आरोग्यदायी सेवा

72/172

रक्ताभिसरण :

उतर आरोग्य मिळविण्यासाठी आमचे रक्त स्वच्छ व शुद्ध असावे. कारण रक्त हे जीवन आहे. क्षीण झालेल्या इंद्रियाची ते दुरुस्ती करते आणि शरीराचे पोषण करते. योग्य आहार पदार्थांबरोबर स्वच्छ हवा असणे शरीरासाठी आवश्यक आहे. कारण शुद्ध हवेमध्ये रक्त शरीर स्वच्छ होऊन जीवनामध्ये उत्साह प्राप्त होतो. रक्त प्रवाह जितका जास्त असेल तितके चांगले आरोग्य असेल. MHMar 207.2

हृदयाच्या प्रत्येक धडधडण्याबरोबर शरीर भर योग्य रक्त संचार होत असतो. शरीराच्या प्रत्येक भागामध्ये रक्त पोहोंचणे आवश्यक आहे. शरीरामध्ये असणारी वस्त्रे ढिले असावेत म्हणजे रक्त संचार योग्य होईल. कारण काही घट्ट कपडे रक्ताच्या संचाराला अडथळे निर्माण करतात. घट्ट कपड्यामुळे काही ठिकाणी रक्त संचय होतो आणि त्या भागात रक्त योग्य प्रकारे पोहोचत नाही परिणामी डोके दुखा, खोकला आणि हृदयाची धडधडा वाढते. MHMar 207.3