आरोग्यदायी सेवा

93/172

मंद नशा

ते लोक ज्यांना त्यांच्या माता-पित्यांपासून कृत्रिम उत्तेजन वारसाकडून मिळते. कोणत्याही परिस्थितिमध्ये मद्य, बीयर किंवा सफरचंदाची दारु त्यांच्यापर्यंत पोहोचली नसली पाहिजे. कारण त्यांची नेहमी कसोटी होत असते. हे सफरचंदाचे मद्य हानीकारक नसते या विश्वासावर अनेकजण ते घेतात, परंतु हे थोडे दिवसच गोड असते आणि नंतर मात्र त्याचे परिणाम दिसून येतात. जेव्हा या मद्याची चव तिखट होते तेव्हा लोकांना समजते की ते मद्य तीव्र नशा करणार आहे. MHMar 255.2

सफरचंदाचा रस साधेपणाने जरी केला तरी त्याचा वापर करणे हे हानीकारकच असते. जर लोकांना हे मद्य सुक्ष्मदर्शक यंत्रामधून पाहिले व त्यामध्ये जे त्यांना दिसेल तर त्यांची पिण्याची इच्छाच राहणार नाही. ज्या फळांपासून हे मद्य केले जाते त्या फळांच्या स्वच्छतेकडे मुळीच लक्ष दिले जात नाही. तसेच सडलेली व किडे पडलेल्या फळांचा वापर केला जातो. अशा विषारी फळांचे मद्य पिण्यासाठी वापरतांना आरोग्याचा कोणी विचार करीत नाहीत. ताज्या आणि स्वच्छ फळांचे जरी मद्य केले गेले तरीही ते पिण्यासाठी योग्य नसते. MHMar 255.3

मादक पदार्थसुद्धा तसेच बनविले जातात जसे मद्य बेफिकीरीने केले जातात. अशा प्रकारे बनविलेल्या मादक पदार्थांची चव तिखट मद्यासारखीच होते. अशाप्रकारे त्यांची इच्छा पूरी होते. त्या चवीमुळेच त्यांना पिण्याचे व्यसन लागते. मद्यपान कधीतरी करणे ही शाळा आहे. या शाळेमध्ये त्यांना मद्यपी बनविण्याचे शिकविले जाते. तरीही या थोड्याफार नशेमध्ये घातकपणा असतो की थोड्याच दिवसामध्ये या नशेच्या आहारी ते कधी जातात ते समजतही नाही. नशाबात बनण्याचा तो एक राजमार्ग आहे. MHMar 256.1

काही लोक जे कधीतरी पिणारे म्हणून ओळखले जातात ते सदैव हलक्या प्रमाणात नशाबाज होतात. ते त्याच प्रभावाखाली राहतात असे लोक आजारी, चंचल मनाचे, अस्थिर व असंतुलित असतात. स्वत:ला सुरक्षित समजत असताच ते पुढे पुढे जात असतात. तो पर्यंत जे सर्व सीमापार करीपर्यंत अशा प्रकारे ते सर्व सिद्धांत पूर्ण करतात आणि तरीही त्यांची तृप्ती होत नाही. MHMar 256.2

धर्मशास्त्रामध्ये मद्यपान करण्याची अनुमती कुठेही दिली नाही. येशून काना येथील विवाहामध्ये द्राक्षारस बनविला होता. तो द्राक्षांचा ताजा रस होता. हा तर नवीन द्राक्षारस आहे. जो द्राक्षाच्या गुच्छापासून तयार होत असे. या विषयी धर्मशास्त्रामध्ये म्हटले आहे. “द्राक्षाच्या घोसात नवा द्राक्षारस दृष्टीस पडला असता त्यात लाभ आहे म्हणून त्याचा नाश करु नका.” (यशाया ६५:८) MHMar 256.3

