आरोग्यदायी सेवा
संयम आणि आत्म नियंत्रण
ती सावधगिरी ज्याच्याबरोबर आईला आपल्या सवयांकडे लक्ष द्यावे लागते ज्याच्याबरोबर ती असते. त्याविषयी पवित्रशास्त्रामध्ये शिकविले आहे. जेव्हा यहोवा इस्राएलांना सोडविण्यासाठी शमशोनाला उभा करण्याचा विचार करीत होता. “यहोवाचा दूत’ आईकडे यासाठी पाठविला की तिच्या सवयी आणि मुलाची काळजी घेण्याविषयी योग्य सल्ला दे. तो म्हणाला “सावधान’ यापुढे तू द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको.” (शास्ते १३:७). MHMar 289.1
मातापित्याच्या प्रभावाचे विषयामध्ये अनेकजण लक्ष देत नाहीत. परंतु स्वर्गाच्या दृष्टीने असे नाही जो संदेश परमेश्वराच्या दूताकरवी दिला होता. आणि दोन वेळा त्याविषयी गंभीर इशारा देण्यात आला होता. यावरून असे दिसून येते की या विषयावर आम्हाला अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. MHMar 289.2
इब्रीआईला सांगितलेले शब्दाकरवी परमेश्वराने प्रत्येक युगातील मातेला सावधगिरीचा इशारा दिला आहे. स्वर्गातील दूताने सांगितले जितक्या वस्तुंची चर्चा या स्त्रीशी केली होती त्या सर्वांपासून दूर राहावे. मुलांचे भले होते तो त्यांच्या आईच्या सवयींमुळे मुले प्रभावित होतात. तिची भूक आणि वासना या सिद्धांतावर नियंत्रित करायला हवी जर ती बाळाला जन्म देऊन परमेश्वराचा उद्देश पूर्ण करु पाहते तर काहीतरी आहे त्यापासून तिने सावध राहावे. काहीतरी आहे त्यापासून तिने सावध राहावे. विरोध करावा. मुलाच्या जन्माआधी ती खादाड असेल तर ती स्वार्थी, असंयमी आणि कडक असेल तर ते गुण जन्मणाऱ्या मुलांमध्येही उतरतात. अशाप्रकारे बहुतेक मुले जन्मापासूनच वाईट प्रवृत्तीची निपजतात. आणि यावर नियंत्रण करणे जवळजवळ अशक्यच असते. परंतु जर आईने स...... करून तिने आपला स्वभाव आणि सवयी ज्या वाईट असतील सोडून द्याव्यात व नम्र होऊन योग्य तत्वाप्रमाणे वागावे. नम्रता, दयाळूपणा, सभ्य आणि निस्वार्थीपणाने वागून आपल्या जन्माला येणाऱ्या मुलाला तिने या अनमोल देणग्या द्याव्यात. MHMar 289.3
धन्य आहेत ते आईबाप ज्यांचे जीवन स्वर्गाचे योग्य चित्र दाखवितात. जे बालकांना परमेश्वराची अभिवचने आणि आज्ञांविषयी शिकवण आणि आदर्श भावना त्यांच्यामध्ये निर्माण करतात. ते आईबाप ज्यांचा कोमलपणा न्याय व धैर्य मुलांसमोर परमेश्वराची प्रीति, न्याय आणि संयम सादर करतात आणि ते आपल्या बालकांना परमेश्वराकरवी प्रेम करणे विश्वास ठेवणे आणि आज्ञापालन करण्याचे शिक्षण देतात. ते पालक आपल्या मुलांना अशाप्रकारचे उपहार भेट करतात. MHMar 290.1
ज्या आईबापांना या मुलांची देखरेख करण्यासाठी परमेश्वराने सोविली आहेत. ते त्यांचे एक पवित्र कार्य आहे. तो म्हणतो “या मुलाला किंवा या मुलीला घेऊन जा त्यांना माझ्यासाठी सुशिक्षित करा त्यच्या चारित्र्याला माझ्यासाठी तयार करा. महालासारखे सजवा यामुळे प्रभूच्या दरबारात तो सदैव चमकत राहील.” . MHMar 290.2
मातेचे कार्य सहसा तिला कमी महत्वाचे वाटते परंतु ते तर तिच्यासाठी फार महत्वाचे असते. व अतिशय प्रशंसनीय आहे. इतर लोक तिच्या चिंतेच्या मानाने आणि जबाबदारी अति कमीच जाणतात. तिचे दिवस छोट्यामोठ्या कामामध्ये मग्न असतात. ही कामे करीत असताना तिला संयम, धीर, श्रम, कुशलता, बुद्धी आणि आत्मत्यागाची व प्रेमाची गरज असते. परंतु तरीही यांचा तिला गर्व होत नाही व ती म्हणूही शकत नाही की मी इतकी महत्वाची कामे करते. इतरांना वाटते की ती केवळ घरची साफसफाई करते घर नीटनेटके ठेवते परंतु ती घरकामे करून थकल्यावर सुद्धा आपली मुले सुदृढ निरोगी राहावी व योग्य मार्गावर असावीत याची ती काळजी घेते. प्रेमळ शब्दांनी ती त्यांना कस वागावे असे सांगते. एवढे करूनही तिला वाटते की मी काहीच केले नाही. परंतु तसे नाही सर्व काही मुलांसाठी तिच करीत असते. स्वर्गातील दिव्यदूत या चिंतीत मातेला पाहतात आणि तिच्या कामातील ओझे रोज हलके करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. तिचे नाव कदाचित जगमाध्ये ऐकविले जात नसेल. परंतु कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात त्याची नोंद असते. MHMar 290.3