आरोग्यदायी सेवा

110/172

मुलांची देखरेख

मुलाचे जीवन जितके अधिक शांत आणि साधारण असेल तर त्यांचा शारिरीक आणि मानसिक विकासासाठी अधिकच उपयोग होईल. मातेला प्रत्येक वेळी शांत आणि आत्मनियंत्रित राहायला हवे. ते अधिकच उपयोगी होईल. कारण अनेक मुले उत्साही आणि उत्सुकतेने प्रभावित होत असतात. परंतु आईच्या शांत व संयमी मुलांना सांत्वन देण्याचा परिणाम त्यांच्यासाठी हितकारी असतो. मुलांना उष्णता हवी असते परंतु त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात गरम खोलीमध्ये ठेवण्याची चूक केली जाते आणि गंभीर बाब आहे कारण मुलांना मोठ्या प्रमाणात ज्या हवेपासून विभक्त केले जाते. झोपेत असताना मुलांच्या तोंडावर पांघरुण घालणे चुकीचे आहे. कारण असे केल्याने त्यांना मुक्तपणे श्वास घेता येत नाही. MHMar 293.3

मुलांना दुर्बल व विषारी संसर्गापासून नेहमी दूर ठेवणे आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. मुलांच्या संपर्कामध्ये येणारी प्रत्येक वस्तु स्वच्छ व शुद्ध असावी यामध्ये मुळीच दुर्लक्ष करु नये. अचानक बदलणाऱ्या वातावरणापासून मुलांना सुरक्षित ठेवणे अति आवश्यक आहे. परंतु ही गोष्ट कधीच विसरु नये की दिवस किंवा रात्री वेळी मुलांनी शुद्ध व स्वच्छ हवेमध्ये श्वास घ्यावा. MHMar 294.1