तो ख्रिस्तच होता त्याने जुन्या करारामध्ये इस्त्राएल लोकांना त्याने इशारा दिला आहे. “द्राक्षारस चेष्टा करणारा आहे. मद्य गलबला करणारे आहे. त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.” (नीतिसूत्रे २०:१). त्याने स्वतः हे पेय दिले नाही. सैतानच लोकांना या पेयाची सवय लावण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. यामुळे मनुष्याचा विवेक अंधुक व्हावा आणि आत्मिकता बधिर व्हावी ही सैतानाची इच्छा आहे, परंतु ख्रिस्त शिकवितो की तुमचा हीन स्वभाव ताब्यात ठेवावा. ख्रिस्ती लोकांसमोर अशा गोष्टी कधी ही आणू नये. यामुळे ते परीक्षेत पडून त्यांचे जीवन धोक्यात येईल. कारण त्याचे जीवन आत्मत्यागाचे उदाहरण आहे. भूकेची शक्ति तोडण्यासाठीच त्याने आमच्या ऐवजी रानामध्ये चाळीस दिवस उपवास करुन कठीण परीक्षेचा सामना केला. मानवतेला ही कसोटी पार पाडावी लागणार होती. हा ख्रिस्तच होता त्यानेच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगितले होते की त्याने कधी द्राक्षारस पिला नाही की मद्यपान केले नाही. ख्रिस्ताने त्याच्या शिकवणीचा कधी विरोध केला नाही. त्याने काना गावी जो द्राक्षारस बनविला तो शुद्ध ताज्या द्राक्षाचा रस होता आणि आरोग्यवर्धक होता. हा तोच द्राक्षारस होता जो येशूने शेवटल्या प्रभू भोजनाच्या वेळी शिष्यांना प्यावयास दिला होता. प्रत्येक प्रभू भोजनाच्या वेळी हाच शुद्ध द्राक्षारस ख्रिस्ताच्या रक्ताचे प्रतिक म्हणून देण्यात येतो. या संस्काराच्या सेवेमध्ये अशा प्रकारे बनविले आहे की हा द्राक्षारस जीवन देणारा आणि ताजेतवाने बनविणारा आहे. त्याचे हे उदाहरण आहे. याच्याबरोबर इतर कोणतेच द्रव मिसळू नये जे वाईटाची निर्मिती होईल. MHMar 256.4

मादक किंवा नशा आणणाऱ्या पदार्थाचा प्रयोग करण्याच्या विषयामध्ये जे काही पवित्रशास्त्रामध्ये, निसर्गामध्ये आणि आपला विवेक शिकवितो त्या गोष्टी समोर ठेवा व विचार करा की एक ख्रिस्ती मनुष्य या सर्व मादक वस्तुंचा वापर कसा करु शकतो ? गांजाची रोपे असतात त्यांची शेती करावी लागते. मद्य किंवा सफरचदांची दारु किंवा कोणत्याही प्रकारची दारु बनवावी लागते. एक ख्रिस्ती मनुष्य या गोष्टी करु शकतो का ? तो जर आपल्या शेजाऱ्यावर स्वत:सारखी प्रीति करतो तो या नशा आणणाऱ्या वस्तुंचा वापर करील काय ? MHMar 257.1

असंयम हा बहुतेकदा घरापासूनच सुरु होतो. जास्त प्रमाणातील तेलकट व मसालेदार पदार्थ याचा वापर केल्यामुळे पाचक तंत्र कमजोर होते. यामुळे असले पदार्थ खाण्याचे प्रमाणसुद्धा वाढते. कारण असे पदार्थ उत्तेजित असतात. अशाप्रकारे भूक जास्त प्रमाणात उत्तेजित करण्यासाठी हे पदार्थ कारणीभूत असतात. कारण अशा पदार्थांची हवस जास्त वाढत राहते. यामुळे शरीरामध्ये या उत्तेजित पदार्थांचा विषारीपणा वाढत जातो. असे पदार्थ जितक्या जास्त प्रमाणात घ्याल तितकी त्याची मागणी वाढतच जाते. चुकीच्या दिशेने उचलले पाऊल दुसरे पाऊल पुढे टाकण्याची तयारी करते. अनेक लोक आपल्या घरात भोजनाच्या टेबलावर मद्यासारख्या गोष्टी ठेवण्यामध्ये दोषी होत नाहीत. परंतु अशा पदार्थांनी टेबलावर भरपूर असतात. मसालेदार, तिखट पदार्थ असतात. अशा पदार्थांनाच जास्त मागणी असते. खाण्यापिण्याच्या याच पद्धती चुकीच्या आहेत. हे पदार्थचे आरोग्य नष्ट करतात आणि यामुळे मद्यपान करण्याची वाट निर्माण होते. MHMar 257.2

जर आमच्या समाजामध्ये तरुणांना संयम बाळगण्याच्या सिद्धांताचे शिक्षण दिले आणि लागू केले तर लवकरच संयम चळवळीचा विषय कमी होईल. मुलांच्या लहानपणापासूनच माता-पित्यांनी त्यांच्या संयमाचे संस्कार देऊन त्यांना तसे नियम लाऊन दिले तर ते यशाची अपेक्षा करु शकतात. MHMar 257.3

