आरोग्यदायी सेवा

112/172

बाळासाठी आहार

बाळासाठी सर्वात उत्तम आहार म्हणजे जो नैसर्गिक आहे. अनावश्यक रुपाने बाळाला भोजनापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही. हे कृत्य आईसाठी तिचे हृदय दगडाचे आहे असे समजावे. आणि कोणतीही आई असे करणार नाही. आपल्या बाळासाठी ती योग्य आहाराच देण्याची खटपट करते. कारण ती तिची जबाबदारी आहे. जी माता आपल्या बाळाची जबाबदारी दुसऱ्यांवर सोपवून देते तिने स्वतः विचार करावा की याचे परिणाम काय होतील. बाळाची काळजी घेणारी दायी आपल्या स्वभावाप्रमाणे बाळावर ती राग काढणारच. MHMar 295.6

बाळांना खाण्यापिण्याची योग्य सवयीचा विकास करण्याचे महत्व व त्याचा अंदाज केला जाऊ शकतो. बाळाला हे शिकविणे आवश्यक आहे की त्याने जगण्यासाठी खावे खाण्यासाठी जगू नये. हे शिक्षण तेव्हा सुरु केले जाऊ शकते जेव्हा बाळ आईच्या कुशीत असते. बाळाला त्याचे भोजन ठराविक वेळेमध्येच द्यावे. त्यामध्ये नियमीतपणा असावा. बाळ जसे मोठे होईल तसे च्याच्या जेवणाची बळ वाढवावी. बाळाला मिठाई आणि मोठ्यांचे जेवण देऊ नये. मोठ्यांचे जेवण बाळ पचवू शकणार नाही. बाळाची देखरेख करणए आणि त्याला त्याचे अन्न नेमलेल्या त्यावेळेमध्येच द्यावे. त्याचा हा नियमितपणा पुढे जाऊन भावी जीवनात आशीर्वादच ठरेल. MHMar 296.1

मुलांचा अल्लडपणा जसा वाढत जाईल परंतु त्याची भूक आणि स्वाद यामध्ये त्याला शिकविण्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन त्याला हवे तेव्हा काहीही खाऊ देण्याची मभा दिली जाते. तसे पाहता ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्याचा वापर मुलांसाठी स्वैरपणे त्यांना मिठाई आणि मिष्ठान्न खाण्यासाठी खर्च केला जातो. परंतु त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर संकट येते याकडे ते दुर्लक्ष करतात. तरुणांना खाण्यापिण्यासाठी स्वैर वागण्यासाठीच त्यांचे जीवन असल्याची त्यांची खात्री असते. जी गोष्ट सर्वात जास्त आनंद देते ती भूकेचे समाधान करणारी हवी आणि या शिक्षणाचा परिणाम खादाडपणामध्ये होतो यामुळे तरुणपणीच लठ्ठपणा येतो व त्यामुळे आजारपण येते त्यासाठी विषारी औषधे घेण्याची वेळ येते. MHMar 296.2

माता-पित्याने आपल्या मुलांच्या भूकेचे शिक्षण त्यांना द्यावे. त्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक भोजन करविण्याची सवय लावू नये. परंतु भोजनाच्या नियमितपणासाठी माता-पित्यांनी मुलांच्या लहानपणापासूनच सावधगिरीने सवय लावावी. मुलांना त्यांच्या लहानपणी त्यांना पचेल असेच पौष्टीक अन्न द्यावे. त्यांना बेचव अन्न देऊ नये. मुलांचा अधिकार म्हणजे त्यांची पसंती ही आहे आणि त्यांच्या पसंतीचा सन्मान करायला हवा. MHMar 296.3

खाण्या-पिण्याच्या संयमाबरोबरच त्यामधील असणारे अंतरावर सुद्धा नियमितपणा असावा. एकवेळचे जेवण घेतल्यानंतर दुसऱ्या भोजनापर्यंत अधेमध्येही काही खाऊ नये दोन भोजनामध्ये काही खाण्याने पचनसंस्थेचे कार्य बिघडते यामुळे आरोग्य ढासळते. आपला उत्साह आणि प्रसन्नता कमी होते आणि जेव्हा तुम्ही खाण्याच्या टेबलावर येता तेव्हा भूक नसते व खाण्याची इच्छा होत नाही. त्यांची जी भूक असते ती शरीरास नुकसानदायक अन्नाचीच भूक असते. ज्या माता आपल्या मुलांना ते खाणे देत जे मुलांना आवडते जे हानीकारक असते अशाप्रकारे माता आपल्या मुलांसाठी वाईटाचे बी पेरते. ही मुले मोठी झाल्यावर त्यांची शरीरासाठी हानीकारक असलेले अन्नच ते खातात व स्वत:च्या आरोग्याचे नुकसान करुन घेतात. अशाप्रकारे मुले मोठी झाल्यावर ते आपल्या खाण्यापिण्यावरील नियंत्रण सोडून मन मानेल ते वेळी अवेळी खातात व आरोग्याचे नुकसान करुन घेतात. याला कारणीभूत त्यांच्या माताच असतात. अशाप्रकारे अनियंत्रित मातांची मुले आपले आरोग्य व शक्तिचा हास करुन घेतात. ही मुले आपले कुटूंब किंवा समाजासाठी काही कामाची होत नाहीत किंवा स्वत:ची जबाबदारी समजू शकत नाहीत. आरोग्यासाठी नुकसानदायक भोजनाच्या प्रभावामुळे ती मुले आत्मिक, मानसिक आणि शारीरिक शक्ति गमावून बसतात. त्यांचा विवेक चेतनाहीन होतो. चांगल्या प्रभावाचा योग्य फायदा करुन घेण्याची त्यांची पात्रता नष्ट होते. MHMar 297.1

जेव्हा मुलांना शिकविले जाते की त्यांनी आपल्या भूकेवर नियंत्रण ठेवावे आणि आरोग्याकडे लक्ष देऊन खा. ही गोष्ट चांगल्या प्रकारे स्पष्ट केली जाते की त्यांना ते पदार्थ टाळावेत जे आरोग्यास नुकसान पोहोचवितात. चांगले आरोग्य मिळविण्यासाठी त्यांनी नुकसानदायक पदार्थ खाण्याचे टाळावे हेच योग्य. जेवणाच्या टेबलावर खेळीमेळीचे वातावरण असावे. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या देणगीचा उपभोग घेतो तेव्हा त्याचे उपकार मानावेत. MHMar 297.2