आरोग्यदायी सेवा
घराच्या आजूबाजूचे वातावरण
परमेश्वर सुंदरतेवर प्रेम करतो. त्याने पृथ्वी व आकाश सुंदरतेने मढविले आणि पित्याच्या प्रीतिने त्याने आपल्या सर्व मुलांना त्यांच्या आवश्यक वस्तुंनी तृप्त केले. त्याच्या मुलांनी निर्माण केलेल्या वस्तु पाहून त्यांना आनंद होतांना पाहून त्याला समाधान प्राप्त होते. MHMar 287.1
गावे आणि खेड्यातील रहिवासी कितीही गरीब असोत त्याच्याकडे एक छोटे घर, अंगणात हिरवळ, सुंदर फुलांची झाडे असतात. ते त्यांना सर्व प्रकारचे सुगंध व सावली देतात. घरातील बेगडी सजावटीपेक्षा ही नैसर्गिक सजावट त्यांना अति आनंद देतात. घरातील शुध्द आनंदी आणि समाधानी वातावरणारा हे निसर्ग सौंदर्य अति पूरक असते. निसर्गाचे हे सौंदर्य आणि सुगंध त्या घरातील सर्वांना परमेश्वराच्या सान्निध्यात आणतो. MHMar 287.2
*****