आरोग्यदायी सेवा
एक भक्कम पाया
सर्व ज्ञानामध्ये आत्मे वाचविणारे ज्ञान सर्वांत महान आहे. सर्वात महान कार्य जो मनुष्य करु पाहतो किंवा तशी त्याची इच्छा आहे त्याने लोकांना पापा पासून विभक्त करुन त्यांना पावित्र्यामध्ये आणण्याचे कार्य करावे आणि हे कार्य करण्यासाठी त्यांचा पाया भक्कम असायला हवा. एक सर्वव्यापी शिक्षणाची गरज आहे. शिक्षण जे आई-वडील आणि शिक्षण मुलांना देतात ते साधारणच असावे. मुलांच्या जीवनाचा तो प्रथम आणि महत्त्वाचा पाया आहे. कुटूंबाच्या संस्कृतीपेक्षा जास्त काही शिकवायचे ते त्यांना शाळेमधून मिळते. जो पर्यंत मुलांची बुध्दी आणि हृदय सुशीक्षित होत नाही तोपर्यंत त्यांचे शिक्षण पूरे होत नाही. मुलांचे चरित्र पूर्णपणे विकसित होण्यासाठी त्यांना उच्च अनुशासन प्राप्त होणे अति आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिकतेचा विकास पूर्णपणे होणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य शिक्षणाची गरज असते. परमेश्वराचा चांगला सेवक होण्यासाठी आम्हांला त्यांचा विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. MHMar 309.2
खऱ्या शिक्षणामध्ये संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा समावेश आहे. खरे शिक्षण व्यक्तिला जीवनाचा योग्य वापर करण्याचे शिकविते. हे शिक्षण आम्हांला आमचे हृदय, बुद्धी, शरीर, हाडे आणि स्नायुपेशींचा सर्वोत्तम प्रयोग करण्याचे शिक्षण देते. बुद्धी शक्ति सर्वात मोठी असते. ही शारीरिक शक्तिवर शासन करते. नैसर्गिक भूम आणि वासनांना आणि विवेकावर नियंत्रण करते. ख्रिस्त हा मानवाचा मुख्य आहे आणि मानवाला सेवेसाठी शुद्धता आणि पवित्रिकरणासाठी त्याला मार्गदर्शन करण्याची त्याची इच्छा असते. ख्रिस्ताच्या अनुग्रहाची अद्भुत कार्याकरवी आम्हांला सिद्ध करु शकतो. MHMar 309.3
येशूला त्याचे शिक्षण घरीच मिळाले. त्याची आई त्याची सर्व प्रथम मानव शिक्षिका होती. त्याच्या आईच्या ओठामध्ये जे घडले होते त्याविषयी तो स्वर्गीय गोष्टी शिकला. तो खेड्यातील घरामध्ये राहिला आणि त्याने आपले आपले काम व्यवस्थित व इमानदारीने करीत होता. तो स्वर्गीस सेनापती होता. या पृथ्वीवर तो एक सेवक आणि आज्ञाधारक एक पुत्र बनुन आला होता. तो एक व्यवसाय शिकला आणि त्या व्यवसायामध्ये योसेफाबरोबर दुकानामध्ये सुताराचे काम करीत होता. एक साधारण मजूराप्रमाणे कपडे वापरुन तो शहरातील गल्ल्यांमधून फिरुन आपले काम करुन घरी परत येत असे. MHMar 310.1
त्यावेळी लोकांकरवी त्यांच्या वरील स्वरुपावरुन त्यांची किंमत केली जात असे. धर्माचे सामर्थ्य जसजसे कमी होत गेले तसतसे या देखाव्यामध्ये वाढच होत गेली. त्यावेळचे शिक्षक स्वतः गर्वाने सन्मान मिळवित असते. यामध्ये येशूचे जीवन याच्या अगदी उलट होते. हे जीवन येशूने अगदीच निरुपयोगी ठरविले होते, परंतु याच गोष्टी इतर लोक महत्त्वाच्या समजत असत. येशूने त्या शाळेत शिक्षण घेतले नाही जेथे व्यर्थ गोष्टीला महव्व दिले जाते आणि महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. येशूचे शिक्षण हे स्वर्गीय सूत्रावर ठरविले होते. ते म्हणजे वचनाचे अध्ययन नैसर्गिक आणि जीवनाचे अनुभव हे परमेश्वराच्या पाठ्यपुस्तकामधून शिक्षणासाठी भरपूर काही आहे, परंतु यासाठी कामासाठी उत्सुक हात आणि समजणारे मन व डोळे उघडे असायला हवेत.” तो बालक वाढत वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.” (लूक २:४०). अशाप्रकारे तो तयार होऊन तो प्रभाव सोडित आपल्या कार्यासाठी निघाला. ख्रिस्ताचा या जगावर असा प्रभाव होता की या आधी कोणाचाच नव्हता. MHMar 310.2
घर हे मुलांची पहिली शाळा असते आणि सेवेचा पहिला पाया येथेच घातला जातो. याचे सिद्धांत केवळ उदाहरणा दाखलच नाही तर पूर्ण जीवनाची शिकवण येथे दिली जाते. मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच धडे देण्यासाठी सहाय्य करा. जसे मुलांना चालणे, फिरणे आणि विचार करण्याचे सामर्थ्य येते. त्याला घरातील कामे द्या. आई-वडिलांच्या मदतीसाठी त्यांना छोटी-मोठी कामे करण्याचे शिकवा. तसे त्यांना प्रोत्साहन द्या. स्वत:वर नियंत्रण ठेऊन इतरांना सहाय्य करण्यातील आनंदाचा अनुभव त्यांना घेऊ द्या. स्वत:चा आत्मत्याग करुन इतरांच्या सहाय्यास त्यांना प्रोत्साहित करा. स्वत:पेक्षा इतरांच्या आनंदात खुश होण्याचे धडे त्यांना द्या. ही सुरुवात घरातूनच आपला भाऊ व बहिण यांच्यापासून सुरु करा. त्याचप्रमाणे वृद्ध, अभागी यांना सहानुभूति दाखवून सहाय्य करण्यासाठी प्रोत्साहित करावे. परिवारामध्ये जितक्या अधिक प्रमाणात प्रेमदया आणि सेवा करण्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल तितक्या जास्त प्रमाणात मुलांच्या मनामध्ये आदर भावना निर्माण होतील. त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा स्वभाव विकसित केला जाईल. इतरांच्या भल्यासाठी आणि कल्याणकारी भावना मुलांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करावा. MHMar 310.3