आरोग्यदायी सेवा
शिकविण्याद्वारे शिकणे
नव तरुणांनी होईल तितके लवकर आणि जास्त प्रमाणात आपले कार्य शिकून घ्यावे. जितके शिक्षण घेता येईल तितके जास्त शिक्षण तरुणांनी घ्यावे. त्यांच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. शिक्षणाची क्षमता वाढविण्यासाठी त्यांना कष्ट करण्याची संधी आहे तोपर्यंत त्यांनी शिकावे. हीतकरु आणि गरीब तरुण काम करुन आपले शिक्षण पूर्ण करतात. आपले शिक्षण पूर्ण करुन इतरांनाही ज्ञान देण्याचे कार्य तरुणांनी करावे. घरामध्ये व शाळेत ज्ञान मिळालेल्या विद्यार्थ्यांनी इतरांना ज्ञान देऊन आपला विकास करावा, त्याचे कार्य कोणतेही असो परंतु शिक्षण घेणे आणि इतरांना शिकविणे हेच त्याचे मुख्य ध्येय असावे. परमेश्वराने ज्यांना आपले ज्ञान आणि शतकानुशतके त्याचे लपलेले रहस्य बुद्धीवान आणि कष्ट करणारांना आपल्या रहस्यांचा पडदा उघडून त्यांना आपल्या ज्ञानाचा अविष्कार करु देतो. त्यांच्या कठीण समस्यांचे निरक्षण करतो. त्याच्यावर विश्वास ठेऊन तो आपले ज्ञान प्राप्त करुन घेऊ शकतो. MHMar 312.1
परमेश्वराच्या वचनाची साथसंगत स्त्री-पुरुष या दोघांनाही आपला प्रभाव टाकून त्यांची प्रगती करतो. त्यांना बळ देते. मग मुले आणि तरुणांना किती अधिक प्रमाणात प्रभाव पाडील ? वचनाच्या संगतीमध्ये जे राहतात. परमेश्वराच्या वचनाच्या संगतीत जे राहतात त्यांना वचनाचे सिद्धांत प्राप्त होतात. सिद्धांताच्या सवयी ते आत्मसात करतात त्यांच्या या रुचिमध्ये अनेक प्रश्नांची उकल होते व अनेक प्रकारे फायदे व आशीर्वाद प्राप्त होतात. MHMar 312.2
अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये जी मुले शिक्षण प्राप्त करुन घेण्यासाठी जातात तेथे त्यांना वाईट संगती लागून मुले बिघडतात हे एक भयानक सत्य आहे व त्यामुळे आई-वडीलांना अतोनात यातना होतात. कारण जे शिक्षण ते घेतात वाईट संगतीमुळे ही मुले वचनाच्या अभावामुळे नीतिमत्त्वापासून ते बहकून जातात. भ्रष्ट होतात यामुळे त्यांचे चारित्र्य बिघडते. MHMar 312.3
अनेक तरुण जे शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेतात ते उपयोगी सेवा कार्यामध्ये प्रविण होतील, परंतु जगिक अध्ययनामध्ये ते गुंतून जातात जगिक शिक्षणामध्ये सुद्धा ते पदवीधर होतात त्यांना त्यामध्ये चांगले पद मिळते मानसन्मान प्राप्त होतो. त्यांच्या महत्त्वकांक्षांचा विकास होतो, परंतु यामुळे त्यांचे जीवन वर्तमान आणि भविष्यासाठी नष्ट होते. MHMar 313.1
सामान्यपणे ज्या पुरुष-स्त्रियांमध्ये विस्तृत विचार, नि:स्वार्थी उद्देश आणि उत्तम मनिषा असते ते हे लोक असतात ज्यांच्यामध्ये प्रारंभापासून चांगल्या संगती करवी हे गुण विकसीत होतात. इस्राएला बरोबर आपल्या समस्त व्यवहारामध्ये परमेश्वर त्याच्या मुलांना संरक्षण देतो. मुलांनी वाईट सांगतीने बिघडू नये म्हणून त्यांच्या आरंभापासूनच त्याचे नियम आणि सिद्धांत त्यांना तशी योजना केली होती. इस्राएल देशामध्ये जन्म घेतल्यानंतर त्याला जे धडे शिकविले होते त्यांचा लोकांच्या मनावर पगडा बसला होता. मिसर देशातील प्रथम पुत्राच्या मृत्यु अगोदर त्या रुपाने त्यांच्यावर परमेश्वराचा न्याय प्रगट होण्यापूर्वी सर्व इस्राएलांना आपल्या मुलांना घरामध्ये एकत्र करण्याचा आदेश दिला. प्रत्येक घराच्या दारावरील चौकटीवर रक्त लावायचे होते आणि घरामध्ये राहणारे सर्वजण सुरक्षित राहतील. अशाप्रकारे आजचे आई-वडील जे परमेश्वरावर प्रीति करतात, त्याचे भय धरतात त्यांनी आपल्या मुलांना वचनाच्या बंधनात सुरक्षित व अधीन राहण्यास शिकवावे. ख्रिस्ताच्या रक्ताने त्यांची सुटका करण्याचे सुरक्षित व संभव झाले आहे. ख्रिस्ताने आपल्या शिष्यांच्या बाबतीत सांगितले आहे. “मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.” (योहान १७:१४). परमेश्वर आम्हांला सांगतो, “या युगाबरोबर समरस होऊ नका तर आपल्या मताच्या .......... स्वत:चे रुपांतर होऊ द्या.” (रोम १८:२). MHMar 313.2
“तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका कारण नीति व स्वैराचार ह्याची भागी कशी होणार ? उजेड व अंधार ह्यांचा मिलाप कसा होणार ? ख्रिस्ताची बालियाराशी एक वाक्यता कशी होणार ? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार ? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होतील ? देवाच्या मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार ? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत, देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करुन राहीन मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभु म्हणतो आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका म्हणजे मी तुम्हांला स्वीकारिन आणि मी तुम्हाला पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल असे सर्व समर्थ प्रभु म्हणतो.” (२ करिंथ ६:१४-१८). MHMar 313.3
“मुले व स्तनपान करणारी अर्भके यांसही एकत्र करा वर आपल्या खोलीतून व वधु आपल्या मंडपातून बाहेर येवोत. त्यांना परमेश्वराचे नियम आणि त्याची व्यवस्था समजाऊन सांगा.” (योएल २:१६, निर्गम १८:१६). “ह्या रीतीने त्यांनी इस्राएल लोकांबरोबर माझे नाव मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.” (गणना ६:२७).” जसे परमेश्वरापासून दहिंवर येते व पर्जन्य गवतावर वर्षतो आणि तो मनुष्यावर पडण्याचा थांबत नाही किंवा मानव जातीसाठी खोळंबून राहात नाही त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ठ लोक बहुत लोकांत पसरतील.” (मीखा ५:७). “परमेश्वराचे नाव तुला दिले आहे. हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहातील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल.” (अनुवाद २८:१०). आमची इस्राएलांबरोबर गणना होते. जुन्या इस्राएलां समान त्यांना दिलेले सर्व निर्देश त्यांच्या मुलांना त्याचे शिक्षण दिले होते त्यांचे सर्व आशीर्वाद आणि अभिवचने विश्वासाकरवी आम्हालाही दिली आहेत. MHMar 314.1
आमच्यासाठी परमेश्वराचे वचन आहे. “मी तुला आशीर्वाद देईन तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादाचा मूळ होशील.’” (उत्पत्ति १२:२). आरंभीचे शिष्य आणि त्या सर्वा बाबतीत जे ज्यांच्या करवी ख्रिस्तावर विश्वास ठेवतील ख्रिस्ताने म्हटले, “तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे ह्यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये त्यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरुन जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आणि तू माझ्यावर प्रीति केली तशी मीही त्यांच्यावर केली.” (योहान १७:२२:२३). देवाचे अद्भुत वचन हे जवळ जवळ अविश्वासू वाटते. सर्व विश्वाचा निर्माणकर्ता जो परमेश्वर सर्वांवर आपल्या पुत्रासारखेच प्रेम करतो. जे त्याची सेवा करण्यासाठी स्वत:ला समर्पित करतात त्यांच्यावर तो प्रेम करतो. येथे त्याचा महान अनुग्रह आम्हास विचित्र अनुभवातून मिळतो. त्याने आम्हास प्रकाश आणि स्वर्गाचा महिमा दिला आहे आणि त्याचबरोबर स्वर्गाचे सर्व भांडार आम्हांला देऊ केले आहे. अशा अनेक गोष्टीबरोबर येणाऱ्या जीवनाची शाश्वती परमेश्वराने आम्हांला दिली आहे. या जीवनामध्ये परमेश्वर आमच्यावर राजाचा उपहार