आरोग्यदायी सेवा

97/172

निषेध

ज्या व्यक्तिने नशेली पदार्थांचे व्यसन लावून घेतले आहे ती एक निराशजनक अवस्थेमध्ये त्याची मानसिक अवस्था आजारी आहे आणि त्याची इच्छा शक्ति क्षीण झाली आहे आणि जी उरलेली शक्ति आहे तीची भूक नियंत्रणाबाहेर आहे. त्याचे तर्क वितर्क करता येत नाहीत किंवा त्याला आत्मत्याग करण्यास सहमत करता येऊ शकत नाही. तो वाईटाच्या डोहामध्ये बुडला आहे. ज्याने मद्यपान सोडण्याचा संकल्प केला आहे तो पुन्हा ग्लास घेण्याच्या विचारात आहे आणि नशाबरोबरचा आपला संकल्प विसरुन जातो. कारण उरली सुरली प्रत्येक इच्छा नष्ट होते. सर्व विचार अदृष्य होतात. वेडा बनविणार एक घोट घशाखाली उतरला तर त्याच्या परिणामाचे सर्व विचार नाहीसे होतात. तुटलेल्या हृदयाची पत्नी विसरली गेली आहे. मार्गभ्रष्ट पित्याला या गोष्टीची मुळीच काळजी नसते. त्याची मुले भूकेली आहेत उघडीवागडी आहेत याची तो फिकीर करीत नाही. या मद्याच्या व्यवसायाला कायदा मंजूरी देतो म्हणजेच कायदा आत्म्याच्या पतनालाच मंजूरी देतो. या व्यवसायाला थांबविण्याचा नकार करणे म्हणजे पूर्ण जगच वाईटाने भरले जाते. MHMar 264.3

हा व्यवसाय सतत चालू राहणार आहे काय ? आत्म्याचा विजय होण्यासाठी सतत संघर्ष करावा लागणार काय ? जेव्हा त्यांच्यासमोर परीक्षेचा दरवाजा पूर्णपणे उघडा आहे ? असंयमाचा शाप जगावर नेहमी येत राहील काय ? जेव्हा एखादे जहाज समुद्र किनाऱ्यावर येऊन फुटते तेव्हा किनाऱ्यावर असणारे लोग हातावर हात ठेऊन शांत राहतील काय ? ते आपल्या जीवाची परवा न करता पाण्याच्या कबरेमध्ये बुडणारे स्त्री-पुरुष आणि मुलांना बाहेर काढतील. मग नशेच्या आहारी गेलेल्यांसाठी त्यांना बाहेर काढण्यासाठी किती प्रमाणात प्रयत्न करावे लागतील. नशेच्या आहारी जाणाऱ्यांसाठी आणखी किती प्रयत्न करावे लागतील. MHMar 265.1

हे केवळ मद्यपानाचे व्यसनी आणि त्यांचे कुटुंब आणि मुलांसाठीच नाही, परंतु मद्य विक्री करणारांना सुद्धा प्रतिकार करणे आवश्यक आहे. त्यांच्यामुळेच अनेक कुटुंबे धोक्यात आहेत. मद्याचा हा व्यापार केवळ टॅक्स मिळविण्यासाठी होत असेल तर त्यापासून वाईट घटना किती प्रमाणात घडत आहे याचा विचार कोणी करील काय ? आपण सर्व मानवतेच्या धाग्यामध्ये एकत्र गुंतवलेले आहोत सर्व बंधु-भगीनींवर वाईटाचा जो प्रभाव पडतो त्याचे परिणाम काही चांगले होत नाहीत. बहुतेक प्रभाव आहेत ते मद्यपानामुळेच असतात. यामुळे सर्वांवर संकट येतात. MHMar 265.2

बहुतेक लोक ज्यांना लाभ आणि सुविधामुळे मद्याच्या व्यवसायावर प्रतिबंध लावल्यास त्यांच्याशी काही देणे-घेणे नसते. फारच उशीराने त्यांना समजून आले की मद्याच्या व्यवसायाने त्यांच्याशी देणे-घेणे आहे. कारण त्यांचे कुटुंबामध्ये अतोनात नुकसान होते. मद्यामुळे भांडणे, कलह, अपघात अशा अनेक गोष्टी घडतात. त्यांचा शेवट धोक्यातच होतो. जीवन असुरक्षित होते. जमीनीवर आणि समुद्रामध्ये दुर्घटना वाढत आहेत. उपासमार दुर्दशा व गरीबी येते. मंडळीमधील सभासद मंदिरात दान देतात आणि त्यामुळे सेवकांना वेतन मिळते. पैशाच्या बळावरच त्यांची काळजी घेतली जाते. ज्या मंडळ्या अशा सभासदांचा स्वीकार करतात त्या वास्तविक मद्याच्या व्यवसायाला होकार देतात. ते आपल्या लोकांसमोर जाहीर करीत नाहीत की मद्याची विक्री करणाऱ्या विषयी परमेश्वर काय म्हणतो. त्या विषयी स्पष्ट बोलले तर मंडळीचे सभासद नाराज होतील. यामुळे त्यांची लोकप्रियता कमी होईल व त्यांना वेतन मिळणे बंद होईल. MHMar 265.3

