आरोग्यदायी सेवा

140/172

खळबळ माजविणारे साहित्य

आजचे लोकप्रिय साहित्य हे अशा काही कथांनी भरलेले असतात की त्यांचे भरमसाठ प्रकाशन होते हे प्रकाशन तरूण मिटक्या मारीत वाचतात आणि त्यामुळेच आजचे तरूण भ्रष्ट होऊन रसातळाला जातात. नवतरूणांमध्ये यामुळे दुष्टपणा वाढत आहे. वयाने लहान असतानाच मुलांना दुष्टपणाचे धडे मिळतात आणि मोठी झाल्यावर त्यांना दुष्टपणाचे खत पाणी मिळते. त्यांच्यासमोर ठेवलेल्या गोष्टी ते आपल्या कल्पनेत आणतात आणि त्या कल्पनांचा जोपर्यंत ते अनुभव घेत नाहीत तोपर्यंत शांत राहणार नाहीत. आणि एकदा त्यांनी तो अपराध केला की मग मिळणाऱ्या दंडापासून कसे वाचायचे याचा विचार केला जातो. मुले आणि तरुणांना देण्यात येणाऱ्या काल्पनिक प्रकाशनाकरवी शिकविलेल्या गोष्टी भविष्यामध्ये त्या वास्तवामध्ये आणल्या जातात हे भविष्यातील आंदोलनाची शांतता असते. आणि सर्वप्रकारची ही कार्यवाही तिचे वर्णन व्यवस्था आणि आत्म नियंत्रण यांचे अडथळे तोडले जातात. अशाचप्रकारे अनेक तरूण अपराध करण्यासाठी प्रवृत्त होतात. मुले आणि तरूण हे अशाचप्रकारची प्रकाशने वाचून ते अपराधाला प्रवृत्त होतात. अशाप्रकारे समाजाची नैतिक पातळी खालावली जाते. अशाप्रकारे अव्यवस्थेचे बी उघडे उघडे पेरले जातात याविषयी कोणालाही आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही. अशाप्रकारचे अपराधाचे पीक घेतले जाते. MHMar 347.1

ओंगळ आणि रोमांचक व उत्तेजित, काल्पनिक कथा याकाही कमी धोकादायक नाहीत. यामुळे काही नैतिकता शिकायला मिळणार नाही कारण हे सर्व अनैतिकतेचे प्रोत्साहन असते. कधी कधी यामधून धार्मिकतेचा अभ्यास केला जात असेल. परंतु बहुतेक ही प्रकाशने नीचपणाचा कळस, मुर्खपणा आणि मूल्यहीनता असते. MHMar 347.2

अशाप्रकारच्या साहित्यांनी जग भरले आहे. यामध्ये दिशाभूल करणारी खोट्या गोष्टी यामध्ये दिसून येतात. या खोट्या व अनैतिक गोष्टीना खरेच मानून त्यांवर विश्वास ठेवतात. जे पवित्रशास्त्राला खोट्याच्या श्रेणीत ठेवतात व निंदा करतात ते पवित्र शास्त्राला खोट्याच्या श्रेणीत ठेवतात व निंदा करतात ते पवित्र आत्म्याचे मार्गदर्शनाला मुकतात व इतर जगिक गोष्टींना आकर्षित होऊन पवित्र आत्म्याला खिन्न करतात. काही काल्पनिक गोष्टी आहेत. ही पुस्तके काही सत्य शिकवितात आणि वाईट स्पष्ट करण्यासाठी लिहीली गेली होती. परंतु त्यामुळे चांगले होण्याऐवजी वाईटच घडले परंतु यातील काही काल्पनिक गोष्टी व चित्रामुळे व केलेल्या वर्णनामुळे चुकीचेच मार्गदर्शन झाले. अशाप्रकारच्या मार्गदर्शनांमुळे मुलांचे व तरुणांचे नुकसानच झाले. वर्णन केली गेलेली चित्रे त्यांच्या मनावर वारंवार त्यांच्या मनामध्ये तेच विचार सारखे येतात. अशाप्रकारचे शिक्षण त्यांना निरुपयोगी आत्मिकतेसाठी अयोग्य होतात. असले विचार बायबलमधील रूची कमी करते त्यांच्या विचारांसाठी स्वर्गीय आकर्षक नष्ट होते. डोक्यामध्ये सतत अशुद्ध विचार येत असतात आणि त्यांना या काल्पनिक शृंगार कथा खतपाणी घालतात, त्यांच्या भावना भडकल्या जातात आणि त्याचे परिणाम पापाला जन्म देण्यामध्ये होतात. MHMar 348.1

या काल्पनिक कथा, गोष्टी, सिनेमे किंवा कादंबऱ्या अपवित्र विचारांना सूचना देत नसतील ही आणि त्यांचा उद्देश चांगले सिद्धांत शिकविण्यासाठी असेल ही तरीही त्या धोकादायकच असतात कारण त्या खोट्या व काल्पनिकच असतात. कारण स्वर्गीय राज्य खोट्या व काल्पनिकतेवर अवलंबून मुळीच नाही. खोट्या कतांचा उद्देशच मुळी त्या वाचण्याचे व्यसन मुलांना लागावे. अशाप्रकारे तर्क वितर्क करून लिहील्या गेलेल्या कथा वाचणाऱ्यांना रसदार वाटतात. यामुळे त्यांची विचारांची शक्तिच नष्ट होते. यामुळे मनुष्य आपले कर्तव्य आणि विफिन्न वास्तविक समस्यांवर विचार करण्यास अक्षम्य बनतात. MHMar 348.2

केवळ मनोरंजन करण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या कथांमध्येच मनुष्य बुडून जातो व आपले वास्तविक कर्तव्य व जीवनाचे उद्देश विसरून जातो. व्यावहारिक जीवनामध्ये त्याला रस मुळीच राहत नाही. या काल्पनिक कथा वाचण्याचे एक व्यसनच त्यांना लागते. तो एक मानसिक व शारीरिक रोग लागतो. प्रेमाच्या काल्पनिक गोष्टी व कादंबऱ्या वाचून लोकांचे मेंदू व शरीरावर विपरीत परिणाम होतात व ते काल्पनिक जगामध्येच जगतात. त्यांना दुसरे काही सुचत नाही. यामुळे त्यांच्यामध्ये गरिबी, लाचारी आणि मनोरुग्णता निर्माण होते. MHMar 348.3