मातेच कार्य आहे की तिने आपल्या मुलांना त्यांच्या लहानपणीच एक नियंत्रण लागू करायचे असते व त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे कार्य तिने करावे व वाईट सवयीपासून दूर ठेवायचे आहे. त्यांचे नैतिक बळ असे वाढवायचे आहे की बाहेर त्यांच्याभोवती कितीही वाईटपणा असेल तर त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. बाहेरील किंवा शाळेतील मुलांच्या वाईट सवयींचा आपल्या मुलांवर काहीच परिणाम होणार नाही असे संस्कार पालकांनी त्यांच्यावर करावेत. उलट आपल्या मुलांचे चांगले संस्कार इतर मुलांवर पडण्याची अपेक्षा करावी. MHMar 258.1

असंयमाला दाबून टाकण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात, परंतु यातील काही मुद्दे दुर्लक्षित होऊ शकतात. संयम सुधारकांना आरोग्यास घातक असणाऱ्या पदार्थांपासून अलिप्त राहाणे आवश्यक आहे. जसे चहा, कॉफी व मसालेदार, अति तिखट पदार्थ टाळावेत. आम्ही या सर्व संयम कार्यकर्त्यांना त्यांच्या यशासाठी शुभ कामना देतो. परंतु आम्ही त्यांना निमंत्रण देतो की त्यांनी वाईटाच्या सर्व गोष्टीविषयी बारकाईने अभ्यास करावा. कारण संयम सुधारण्यामध्ये कठोर होणे आवश्यक आहे. शरीरास हानीकारक पदार्थ आपल्या टेबलावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. MHMar 258.2

मानसिक आणि नैतिक शक्ति या दोन्हीमध्ये नियंत्रण ठेवणे हे शरीराच्या योग्य संतुलनावर अवलंबून आहे. या गोष्टी लोकांच्या नजरेस आणू न देणे अति महत्त्वाचे आहे. नशा आणणारे अनैसर्गिक पदार्थांमुळे शरीरात जे चैतन्य येते ते कृत्रिम असते यामुळे शरीरातील नैसर्गिक शक्ति नष्ट होते. त्यांची शारीरिक नैसर्गिक शक्ति क्षीण होते व ते कृत्रिमतेवर जास्त अवलंबून राहू लागतात. यामुळे तो कृत्रिमपणा उत्तेजित्त करणाऱ्या पदार्थाविरुद्ध युद्ध करण्यास असमर्थ होतो. MHMar 258.3

या मार्गाने संयमसुधारकांना शिक्षित करुन त्यांनी आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडण्यास कसूर करु नये. त्यांना शिकवा की क्षीण झालेली शक्ति जागृत करण्यासाठी अनैसर्गिक अनियमितपणावर प्रयोग करुन यामध्ये यश मिळवावे. नाहीतर जीवन अधिक प्रमाणात धोका निर्माण होईल. MHMar 258.4

चहा, कॉफी, तंबाखू आणि मद्यपानावर एकच मंत्र आहे तो म्हणजे कधीही त्याची चव पाहू नका आणि त्यांना हात लावू नका, चाखू नका आणि स्पर्शही करु नका. चहा कॉफी आणि असेच इतर दुसरे पये व पदार्थ यांना आपणापासून दूर ठेवा. कारण यामुळेच तंबाखू आणि मद्यांची सवय लागते आणि एकदा हे व्यसन लागे की मग सोडणे कठीण होते. जे लोक असे उत्तेजित पेय सोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सुरुवातीला काहीतरी कमी असल्याची जाणीव व होईल आणि त्याविना त्यांना त्रासही होईल, परंतु दृढ निश्चय करुन त्यांना स्पर्श न करण्याचे ठरविले तर त्यांना यश प्राप्त होईल आणि त्यांची इच्छाही नाहीशी होईल. या पेयांचा (चहा, कॉफी) शरीरावर झालेल्या अत्याचारामुळे काही काळ सावरण्यास वेळ लागेल, परंतु निश्चयपूर्वक कमतरता सहन केली तर नक्कीच त्यामध्ये यश येऊन कालांतराने त्यांची आठवणसुद्धा होणार नाही. MHMar 259.1

*****