परंतु मंडळीच्या न्यायालयाच्या वर परमेश्वराचे न्यायालय आहे. त्याने प्रथम खून्याविषयी न्याय केला होता. “तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे.” (उत्पत्ति ४:१०). त्याच्या वेदीवर मद्याचा व्यवसाय करणारांचे अर्पण स्वीकारले जात नाही. त्याचा राग त्यांच्या विरुद्ध भडकतो. तो आपल्या उदारतेवर आपली पापे झाकण्याचा प्रयत्न करतो ते देवाला आवडत नाही. त्यांच्या पैशावर खूनाचे डाग आहेत. त्यांच्यावर शाप आहे. MHMar 266.1

“परमेश्वर म्हणतो, तुमचे बहत यज्ञबली माझ्या काय कामाचे ? मेंढरांचे होम, पुष्ट वासराची व पायांनी माझी अति तृप्ती झाली आहे, बैल कोकरे व बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येतांना माझी अंगणे तुडविता हे तुम्हांस सांगितले कोणी ? निरर्थक आणखी अर्पणे आणू नका, धुपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन शब्बाथ व मेळे भरविणे मला खपत नाही. सणाचा मेळा हाही अधर्मच आहे. माझा जीव तुमची चंद्रदर्शन व सण यांचा द्वेष करतो. त्यांचा मला भार झाला आहे. तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकितो, तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरीही मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहेत.” (यशया १:११-१५). MHMar 266.2

मद्यपी चांगले काम करण्यास योग्य आहे. त्याची अशी कसोटी केली जाते की तो परमेश्वराचा आदर करु शकतो आणि जग आशीर्वादीत करु शकतो, परंतु त्याच्या साथीदार नागरिकांनी त्याच्यासाठी मृत्युचे जाळे पसरले आहे. आणि त्याच्या पतनाने ते स्वतः श्रीमंत बनले आहेत. ते लोक चैनीत व आरामाने जगत आहेत. कारण ते गरीबांना लूटतात. गरीब मद्यपान करुन आणखीनच गरीब आणि दुर्दशेमध्ये जगतात. परंतु परमेश्वर त्यांचा हिशोब घेईल. कारण त्यांनी गरीबांना विनाशाच्या गर्तेत ढकलले आहे. तो जो मद्यपीच्या शेवटाची काळजी करीत नाही. तो जो वायफळ गवताला वस्त्र नेसवितो परंतु वस्त्रहिनांकडे दुर्लक्ष करीतो त्याच्याकडे परमेश्वराचा न्याय येतो. कारण मद्याचा व्यवसाय करणारे मद्यपीच्या रक्ताने आपले धन कमवितात. परमेश्वर त्यांची दुष्टता पाहातो आणि त्यांच्या अपराधाची नोंद ठेवतो. MHMar 266.3

ज्याने लोकांचे पतन करुन त्यांचा नाश करुन धन मिळविले त्यांना मंडळी व जग पसंत करते. गरीबांची लुबाडणूक करुन त्यांना लज्जास्पद जीवन जगायला लावणाऱ्यांशी मंडळी त्यांच्याशी हसून खेळून राहतात, परंतु परमेश्वर हे सर्व पाहतो आणि त्यांचा योग्य न्याय करीलच. मद्यविक्री करणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकाचा सन्मान होतो, परंतु परमेश्वर म्हणतो “शेवटी तो हाय हाय करील.” त्याच्यावर जगामध्ये निराशा. दुःख व संकटे आणल्याचा आरोप आहे. ज्यांच्यामुळे माता आणि मुले देशोधडीला लावल्याचा आरोप या मद्य विक्रेत्यांवर लावला जाईल. कारण मद्यनिर्मिती आणि विक्री करणारामुळेच कुटुंब उध्वस्त होते. मुलांना कपडे शिक्षण व अन्न मिळत नाही कारण कर्ता पुरुष मद्याच्या आहारी गेलेला असतो. त्यांच्या प्राणाचा व दुःखाचा हिशोब त्यांना द्यावा लागेल आणि जे अशा लोकांना प्रोत्साहन देतात तेही त्यांच्या पापाचे वाटेकरी होतात. परमेश्वर त्यांना म्हणतो, “तुमचे हात रक्ताने भरले आहेत.” MHMar 267.1