देऊन आमचा सन्मान करतो. परमेश्वराच्या अनुग्रहाची प्रजा होण्याच्या नात्याने आम्ही त्याचा आनंद घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. आमचे चारित्र्य उन्नत व विस्तृत व्हावे अशी त्याची इच्छा आहे. परमेश्वर तरुणांना स्वर्गीय शक्ति देण्यासाठी थांबला आहे. ख्रिस्ताच्या रक्ताच्या झेंड्याखाली उभे राहून जे त्याच्याप्रमाणे इतरांची सेवा करीत आहेत. जीवनाच्या मार्गावर उभे राहून ते इतरांनाही व बहकलेल्यांना त्या मार्गावर आणतात आणि युगाच्या खडकावर त्यांना स्थिर करतात. MHMar 314.2
ते सर्व जे परमेश्वराच्या शिक्षणाचा ताळमेळ ठेऊन आपले कार्य करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर परमेश्वर अनुग्रह करुन त्यांना स्वर्गीय शक्ति प्रदान करु यशस्वी करण्याचे प्रयत्न करतो. प्रत्यक्ष परमेश्वर म्हणतो व म्हणून हिम्मत बांधून दृढ हो. भय धरु नको व मनात घाबरु कारण तुझा परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. मी तुला धोका देणार नाही व सोडणार नाही.” (यहोशवा १:५,९). MHMar 315.1
“पाहा पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजऊन तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणाऱ्या वचनाचे होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठवि ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही तसे तुम्ही आनंदान निघाल. शांतीने मिरवत जाल पर्वत व टेकड्या तुम्हापुढे जयघोष करतील. वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील. काटे यांच्या जागी सरु उगवतील. रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल. यावरुन परमेश्वराच नाव होईल. ते सर्वकाळचे चिन्ह होईल. ते कधी नष्ट होणार नाही.” (यशया १५:०-१३). सर्व जगामध्ये समाजामध्ये गोंधळ माजला आहे त्यामध्ये घडविणे आवश्यक आहे. तरुणाला समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे शिक्षण देण्यात येते. तेव्हा ते अनेक काळ उजाड झालेली ठिकाणे पुन्हा व्यवस्थित करतील. अनेक वर्षांपासून पडीक झालेल्या ठिकाणी ते पुन्हा घरे बांधतील. आपल्या वाडवडीलांची खिंडारे भरुन काढतील. उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवतील.” (यशया ६:४). तुम्हांस तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल. लोक तुम्हांस आमच्या देवाचे सेवक म्हणतील, राष्ट्राची संपत्ति तुम्ही भोगाल. त्याचे वैभव तुम्हांस प्राप्त झाल्याचा अभिमान वाहाल. तुमच्या प्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागाचे. ते आनंद पावतील. असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्यास सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. कारण मला, परमेश्वराला न्याय प्रिय आहे अन्यायाच्या लुटीचा मला वीट हो मी त्यांना खात्रीने प्रतिफळ देईन त्यांच्याशी सार्वकालिक करार करीन’ (यशया ६१:६-८). अन्य राष्ट्रांत त्यांचा वंश देशोदेशीच्या ...... त्यांची संतति प्रख्यात होईल, परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती ही असे त्यास पाहणारे कबूल करतील. मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्हासतो, कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वत:ला याजकासारखा मंडित करितो व नवरी जशी अलंकाराने स्वत:ला भूषित करिते तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे, कारण भूमि जशी आपले अंकुर उगविते. मला जसा आपणात पेरलेले बीज उगवेसे करितो तसा प्रभु परमेश्वर सर्व राष्ट्रादेखत धार्मिकता व कीर्ति अंकुरीत करील. (यशया ६१:९-११). MHMar 315.2
*****