आरोग्यदायी सेवा

115/172

अध्याय ३३—कुटुंबाचा प्रभाव

“हृदयांवर पडणारा कोणताही प्रभाव एक खऱ्या
घराच्या प्रभावासारखा शक्तिशाली होत नाही”

जगामध्ये मुलांसाठी त्यांच्या घरासारखे आकर्षण काहीच नसते आणि त्यांच्या आईची उपस्थिति एक महान आकर्षण असते. ती एक त्यांच्यासाठी मुख्य केंद्र असते आणि तसे असायला पाहिजे. मुलांचा स्वभाव संवेदनशील आणि प्रेमळ असतो. मुले सहज आनंदी आणि सहजच दु:खी होतात. कोमल उपदेश, प्रेमळ शब्द आणि कार्यकरवी आई आपल्या मुलांना हृदयाशी बांधून ठेऊ शकते. MHMar 300.1

मुलांचा दंगा, आरडाओरडा किंवा त्यांचे मागणे हट्ट करणे या गोष्टी टाळण्यासाठी त्यांना दूर पाठविण्याऐवजी आईने कौशल्याने मुलांना काही आकर्षणे दाखवून त्यांना आनंददायी खेळामध्ये रमवावे. त्यांना काहीतरी काम देऊन त्यामध्ये गुंतवून ठेवावे. MHMar 300.2

मुलांच्या भावना समजून त्यांच्या खेळामध्ये किंवा छोट्या-मोठ्या कामामध्ये सहयोग करुन त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. अशाप्रकारे त्यांच्यामध्ये हळूहळू वाईट सवयींपासून परावृत्त करुन त्यांच्यामध्ये प्रभावी सुधारणा घडवून आणू शकते. त्यांच्या मधील स्वार्थ किंवा वासनामय स्वभावापासून परावृत्त करुन सरळ मार्गावर आणू शकते ती आईच. योग्यवेळी त्यांना चेतावनी देऊन किंवा काहीवेळा रागावून सुद्धा त्यांना सरळ मार्गावर आणता येते. त्याचा योग्य तो फायदाच होईल. आईने धीराने त्यांना प्रेमपूर्वक सावध करुन ती त्यांना योग्य मार्गावर आणू शकते आणि त्यांच्यामध्ये उत्तम चारित्र्य व योग्य गण निर्माण करु शकते. MHMar 300.3

मातांनी लक्षात ठेवावे की आपली मुले त्यांनी दुसऱ्यांच्या स्वाधीन करु नये. त्यांनी मुलांना कधीही असे वाटू देऊ नये की आपण एक महत्त्वाचे आकर्षण आहोत आणि आपल्या भोवती असणारे आपणास हवी असणारी गोष्ट देऊ शकतात. काही आई-बाप आपल्या मुलांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतात आणि त्यांच्या मनोरंजनासाठी आपला वेळ घालवितात. त्यांनी आपली निराशा आणि परीक्षांमध्ये वीराप्रमाणे सामना करण्याचे शिक्षण त्यांना द्यावे. त्यांच्यामध्ये असणारे किरकोळ दुःख वेदना यांकडे दुर्लक्ष करुन ती समस्या दूर करावी. त्यांनी आपल्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी मनावर घेऊन त्यांचा राग किंवा गंभीरतेने न घेता त्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात. आपल्या मुलांना इतरांविषयी विचार करण्याचे शिकवा. MHMar 300.4

परंतु मुलांविषयी बेपर्वाई दाखवू नका. त्यांच्या मनातील खळबळ जाणून घ्या. बऱ्याच मातांना वाटते की त्या आपल्या मुलांकडे पाहिजे तसे लक्ष देत नाही याची त्यांना चिंता वाटते. मी आपल्या बाळाला सहानुभूती किंवा प्रेम देत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या मुलांना आई-वडीलांचे प्रेम म्हणावे तसे मिळत नसेल ते दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांचा तो मार्ग चुकीचा ठरेल. कारण यामुळे त्यांचे चारित्र्य आणि बुद्धी दोन्ही धोक्यात येऊ शकतात. MHMar 301.1

वेळ आणि विचाराच्या अभावाने अनेक माता आपल्या मुलांना खूशी देऊ शकत नाहीत, परंतु थकलेले डोळे आणि कामात व्यस्त असणारे हात घराची सजावट करण्यास गुंतलेले असतात. परंतु शेवटी घराची सजावट आणि देखावा मुलांसाठी काही उपयोगाचा नाही. वायफळ खर्च ही काही उपयोगाचा नाही. आपले घर साधे व स्वच्छ असावे. माता आपल्या मुलांच्या चुकांसाठी दुःखी होतात, परंतु जसे पेराला तसे उगवे आणि पेरणी आई-बापच करतात. MHMar 301.2

काही माता आपल्या मुलांशी समानतेने वागवित नाहीत. कधी कधी यामुळे मुलांमध्ये भेदभाव निर्माण होतो आणि मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. असे केल्यास आई-वडील आपल्या मुलांना तो आनंद देऊ शकत नाहीत जो त्यांचा हक्क आहे. या गोष्टीमध्ये ते येशूचे अनुकरण करीत नाहीत. ख्रिस्त मुलांच्या भावना समजतो आणि त्यांचा आनंद व कसोटीमध्ये त्यांना सहानुभूती देऊन सहकार्य करतो. MHMar 301.3