त्याच्याबरोबर कार्य करता येणार होते. MHMar 378.4
मतयाच्या अगोदर ज्या शिव्यांची निवड करण्यात आली होती त्यांच्याशी सुद्धा असेलच घडले होते. जेव्हा येशूने पेत्र आणि त्याच्या साथीदारांना पाचारण केले तेव्हा तेही आपली जाळी व मचणे सोडून त्याच्या मागे गेले होते. त्यांच्यामध्ये काही शिष्यांना भाऊ, वडील नातेसंबंधी व मित्रही होते त्या सर्वांना सोडून ते येशूच्या मागे गेले. काहीजण तर त्यांच्या कमाईवरच अवलंबून होते आणि जेव्हा त्यांना बोलावणे आले तेव्हा त्यांनी ख्रिस्ताला विचारले नाही की, “मी जिवंत कसा राहू, माझे कुटुंबिय जे माझ्यावर अवलंबून आहेत त्यांना कसे संभाळू ?’ परंतु येशूने बोलविल्या बरोबर ते त्याच्यामागे गेले व जेव्हा नंतर येशूने विचारले, “मी तुम्हास पिशवी, झोळी व पायताणे घेतल्याशिवाय पाठविले तेव्हा तुम्हास काही उणे पडले का ? ते म्हणाले नाही. (लूक २२:३५). MHMar 379.1
आज आपला मुक्तिदाता अगदी तशाच प्रकारे विचारीत आहे तशाच प्रकारे बोलवित आहे. जसे त्याने मतय पेत्र योहान अदिंना पाचारण केले होते. जर आमची हृदये त्याच्या प्रेमाने स्पर्श केली आहेत तेव्हा आमच्या मनात आम्हाला काय मिळेल असे विार येणारच नाहीत. आम्हाला केवळ ख्रिस्ताचे सहकारी बनण्यामध्येच खूप आनंद होईल. त्याच्या देखरेखीवर विश्वास ठेवण्यास आम्हाला मुळीच भय वाटणार नाही. आम्ही जर परमेश्वराच्या शक्तिचा स्वीकार केला तर आम्हाला कर्तव्याची स्पष्ट जाणीव होईल. आमच्या स्वभाव लोभी राहणार नाही. आमचे जीवन उत्तम उद्देशाने भरुन जाईल. वाईट विचारांना आम्ही वर येऊ देऊ शकणार नाही. आमची सर्व उद्दीष्टे स्वच्छ, शुद्ध व पवित्र असतील. MHMar 379.2